आंबेडकर विचार आजही का आवश्यक? – 14 क्रांतिकारी लेखमालेतील लेख-2
Contents
Ambedkar Jayanti 2026: बाबासाहेब आजही का आवश्यक आहेत? (संपूर्ण विश्लेषण)
(2 April 2026 : Article 14 → 14 April 2026 – लेख : 2)
Ambedkar Thoughts 2026 निमित्ताने मी सम्पादक, सत्यशोधक ब्लॉग/न्यूज वेगळ्या पण अर्थपूर्ण आणि सर्व भारतीय समाजाला बाबासाहेब आजही आवश्यक आहेत का? या प्रश्नावरचे उत्तर विचार करून काय मिळते? ते माझ्या उपक्रमातून बाबासाहेबांना आदरांजली द्यायची ती Ambedkar Jayanti 2026 साठी “14 दिनांक – 14 क्रांतिकारी लेख” हे लेख लिहून प्रसिद्ध करून सर्वत्र शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे या स्वरूपात मला शक्य आहे. म्हणून या अभिनव उपक्रमाने आदरांजली द्यायची. हाच उद्देश.
Ambedkar Thoughts 2026 म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक असमानतेविरुद्ध आजही चालणारी लढाई.”
मी म्हणतो ज्याला जे सूट होते ते त्याला विकसित करायला प्रोत्साहन देणे ही एक महत्त्वाची समज बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये फार कमी दिसते. चळवळ जर खरी असेल तर ती चालवायची नाही, तर यशस्वी करायची असते. फक्त चालवायची म्हटले तर त्यात प्रस्थापितांना काही अडचण नाही. ते मागील दाराने रसदहु पुरवतील, पण तेच सत्तेत राहतील.
मान्य.कान्शीराम यांच्या नंतर चळवळ फक्त चालत आहे.यशस्वी होत नाही. राजकीय चळवळ विशेषतः. शेवटच्या काळात कान्शीरामजी हे नेतृत्व निर्माण अभियान चालवत होते. पुढील चित्र त्यांना कदाचित दिसत असावे. पक्षात एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका असतो. पक्षान्तर्गत लोकशाही महत्वाची असते. सन्घटनेत केन्द्रीकरण होणे धोक्याचे असते. स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित करणे महत्वाचे असते. महात्वाकान्क्षी नेते ते निर्माण होवू देत नाही.
Ambedkar Thoughts 2026 फक्त चालवून आपला कार्यभाग साधत असेल, तर ती फक्त चालवण्यात काही जणांना रस वाटू लागतो — सामाजिक, राजकीय उद्देश पूर्ण होत नसतील तरी, कोणी निवडून येत नसेल तरी, सत्ता मिळत नसेल तरी. अशांना नोयडा वगैरे मधून रसद येते, असे मी लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान ऐकले होते. अर्थात सच्च्या ध्येयवादी कार्यकर्त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.
प्रस्तावना
“भारत 2026 मध्ये प्रगत आहे का — की विषमता अधिक खोल झाली आहे?”
भारतातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तनाचा इतिहास लिहिताना बाबासाहेब आम्बेडकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.इतके मोठ्या उन्चीचे नेते दुसरे झाले नाहीत. सर्वार्थाने भारताच्या इतिहासातील हे वास्तव आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाणित झाले.
याचे मुख्य कारण म्हणजे कमी वेळात बाबासाहेबांनी जे परिवर्तन घडवले ते एका चमत्कारासारखे वाटते.सर्व आघाड्यान्वर प्रचंड काम, मुलभुत काम, दुरदृष्टी केवळ बाबासाहेबांकडे दिसते. ते केवळ एका व्यक्तीचे नाव राहिले नाही तर एक विचारसरणी, एक चळवळ, एक क्रांती आणि एक तत्वज्ञान झाले .ते त्याचे प्रतीक झाले. ते एक युग बदलणारे ठरले. असे दाखले जगाच्या इतिहासात फार कमी आहेत.Ambedkar Thoughts 2026 चा मुख्य विषय या लेखातील माहितीतून अधोरेखित व्हावा.
आज 2026 मध्येही त्यांचे विचार तितकेच जिवंत आणि आवश्यक आहेत, जितके ते त्यांच्या काळात होते.किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रस्तूत आहेत. कारण लोकशाहीचा बुरखा पान्घरुन, मुखवटा धारण करुन लोकशाही विरोधी कार्यपद्धती वापरली जात आहे.एकाधिकारशाही, हुकूमशाही, रिमोट कन्ट्रोल, सर्वेसर्वा, हायकमान्ड, अदृश्य हात असे शब्द आपण वाचत असतो. ऐकत असतो. अशा सन्कल्पना लोकशाही विरोधी असतात. आकर्षक वाटतात तरुण वयात.
