Contents
शिरूरमध्ये महिला विनयभंग प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (पुणे),दिनांक : 15 एप्रिल 2026
शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेचा तपशील : फिर्यादी (नाव गुप्तता) , रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 1:38 वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या घरी एकट्या असताना आरोपी शरीफ उस्मान पिंजारी हा दारूच्या नशेत घरात शिरला.असे फिर्यादी यांनी फिर्यादीत नमुद केले आहे.
विनयभंगाची घटना (?) : आरोपीने महिलेचा हात पकडून तिला धमकी दिली की, “जर तू कोणाला काही सांगितले तर तुझ्याकडे व तुझ्या मुलीकडे बघतो.” त्यानंतर त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा विनयभंग केला. यामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.असे फिर्यादी महिला यांना फिर्यादीत नमुद केले आहे.
झटापट व पुरावे : या झटापटीदरम्यान महिलेच्या कानातील टॉप्स पडून हरवले. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिचे नातेवाईक—चुलत सासू, चुलता, आणि चुलत सासरे —घटनास्थळी आले.
आरोपी फरार : नातेवाईक येत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून बजाज डिस्कव्हर (MH-14-DS-1137) या दुचाकीवरून पळून गेला.
गुन्हा दाखल : या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 74, 333, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका : प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.”
अधिक माहितीसाठी लिंक्स:
Maharashtra Police Official
👉 https://mahapolice.gov.in
Indian Penal Code (IPC Sections)
👉 https://indiacode.nic.in
Women Safety Laws India
👉 https://wcd.nic.in
National Commission for Women
👉 https://ncw.nic.in
Crime Reporting Guidelines India
👉 https://mha.gov.in
आणखीन Shirur Crime News वाचा:
Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई
Shirur Crime News : 2.5 तोळ्यांचे गंठण, 55 हजार रोख व दुचाकी चोरीला !
Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी!
