Shirur Illegal Liquor Raid नुसार शिरूर तालुक्यात शिरूर पोलीस ‘सिंघम’ मोडवर असल्याचे दिसून येत आहे !गावठी व विदेशी दारूचा वाल्यांवर पोलिसांनी ‘कहर’ बरसला असल्याचे दारू बाई उध्वस्त झालेल्या आणि होत असलेल्या अनेक कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे व ही कारवाई तसेच कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Contents1 Shirur Illegal Liquor Raid : अष्टविनायक महामार्गालगत सुरू होता दारूचा काळाबाजार?2 हॉटेलच्या मागील भिंतीआड सुरू होता संशयास्पद व्यवहार3 Shirur Illegal Liquor Raid : विदेशी दारूच्या बाटल्यांची संख्या पाहून पोलिसही चक्रावले3.1 जप्त करण्यात आलेला माल–4 आमदाबादमध्ये घराच्या मागे सुरू होता गावठी हातभट्टीचा धंदा5 ग्रामीण भागात दारू विक्रीचे वाढते जाळे चिंतेचा विषय6 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नेमके काय सांगते?7 आणि 17 कमाणीचा पुल?8 पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता9 पोलिस प्रशासनाचा इशारा10 निष्कर्ष10.1 आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या वाचा—10.2 About The Author10.2.1 Dr.Nitin Pawar Shirur Illegal Liquor Raid : अष्टविनायक महामार्गालगत सुरू होता दारूचा काळाबाजार? शिरूर तालुक्यात गेल्या आठवडाभर बेकायदेशीर देसी विदेशी हातभट्टी दारू विक्री आणि गावठी हातभट्टीच्या बेकायदा धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शिरूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. विदेशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली. गेले आठवडाभर सुरू असलेल्या शिरूर पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना सिंघम या हिंदी चित्रपटातील पोलीस नायक असलेल्या अजय देवगन चे आठवण येत आहे आणि त्यातील पोलिसांची देखील आठवण येत आहे.या कारवाईमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरातील अष्टविनायक हायवे रोड लगत तसेच आमदाबाद गावात, सुरू शहरात, झालेल्या या कारवायांमुळे ग्रामीण भागात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणावर सुरू होते , यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हॉटेलच्या मागील भिंतीआड सुरू होता संशयास्पद व्यवहार दि. 18 मे 2026 रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान कवठे येमाई गावाजवळील अष्टविनायक हायवे रोडलगत एका हॉटेलच्या मागील बाजूस काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक शिरुर पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी कुच केले . पोलिस पोहोचताच एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा सापडला. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत विविध ब्रँडच्या व्हिस्कीच्या बाटल्या जप्त, यात मॅक्डॉल्स नंबर 1, डरबी स्पेशल डिलक्स, क्लासिक गोल्ड व इम्पेरियल ब्लू या विदेशी ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश होता. या मुद्देमालाची एकूण किंमत 6 हजार 500 रुपयांची आहे. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लहू सखाराम वागदरे, राहणार-कवठे येमाई याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur Illegal Liquor Raid : विदेशी दारूच्या बाटल्यांची संख्या पाहून पोलिसही चक्रावले शिरूर पोलिसांच्या या कारवाईदरम्यान पोलिसांना मिळालेल्या बाटल्यांची संख्या लक्षवेधी होती. छोट्या आकाराच्या 180 ml बाटल्यांमधून ग्रामीण भागात एक फार मोठे बेकायदेशीर आणि बिग बजेट विदेशी दारू विक्रीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेला माल– • मॅक्डॉल्स नंबर 1 – 4 बाटल्या • डरबी स्पेशल डिलक्स – 12 बाटल्या • क्लासिक गोल्ड – 15 बाटल्या • इम्पेरियल ब्लू – 6 बाटल्या याच बरोबर दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी प्लास्टिकची किटलीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पचार यांनी पंचांसमक्ष जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्येक ब्रँडमधील एक बाटली नमुना म्हणून सील केल्याची माहितीही समोर आली आहे. आमदाबादमध्ये घराच्या मागे सुरू होता गावठी हातभट्टीचा धंदा शिरूर तालुक्यात त्याच रात्री शिरूर पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई आमदाबाद या गावात केली. पोलिस कॉन्स्टेबल सागर कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दिनांक 18 मे रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना आमदाबाद गावात एका घराच्या मागे गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांनी छापा टाकला. परशुराम वसंत पवार यांना हा 35 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू साठवून ठेवताना व तिची विक्री करताना आढळून आला.