पण तरीही कोणी प्रश्न विचारु शकतो. खरंच आज बाबासाहेब आवश्यक आहेत का? व्यक्ती कायम आवश्यक असु शकत नाही. त्याला मृत्युची मर्यादा आहे. पण विचारांना नाही. ते शेकडो वर्ष जगू शकतात. जर मुलभुत, विवेकी, वैज्ञानिक आसतील तर.
काहींना ते कालबाह्य वाटू शकतात. काहींना वाटते की त्यांचे काम पूर्ण झाले आहे. कारण संविधान लागू आहे. प्रत्येकाने फक्त त्याचे पालन करायचे. बस्स! काहींना ही फक्त एक “हौस” वाटते.खरी लोकशाही ना फ्रान्स, ना युनाइटेड स्टेटस, ना ग्रेट ब्रिटेन, ना भारत. जगात कुठेच अस्तित्वात आलेली नाही. पण कमितकमी त्रासदायक जीवन व्हावे, असे अपेक्षित असते. शेवटी माणूस हा एक प्राणी आहे. उत्क्रान्त झाला आहे. ‘केमिकल लोचा‘ आहे.
खरे तर आमच्या मते समता, न्याय, सत्यासाठी लढाई आजही सुरू आहे.जगभर कमी अधिक प्रमाणात आहे. याउलट विषमता, अन्याय, असत्य हे काही पटीने वाढले आहे. लोकशाही असुन, प्रगत देशात, शिक्षित देशात, युरोप, यु एस ए, पुर्वेकडील काही प्रगत देशातही. त्याचे कारण बेलगाम सुटलेली भान्डवलशाही. तिची युद्ध ही गरज. इ. इ.भारतात ती आहे. पण तिच्यात जातीव्यवस्था मिक्स झालेली आहे. त्यामुळे ती आहे की नाही हाच मुलभूत प्रश्न clear नाही. नेते सांगत नाहीत.
Ambedkar Thoughts 2026 : सामाजिक, आर्थिक आणि शिक्षणातील असमानता उघड
आज संविधान निष्क्रिय करण्याचे प्रयत्न पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने चालू आहेत. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, विषमता, अन्याय आणि जातीय भेदभावाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला.पण रिपब्लिकन पक्षाची सन्कल्पना मान्डली. पण तिथेच बेकी झाली. वाढणारे आन्दोलन घटत गेले.
आज भारत आधुनिक झाला आहे.तो वस्तुनी. खोपडी 11/12 व्या शतकापेक्षा फारशी वेगळी नाही.म्हणून सामाजिक स्तरावर अजूनही अनेक समस्या कायम आहेत. जात, धर्म, लिंग या आधारावर भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. उलट काही ठिकाणी वाढवला जात आहे.यात सत्ता, सम्पत्ती, प्रतिष्ठा, सेक्स इ. चे हितसम्बन्ध गुन्तलेले असतात.
जात प्रवर्ग निर्माण करून बाबासाहेबांनी जातीचे वर्गात रूपांतर केले होते. पण आज पुन्हा जातींच्या प्रवर्गाचे जातीत रुपान्तर करण्याचे प्रयन्त सुरु आहेत. जातनिहाय स्वतंत्र आरक्षण विकास व सामाजिक न्याय यांना पुढे करुन समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न होत आहे.
आर्थिक आणि सामाजिक बदल
पूर्वी शिक्षणानंतर किमान नोकरीची हमी होती.शिक्षणाचे प्रमाण कमी होते. त्यातून आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रगती होत होती.खाजगीकरणाने नोकर्यान्ची सन्ख्या कमी झाली. शिक्षितान्ची सन्ख्या जास्त झाली. नोकरीची आशा सम्पली. म्हणून शिक्षणातही रस सम्पला. बाबासाहेब यांचे,’वाघीणीचे दुध’आटले.
” जमीन (Land Distribution Inequality):
राष्ट्रीय स्तरावर:
• Top 10% लोकांकडे ~45% शेती जमीन
(The New Indian Express)
• फक्त 4.9% श्रीमंत शेतकरी 32% जमीन नियंत्रित करतात.
janataweekly.org
• 13.8% मोठे शेतकरी ~47% जमीन धरतात.
janataweekly.org
लहान व गरीब वर्ग:
• 86.2% शेतकरी (small & marginal) → फक्त ~45% जमीन
janataweekly.org
• 56.4% ग्रामीण गरीब पूर्णपणे भूमिहीन (landless)
janataweekly.org
म्हणजे:
• बहुसंख्य लोकांकडे खूप कमी जमीन, तर थोड्यांकडे खूप जास्त.
