Contents1 Amreen Tariq Mirza Missing – अमरीन तारीक मिर्झा मिसिंग पुणे केस2 Amreen Tariq Mirza Missing Pune : तरुणीचे वर्णन—3 अचानक घरातून बाहेर पडणे : परिस्थिती गंभीरच!4 पोलीस उपाय आणि कारवाई5 कुटुंबीयांची चिंता—6 पुढील पाऊल—6.1 टीप:7 FAQs:7.1 आणखीन,’सत्यशोधक’ बातम्या वाचा-7.2 🙏 सत्यशोधक न्यूजला सहकार्य करा7.3 About The Author7.3.1 Dr.Nitin Pawar Amreen Tariq Mirza Missing – अमरीन तारीक मिर्झा मिसिंग पुणे केस शिरूर, पुणे ग्रामीण – 14 मे 2026, प्रतिनिधी शिरुर पोलीस स्टेशन Amreen Tariq Mirza Missing केस चर्चेचा विषय बनली आहे.शिरूर तालुक्यातील बाबुरावनगर मधील ‘विश्व सोसायटी’ तून एका चिंताजनक घटनेची माहिती समोर येत आहे. 25 वर्षीय आमरीन तारीक मिर्जा ही तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. दिनांक 13 मे 2026 ला सायंकाळी 5 वाजण्याच्या आधी ती घरातून बाहेर पडली होती. तरी अद्याप घरी परत आलेली नाही. तिच्या कुटुंबीयान्ची व गावकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली आहे. आमरीनचे पती, 30 वर्षीय तारीक मिर्जा, जे खाजगी नोकरीमधे कार्यरत आहेत. त्यांनी तत्काळ शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.पोलीस नोंदीनुसार आमरीन अखेर Room No. 02, बाबुरावनगर, विश्व सोसायटी, शिरूर, पुणे ग्रामीण या घरातून बाहेर गेली होती. Amreen Tariq Mirza Missing Pune : तरुणीचे वर्णन— • उंची: सुमारे 5.2 फूट • चेहरा: गोल • केस: काळे, लांब • नाक: बसके • बांधा: मजबुत • कपडे: हिरव्या रंगाचा ड्रेस व हिरव्या लेगीज • पायात: सॅन्डल • गळ्यात: मणीमंगळसुत्र • कानात: सोन्याचे कर्णफुले • भाषा: मराठी व हिंदी शिरुर पोलीस नोंद क्रमांक 66/2026 असा आहे. नोंदणीकृत वेळ 14/05/2026, 00:42 आहे. चौकशी पोलीस हवालदार खेडकर आणि मुंढे पुढील तपास करत आहेत. प्रकरणाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे आहेत. अचानक घरातून बाहेर पडणे : परिस्थिती गंभीरच! पती तारीक मिर्जा यांच्या मते, आमरीन कुणालाही काही सांगितल्याशिवाय घरातून बाहेर गेली आहे. ही अचानक गायब होण्याची घटना कुटुंबीयांसाठी धक्कादायक ठरली आहे.शिरूर पोलीस स्थानिक नागरिकांशी संपर्क साधत आहेत. परिसरातील माहिती गोळा करून शोधकार्य सुरू केले आहे. नागरिकांनी सांगितले की, आमरीन एका शांत सुरक्षित अशा घरात राहते. तिची अचानक गायब होणे सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.पोलीस, कुटुंबीय तसेच स्थानिक मिळून तिला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस उपाय आणि कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी सांगितले: “आमच्या पोलीस दलाने त्वरित शोधकार्य सुरू केले आहे. आमरीनच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही माहितीची तत्काळ खबर द्यावी.” पोलीसांकडून नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा आमरीनला कुठेही पाहिल्यास लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. शिरुर व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. तसेच स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधून माहिती गोळा करण्यात येत आहे. कुटुंबीयांची चिंता— आमरीनच्या पतीसह संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. त्यांच्या मते,”आमरीन ही जबाबदार आणि संस्कारी मुलगी आहे. ती अचानक कुणालाही सांगितलेशिवाय घरातून गेली, हे आमच्यासाठी समजण्यासारखे नाही.आम्ही तिला सुरक्षित घरी आणण्यासाठी पोलीस आणि समाजाची मदत घेऊ.” स्थानिक नागरिकांना तिचा फोटो असल्यास सोशल मीडियावर शेअर करुन मदत करावी. पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. अनेक नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून शोध मोहीमेत सहभाग घेतलेला आहे. पुढील पाऊल— शिरूर पोलीस स्टेशनने शहरातील तसेच ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली आहे. बस स्थानके आणि महत्वाच्या ट्रॅफिक पॉईंट्सवर तपास सुरू आहे.असे समजते. पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही माहिती मिळाली तर कळवावी. असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये एकत्रित चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे.सन्वेदनशील नागरिक काही अपघात, घातपात, मानसिक बाब इ.काळजी करत आहेत.पोलीस, कुटुंबीय आणि स्थानिक समाज मिळून आमरीनला लवकरात लवकर सुरक्षित घरी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीप: आमरीनच्या सुरक्षिततेसाठी जर कोणालाही तिची माहिती असेल तर लगेच Shirur Police Station, Pune Rural शी संपर्क साधावा. Amreen Tariq Mirza Missing Pune घटना उलगडण्यासाठी मदत करावी. FAQs: Q1: आमरीन तारीक मिर्जा कोण आहे? A: आमरीन तारीक मिर्जा, २५ वर्षांची, बाबुरावनगर विश्व सोसायटी, शिरूर, पुणे येथील रहिवासी, 13 मे 2026 रोजी अचानक घरातून गायब झाली आहे. Q2: तिचा शेवटचा दृष्टांत कधी आणि कुठे आहे? A: ती 13 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या आधी रूम नंबर 02, बाबुरावनगर विश्व सोसायटी, शिरूर, पुणे येथून बाहेर गेली. Q3: पोलीस काय कारवाई करत आहेत? A: शिरूर पोलीस आणि स्थानिक रहिवाश शोध मोहीमेत सहभागी आहेत. सीसीटीव्ही तपासणी, ट्रॅफिक पॉईंट्स आणि स्थानिक संपर्क सुरू आहे. Q4: नागरिकांनी काय करावे? A: कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आणखीन,’सत्यशोधक’ बातम्या वाचा- Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई Shirur Crime News: धोकादायक गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात स्थानबद्ध Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी! 🙏 सत्यशोधक न्यूजला सहकार्य करा स्वतंत्र, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी तुमचे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे आहे. ☕ Support Now आपले छोटे सहकार्यही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे ❤️ About The Author Dr.Nitin Pawar Dr. Nitin Pawar is the Founder & Editor of Satyashodhak Blog. He writes on social justice, education, politics and current affairs with a bold, analytical and ground-level perspective. डॉ. नितीन पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण व निर्भीड लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन Breaking News Police Raid at Midnight : येवलेमाथ्यावर मध्यरात्रीची धाड – झुडपांतून पळाले हातभट्टी दारूवा़ले : हजारोंचा मुद्देमाल जप्त