Cockroach Janata Party म्हणजे काय? एका न्यायाधीशांच्या तरुणांच्या बाबतच्या वक्तव्यावरून पेटलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या संतापाची, औरंगाबादच्या अभिजीत दीपके यांच्या रुपाने नव्या पक्षाची होत असलेली स्थापना. जी सध्या तरी ऑनलाईन आहे. त्या पक्षाचे नाव आहे – Cockroach Janata Party अर्थात ‘ झुरळ जनता पक्ष’! आणि या सध्याच्या भारतीय राजकारणातील नव्या विद्रोहाची एक सखोल स्टोरी. वाचा या मराठी लेखात. Contents1. Cockroach Janata Party : “कॉक्रोच” म्हणणाऱ्यांना बेरोजगार तरुणांचा विद्रोही जवाब!2. कॉक्रोच म्हणजे काय?3. अमिताभ बच्चन अभिनित हिंदी चित्रपट,’ हम’4. शिरुर तालुक्यातील5. पहिली आणि एकमेव बहुभाषिक न्यूज वेबसाईट!”6. “कॉक्रोच” का जोडला गेला तरुणांशी?7. भारतातील सुशिक्षित बेरोजगार : “डिग्री आहे… पण भविष्य नाही”8. प्रस्थापित पक्षांना का वाटतेय भीती?9. Cockroach Janata Party भारताच्या राजकारणाला बदलू शकते का?10. निष्कर्ष10.1. अधिक माहितीसाठी भेट द्या खालील सन्केतस्थळाना—10.2. ‘सत्यशोधक’ चे आणखीन वाचनीय लेख–10.3. About The Author10.3.1. Dr.Nitin PawarCockroach Janata Party : “कॉक्रोच” म्हणणाऱ्यांना बेरोजगार तरुणांचा विद्रोही जवाब!“कॉक्रोच” हा शब्द फक्त अपमान नव्हता… तो संपूर्ण पिढीवरचा जणू हल्ला होता !”देशात आज सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या लाखोंमध्ये नाही तर कोटीच्या खन्खेने आहे आहे.त्यांच्याकडे डिग्रीज आहेत. स्पर्धा परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत.रात्रभर अभ्यासही केलेला आहे.आई-वडिलांनी शेती-भाती विकून फी भरलेली आहे. घरच्यांनी मोठी स्वप्नं पाहिलेली आहेत.असे चित्र आहे.👉 पण नोकऱ्या काही यांना मिळालेल्या नाहीत.आणि अशा वेळी एका न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना “Cockroach” असे संबोधल्याची चर्चा देशभर सुरू झाली.नन्तर त्यांना Different Context मधे ते विधान होते.त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याची सारवासारव केली. सोशल मीडियावर संताप उसळला. कारण “कॉक्रोच” हा केवळ शब्द नव्हता. तो लाखो तरुणांच्या आत्मसन्मानावर मारलेला ‘तमाचा’ होता.कॉक्रोच म्हणजे काय?कॉक्रोच म्हणजे एक असा किडा — ज्याला पाहून लोकांना घृणा वाटते.अन्गावर चुकून आलाच तर spontenious reflex होऊन त्याला झटकले जाते शरीराकडून. इतका तो अगदी subconcious level चा तुच्छ किडा! जो अंधारात जगतो. ज्याला मारण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. ज्याचं अस्तित्व कुणालाही नकोसं वाटतं.