• जातीय (Caste-based) जमीन असमानता
दलितांपैकी 58% पेक्षा जास्त कुटुंबांकडे जमीन नाही.
(Round Table India)
• SC जमीनधारकांची 92% होल्डिंग्स लहान (0-2 हेक्टर)
(Round Table India)
• काही राज्यांमध्ये दलित लोकसंख्या मोठी असूनही जमीन जवळपास शून्य.
janataweekly.org
• महिलांची जमीन मालकी
• महिलांकडे जमीन हक्क अत्यंत कमी (सुमारे 12–13%)
janataweekly.org
• अनेक वेळा नाव असले तरी नियंत्रण पुरुषांकडेच असते.
(ScienceDirect)
• उत्पादन साधने (Means of Production)
शेती क्षेत्रात उत्पन्नातील असमानता (Gini ~0.6) खूप जास्त आहे.
IDEAS/RePEc
• जमीन जास्त → उत्पन्न जास्त (थेट संबंध)
IDEAS/RePEc
• म्हणजे:
• जमीन = उत्पादन साधन → ज्याच्याकडे जमीन, त्याच्याकडे उत्पन्न व सत्ताराज्यनिहाय उदाहरणे:
• पंजाब: 10% लोकांकडे 80% जमीन
janataweekly.org
• राजस्थान/कर्नाटक: Top 10% → ~55% जमीन.
(ISID Website)
• उत्तर प्रदेश: 15% लोकांकडे ~56% जमीन
janataweekly.orgनिष्कर्ष (Summary):
भारतामध्ये स्पष्टपणे दिसणारे चित्र:
🔴 संपत्ती → काही टक्के लोकांकडे केंद्रित
🔴 जमीन → उच्चवर्ग/मोठे शेतकरी यांच्याकडे जास्त
🔴 दलित, महिला, गरीब → जमीनविहीन किंवा अल्प जमीन
🔴 उत्पादन साधने (land, capital) → असमान वितरणामुळे सामाजिक विषमता वाढते
🧠 एक ओळीत समजून घ्या: ““ज्याच्याकडे जमीन आणि संपत्ती, त्याच्याकडे सत्ता आणि संधी”
आज बदललेल्या परिस्थितीत रोजगार कमी,अस्थिरता वाढली,आर्थिक विषमता वाढली. शोषण वाढले. सरकार वर अन्कुश उच्च शिक्षित लोक ठेवू शकतात. शिक्षण हा एक विनोदाचा भाग झाला. टिंगल टवाळीचा विषय झाला. शिक्षणाला प्रतिष्ठा मिळेनाशी झाली. गुन्ड, बेकायदेशीर व्यवसाय करणारे, भ्रष्ट प्रशासन, नेते, कार्यकर्ते यांना प्रतिष्ठा वाढली.
आता मोठे उद्योग समूह एकमेकांना विकत घेत आहेत. हा क्रानी केपिटलिझम आला.जगभरच्या परिवर्तन चळवळीन्ची पिछेहाट झाली.मक्तेदारी पद्धत वाढत गेली.
स्वातंत्र्य आणि समता
Ambedkar Thoughts 2026 च्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याची स्थिती पाहिली तर सत्य बोलण्याची भीती, विचार स्वातंत्र्य कमी, आर्थिक शोषण वाढले.
समता आणि बंधुता यांचे मूल्य ढासळताना दिसते.
शिक्षण
खऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण.
बाबासाहेबांनी सांगितले होते: “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.”‘शिक्षण वाघीणीचे दुध आहे”याचा विसर आर्थिक कारणाने जगण्याच्या सन्घर्षात पडला.
भारतातील शिक्षणातील असमानता (Education Inequality) ही संपत्ती व जमीन असमानतेशी थेट जोडलेली आहे. खाली तुम्हाला विश्वसनीय आकडेवारीसह स्पष्ट चित्र देतो—
एकूण साक्षरता (Literacy Rate):
• भारताची एकूण साक्षरता: ~73% – 80%
• पुरुष: ~80–82%
• महिला: ~64–65%
(Ministry of Stats & Program Implementation +1)
याचा अर्थ:
अजूनही महिला शिक्षण मागे आहे
• लिंग आधारित असमानता (Gender Inequality)” • भारतातील निरक्षर लोकांपैकी 59% महिला आहेत.