या कारवाईत सुमारे 3,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण भागात दारू विक्रीचे वाढते जाळे चिंतेचा विषय शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही महिन्यांपासून बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रकार वाढल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती. विशेषतः महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, ढाबे, दुर्गम वस्त्यांमध्ये विदेशी दारू, गावठी हातभट्टी सहज ‘तळीरामाना’ उपलब्ध होत आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.Shirur Illegal Liquor Raid ही कारवाई अशीच पुढे राहणे अपेक्षित आहे.हा मोठा प्रश्न आहे. तरुण दारू पिऊन मरत आहेत. श्रिया विधवा होत आहेत.आणि त्यामुळे बेकायदा वेश्याव्यवसाय वाढीस लागल्याचे चित्र हा आणखीन एक वेगळा विषय आहे. त्याबाबत लवकरच ‘सत्यशोधक न्यूज’ मोठी बातमी देणार असल्याचे समजते. एका स्थानिक ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, “रात्री उशिरा काही ठिकाणी संशयास्पद गर्दी दिसते. बाहेरून येणाऱ्या वाहनांची वर्दळही वाढलेली असते. पोलिसांनी अशा ठिकाणी सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे.” महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नेमके काय सांगते? महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार परवानगीशिवाय दारू बाळगणे, वाहतूक करणे किंवा विक्री करणे हा गुन्हा मानला जातो.मात्र विशेषतः ग्रामीण भागात गावठी हातभट्टी पिणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत दोषी आढळल्यास संबंधित आरोपींवर दंडात्मक व कारावासाची कारवाई होऊ शकते. आणि 17 कमाणीचा पुल? मात्र शिरूर शहराच्या पोलीस हद्दीतील 17 कमानीच्या पुलाच्या अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार एक अड्डा आहे.तिथे शराब आणि शबाब यांची नुमाईश दिवसभर व रात्रीही फार्मावली जात असते. असे एका नागरिकांना सांगितले. या ठिकाणाच्या जवळपास एक पोलीस चौकी देखील आहे. तिथे कारवाई का अद्याप होत नाही? असा सवाल एका सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला आहे. पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता या दोन्ही कारवायांनंतर पोलिस आता दारू पुरवठा नेटवर्कचा तपास करत आहेत. जप्त झालेली विदेशी दारू नेमकी कुठून येत होती ? गावठी हातभट्टीचा माल कोण कोण स्थानिक किंवा शहरात तयार करत होते? यामागे मोठे नेटवर्क आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. शिरुर पोलीस तपास अधिकाऱ्यांनी परिसरातील काही संशयित हालचालींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस प्रशासनाचा इशारा शिरूर पोलिसांनी नागरिकांना बेकायदेशीर दारू विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या कारवायांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. निष्कर्ष Shirur Illegal Liquor Raid या मोठ्या कारवाईने शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू व्यवसायाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. विदेशी दारूच्या बाटल्यांपासून ते गावठी हातभट्टीपर्यंतचा हे जाळे केवळ कायद्याचा भंग नाही. तर ग्रामीण समाजाच्या आरोग्य, कुटुंब सुरक्षिततेसाठीही गंभीर धोका मानला जात आहे. शिरुर पोलिसांनी केलेल्या गेल्या सलग आठवडाभर चालवलेल्या या मोहिमेने अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या घटकांचे धाबे दणालले आहे.भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या साखळीमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे हेच पोलीस प्रशासनासमोरचे खरे आव्हान ठरत आहे. आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या वाचा— Shirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त! Shirur Crime Breaking; शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा Shirur Crime News : एस.टी. आगारात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Farmer Suicide Case : शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या?