अमिताभ बच्चन अभिनित हिंदी चित्रपट,’ हम’मधे अमिताभ चा दारुच्या नशेतील किमी काटकर च्या भावाशी विनोद निर्माण करतारा एक सन्वाद आहे- ‘ दुनिया मे दो तरह के किडे होते है, एक साला गटर से निकलता हे, दुसरा समाज की गन्दगी से निकलता है, पहलेवाले को मारने के लिए बजार मे मिलता है ( एक औषध), लेकिन ये दुसरा वाला जो किडा है उसतो मारने के लिए साला कोई चीज अभितक बनाईच नहीं ‘! आणि आज भारतातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची अवस्था पहलेवाला भी और दुसरेवाला भी पासून वेगळी आहे का?किमान समाजाच्या नजरेत?” बेरोजगारीच्या नरकातून जन्माला आलेली “Cockroach Janata Party”औरंगाबादचे अभिजीत दीपके यांनी अचानक सोशल मीडियावर घोषणा केली —“जर आम्हाला कॉक्रोच म्हणत असाल, तर आम्हीच आता Cockroach Janata Party उभी करणार!”हे अभिजीत पुणे येथे व पुढे अमेरिकेत शिक्षण झालेले तरुण औरंगाबाद येथील आहेत.शिरुर तालुक्यातीलपहिली आणि एकमेव बहुभाषिक न्यूज वेबसाईट!”🖋️ सत्यशोधक ब्लॉग/न्यूजसत्यासाठी… समाजासाठी… निर्भीड, निष्पक्ष आणि निःस्वार्थ!👉अनेक विषय • तीन भाषेत • स्वतंत्र आणि स्वायत्त पत्रकारिता🔹 आम्ही काय देतो? • राजकारण• सामाजिक• आर्थिक• शिक्षण• गुन्हेगारी• आरोग्य• संस्कृतीआणि असे अनेक विषय – सखोल, विश्लेषणात्मक आणि विश्वासार्ह!🌐 कशी वाचाल?1️⃣ वेबसाईट उघडा – satyashodhak.blog2️⃣ वर दिलेल्या भाषा निवडा3️⃣ तुमच्या भाषेतील स्वतंत्र बातम्या, लेख आणि माहिती वाचा!⚠️ एकच बातमी नाही…अनेक विषय – तीन भाषेत – स्वतंत्र आणि मौलिक!🚀 लवकरच उपलब्ध: English + प्रमुख South Indian भाषाதமிழ் • తెలుగు • ಕನ್ನಡ • മലയാളം📢 स्थानिक ते जागतिक विश्वासार्ह बातम्या📱 मोबाइल फ्रेंडली • वेगवान आणि सोपी वेबसाईट❤️ आपला पाठिंबा द्या, सत्यशोधक बना!शेअर करा | वाचा | विचार करा | बदल घडवा!पहिल्यांदा सर्व लोकांना हा विनोद वाटला. मग मीम्स आले. नंतर रील्स बनल्या.आणि काही दिवसांतच हजारो नव्हे तर लाखो तरुण या नावाभोवती जमा होऊ लागले.फोल्लोवर्स तयार झाले.कारण हा पक्ष आता फक्त पक्ष नव्हता. तो संताप होता. ती अपमानाची प्रतिक्रिया होती. तो नाकारलेल्या पिढीचा आवाज होता.“कॉक्रोच” का जोडला गेला तरुणांशी?कारण व्यवस्था तरुणांकडे आज तशीच पाहते —• परीक्षांचे पेपर फुटतात,• भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे अडकतात,• मुलाखतींमध्ये भ्रष्टाचार होतो,• कॉन्ट्रॅक्ट नोकऱ्यांनी भविष्य उद्ध्वस्त होतं,• डिग्री असूनही Swiggy, Zomato, Delivery jobs कराव्या लागतात इ. इ.• समाज कुत्सीतपणे म्हणतो — “काम काहीही करा.पण थोडेफार पैसे कमव! ”पण प्रश्न असा आहे —मग शिक्षणाचं काय?स्वप्नांचं काय?आईच्या, वडिलांच्या कष्टाचं काय?“तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणाल… पण आम्ही जगणार!”कॉक्रोच हा पृथ्वीवरील सर्वात जास्त जिवंत राहणारा जीव मानला जातो.