(ORB Institute)
• मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षण कमी प्राधान्य
समाजातील पारंपरिक विचार → मुलांना जास्त शिक्षण
निष्कर्ष:
• शिक्षणात लिंगभेद अजूनही जिवंत आहे
• जातीनुसार असमानता (Caste Inequality):
• दलित (SC) व आदिवासी (ST) मध्ये शिक्षण खूप कमी
एका अभ्यासानुसार:
• दलितांपैकी 37% लोक कधीच शाळेत गेले नाहीत
आदिवासींमध्ये 44% लोक कधीच शाळेत गेले नाहीत.
(PMC)
• SC/ST साक्षरता अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी.
(IJRAR)
निष्कर्ष:
• जात = शिक्षणाची संधी ठरवते
• ग्रामीण vs शहरी असमानता
ग्रामीण भागात:
• शाळा, शिक्षक, सुविधा कमी
शहरी भागात:
• चांगल्या शाळा + कोचिंग
सुमारे 1/3 विद्यार्थी private coaching घेतात (मुख्यतः शहरी)
(The Times of India)
निष्कर्ष:
• शहरात शिक्षण चांगले, गावात कमी
• उच्च शिक्षण (Higher Education Inequality)
• फक्त 10–12% लोक उच्च शिक्षण पूर्ण करतात
(Data For India)
बहुसंख्य लोक:
• प्राथमिक किंवा त्याखालीच शिक्षित
निष्कर्ष:
• उच्च शिक्षण अजूनही सर्वांसाठी उपलब्ध नाही
• ड्रॉपआउट (Dropout Problem)
Class 1 ते 8 मध्ये ~50% विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडतात.
Wikipedia
कारणे:
• गरीबी
• बालमजुरी
• जातीय भेदभाव
• मुलींचे लवकर लग्न
शिक्षणातील असमानतेची मुख्य कारणे
🔴 गरीबी
🔴 जात व्यवस्था
🔴 लिंगभेद
🔴 ग्रामीण-शहरी अंतर
🔴 शिक्षणावर कमी खर्च (GDP ~4% पेक्षा कमी)
Wikipedia
एकत्रित निष्कर्ष (Big Picture)
• भारतात शिक्षणाची स्थिती अशी आहे:
• साक्षरता वाढली आहे (progress)
• पण समानता नाही (inequality कायम)एक ओळीत समजून घ्या:
“ज्याच्याकडे पैसा, जातीय सत्ता आणि शहरातील सुविधा — त्यालाच चांगले शिक्षण”
आज डिजिटल युगात साधने वाढली आहेत. पण गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही.
संविधान
संविधान केवळ कायद्यांचे पुस्तक नसते. तर लोकशाहीचा आत्मा असतो.त्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
डिजिटल युगातील बाबासाहेब
आज सोशल मीडिया, AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे बाबासाहेबांचे विचार अधिक वेगाने पसरत आहेत.हे ही एक चित्र आहे.युवक विचार करतात, चर्चा करतात आणि बदल घडवण्याचा प्रयत्न करतात हे आशावादी चित्र आहे. पण अजून खूप काही बाकी आहे.
आजच्या युवांसाठी संदेश
आजच्या युवकांनी तीन गोष्टी शिकायला हव्यात.प्रश्न विचारण्याची सवय,शिक्षणाची कदर करणे,अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य.
अखेर प्रश्न कायम—
• बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले का?
• शिक्षण सर्वांसाठी समान आहे का?
• जमीन आणि संपत्तीचे वितरण न्याय्य आहे का?
निष्कर्ष
बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत. तर आजच्या आणि उद्याच्या भारतासाठी मार्गदर्शक आहेत.म्हणून ते आजही आवश्यक आहेत. विचार म्हणून. तत्वज्ञान म्हणून. आदर्श म्हणून. दिपस्तम्भ म्हणून. आयकॉन म्हणून. प्रतीक म्हणून. प्रेरणा म्हणून.
“संविधान आहे, पण समता अजून नाही — हाच आजचा भारत.”
“बाबासाहेब आजही आवश्यक आहेत — आणि पुढेही राहतील!”
अधिक माहिती व अभ्यासासाठी लिंकस्
- डॉ. आंबेडकर चरित्र वाचा
- https://www.britannica.com/biography/B-R-Ambedkar
- संविधानावरील कटकारस्थान लेख
- https://www.constitutionofindia.net
- https://www.un.org/en/global-issues/human-rights
सत्यशोधक वरील अन्य लेख
- संविधानावरील कटकारस्थान लेख
- https://www.satyashodhak.blog/conspiracies-on-constitution-b-r-ambedkar-and-v-n-rav/
- Ambedkar facts जाणून घ्या
- https://www.satyashodhak.blog/dr-babasaheb-ambedkar-facts/
- https://www.satyashodhak.blog/dr-b-r-ambedkar-biography-14-din-14-krantilekh/

