नाशिकच्या बाबाची महा-लीला या विषयावर आधारित अशोक खरात प्रकरणावरील विनोदी मराठी कविता thumbnailअशोक खरात प्रकरणावर आधारित उपरोधिक आणि विनोदी मराठी कविता | अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि समाजजागृतीवर भाष्य

नाशिकच्या बाबांची महा-लीला : (उपरोधिक विनोदी मराठी कविता)

22 मे 2026

— नाशिकच्या बाबांची महा-लीला कथा!

— सान्स्कृतिक नाशिक नगरी गाजत होती,

—पोस्टर होते चौकाचौकात ‘सुटबुटातले’,

—“बाबा आले,अनेकांचे भाग्य उजळले!”

—‘लुगड्यान्ची’ लाईन लागली भक्तगणात!

— कोणी म्हणे खरेच “दैवी शक्ती”,

— कोणी म्हणे नव्हे – “साक्षात ज्ञानी”,

—- बाबा उभे ‘ताठ'(😅) मात्र AC रूममध्ये,

—- मोजत होते नोटा आणि ‘वेगळेच’ पाणी!

— गळ्यात मोठी रुद्राक्षमाळ,

—- डोळ्यात भारी ‘गरम’ गूढ प्रकाश,

—- भक्तीनी म्हणती – “देवच अवतरला!”,

—– आतून सुरू होता पैशांचा घमघमाट !

—– कधी अप्सरा,गोर्या यक्षिणी,चिकणे मुखडे,

—- कधी ग्रहांचा उलटा ‘मागून’ खेळ,

—– जो जास्त जरी घाबरला पुढे,

—– त्याच्याबरोबर तसा जास्तच मेळ!

 

— एका ‘गजगामिनी’ ताईनी म्हटले बाबा,

—-“अग अग तुझ्यावर ही काळी सावली!”

— उपाय म्हणून एकान्तात पाच ‘पू’जा,

— आणि फी भारी वेगळी,लय भारी, लय भारी!

—- एका काकांनी तरी विचारलं,

—- “मुलगी पास होईल का?”

—- बाबा म्हणाले “शनी आहे रागात!”

—- आणि घेतले हातात दोन दोन नारळ पहा!

— कोणी आणे भेट सोन्याची चैन,

—- कोणी घेऊन येई हार,

—- बाबांच्या त्या “स्पेशल दर्शनाला”,

—– UPI वरती लागले भार!

—-  मोबाईलवर मागणी फुल व्हिडीओ भक्ती स्टेटस,

—– Facebook वर ‘तोंडात’पाहून जयजयकार,

—- Reels मध्ये बाबा झाले ट्रेंडिंग

—– गोगल जणू काही फिल्मस्टारवाला !

—– “बाबांच्या मिळे कृपेने नोकरी!”,

—– “बाबांच्या कृपेने ठरली लग्ने!”,

—- असं म्हणत म्हणत ‘भक्ती’ वाढली,

—- जसा वाढतो online hot seen scam!

—- आश्रम झाला भारी मोठा,

— गाड्या आल्या काळ्या काचा,

—- भक्त म्हणती ‘वेगळा”चमत्कार’!”

—- शेजारी म्हणती “काय असते काचामागे?”

—- कुणी म्हणे “रात्रीच देवी येते”,

—- कुणी म्हणे “भिंतीआड उपचार !”,

—- अहो पण CCTV लागल्यावर?,

—- सगळे चमत्कार पळतात!

—- पत्रकार आले, बातम्या आल्या,व्हिडीओ आले,

—- Breaking News चा पाऊस पडला ,

—– “मुद्दा बाबांच्या गूढ साम्राज्याचा”

—- TRP वर धंदा मोठा झाला!

—- लॅपटॉप, पेनड्राइव्ह, फायली,व्हिडीओ,

—- पोलीसांनी केल्या जप्त,

— भक्त म्हणाले “नाही, नाही, हे षड्यंत्र आहे!”

—- पण गाव झाले थोडे साशंक!

— ईडी आली,’वेडी’चौकशी झाली,

—  कोट्यवधींची चर्चा झाली भारी,

—- कालपर्यंत तो कसा साधूबाबा?

— आज म्हणती “आर्थिक अधिकारी!”

— एका भक्तिणीने सांगितले,

—- बाबा म्हणाले- देवी येते पण ‘इनडोअर’,

—- पण ‘मागून’येते, नंतर लक्षात आले,

— देवीपेक्षा फीच जास्त वेगळी असते!

— काहींना दिले ‘गुप्त अमृत’ उपाय,

— काहींना खास ‘तोंडी’ मंत्र,

—- जी जास्त श्रीमंत दिसली!

—- त्याच्याकडे जास्तच तंत्र!

—- राजकीय भक्त म्हणाले “बाबा महान!”,

—- विरोधी म्हणाले – “धंदा भारी!”

—- एका रात्रीत – “आध्यात्मिक गुरु”!

—- झाली news channel ची सवारी!

—- कालपर्यंत होता चरणस्पर्श,

—- आज memes आणि jokes,

— काल “परमपूज्य महाराज”,

—- आज WhatsApp वर full trolls !

—- नाशिकपासून पुण्यापर्यंत,

—- चर्चा झाली टपरीवर,

— “देवी येते म्हणणारे बाबा आणि

— ‘देव्या’ व्हिडीओ मधे दिसती लाईनवर,

— स्वतःच अडकले paper वर!”

— एक आजोबा ‘भारी’ बोलले,

— “पूर्वी साधू जंगलात”,

“— आता बाबा व्हिडीओ वर,

— आणि भक्त सारे comments मध्ये,

— एक भक्त म्हणाला रडत,

—- “मी तर सगळं दान केलं ‘हवाली’ !”

—- शेजारी हसतो-“बाबांनी तुलाच scan केलं!”

— कोणी म्हणे “राजकारण आहे”

— कोणी म्हणे “कट रचला”,

—- पण सामान्य माणूस म्हणे,

— “आपणच जरा जास्त भुललो!”

—- अंधश्रद्धेचा market कायमच भारी,

—- भावनांचा होतो व्यापार,

— भीती, दुःख, संकट,आजार,

—- यावरच चालतो संसार!

— जोपर्यंत प्रश्न विचारत नाही,

—- तोपर्यंत बाबा जन्मतात,

— तर्क झोपला की गावोगावी,

— नवीन चमत्कार उगवतात!

— म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा,

—- ज्ञानापेक्षा मोठं काही नाही,

— विज्ञान, विचार, शिक्षण यांना,

— पर्याय अजून मिळाला नाही!

— ना ताईत, ना गंडेदोरे,

— ना ग्रहांचा खोटा खेळ,

— मेहनत, अभ्यास, जागृती यानेच,

—- बदलतो आयुष्याचा मेळ!

– हसाल थोडं या कवितेवर,

— पण अर्थ तिचा खोल आहे,

— भोंदूगिरीच्या अंधाराला,

— प्रश्न विचारणंच तोड आहे!

——————

❤️ कवी: सम्पादक– डॉ.नितीन पवार,शिरुर/पुणे🌹


आणखीन कविता —-

कविता;शिरुरची निवडणूक–2025 स्पेशल!

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support