अणुबॉम्बनंतरही तो जिवंत राहू शकतो, असं विज्ञान सांगतं.आणि कदाचित म्हणूनच बेरोजगार तरुणांनी हा शब्द स्वतःसाठी स्वीकारला आहे की काय?कारण — तुम्ही आम्हाला कितीही दाबलं,दडपल, तरी आम्ही पुन्हा उभे राहणार!हा शब्द आता अपमान राहिलेला नाही.तो प्रतिकाराचं प्रतीक बनतोय.भारतातील सुशिक्षित बेरोजगार : “डिग्री आहे… पण भविष्य नाही”एका मध्यमवर्गीय घरातील मुलाची कल्पना करा.वडील शेतकरी.आई मजुरी करते. मुलगा पुण्यात MPSC स्पर्धा परिक्षा तयारी करतो.सकाळी Library त.दुपारी Current Affairs मधे .रात्री Mock Tests साठी. अशी पाच वर्षे गेली.भरती निघाली नाही. निघाली तर कोर्टात अडकली.पेपर फुटला.मेरिट लागली नाही.वयही वाढलं.आणि मग समाज त्याला विचारतो —“अजून काही का करत नाहीस?”ही भारतातील लाखो तरुणांची कहाणी आहे.Cockroach Janata Party फक्त पक्ष नाही… ती डिजिटल क्रांती आहे!आजच्या काळात पक्ष रस्त्यावर जन्माला येत नाहीत.तो जमाना गेला.ते सोशल मीडियावर जन्माला येतात.• Instagram Reels• YouTube Shorts• X Trends• Telegram Groups• WhatsApp Statusयातूनच भावना तयार होतात.Cockroach Janata Party च्या नावावर हजारो मीम्स, पोस्ट्स, व्हिडिओज फिरू लागले. शेअर होऊ लागले,काही याला लोक हसले.ती जुनीच मुरलेली सवय या समाजाची आहे. मग अगदी देशाची मुगल इन्ग्रजान्नी तेल लावून मारली तरी हे एकमेकांना मात्र हसतील! काहींनी टीका केली. पण तरुणांनी एक गोष्ट स्पष्ट केली —“तुम्ही आम्हाला दुर्लक्षित करू शकत नाही.”प्रस्थापित पक्षांना का वाटतेय भीती?• कारण हा वर्ग कोणाचीही “Vote Bank” अजून तरी बनलेला नाही.• तो ‘जाती’च्या चौकटीत पूर्ण बसत नाही. तो ‘धर्मा’च्या ‘वेडा’त पूर्ण बसत नाही.धर्म अफुची गोळी आहे, असं कुठं तरी, कुणी तरी,म्हटलं आहे, ते त्याला गाम्भिर्याने समजले नाही कारण शिकवणार्यालाच ते नीट समजले नाही.आणि अफु तेवढं भारतात वापरले जात नाही. कदाचित ‘दारु’ असं भाषांतर केले असते तर ते लवकर समजलेही असते. आणि ते समजलं असते तर सकाळी सुर्य उगवण्याच्या आत देशात नव्हे तर जगात क्रान्ती झाली असती! वगैरे कोणी कुठे तरी म्हटलेलं ‘कोट’ आठवलं असते.• तो फक्त बेरोजगार आहे.• आणि बेरोजगारी हा भारतातील सर्वात मोठा राजकीय ‘बॉम्ब’ आहे.• जर हा वर्ग एकत्र आला — तर पारंपरिक राजकारण हादरेल.कदाचित!• सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा राग आता उफाळतोयआजचा तरुण शांत दिसतो खरा. पण तो आतून जळतोय.धुमसतोय!तो पाहतो —• नेत्यांची मुलं थेट राजकारणात,• उद्योगपतींची मुलं विदेशात उद्योगपती, त्यांचे पतीउद्योगही, उदा. एपस्टिन फाईल्स, थायलंड वगैरे वगैरे• श्रीमंतांची मुलं स्टार्टअपमध्येआणि स्वतःहा ?• हा Online Form भरतोय.• त्याचं आयुष्य आता — “Application Submitted Successfully” या एका वाक्यावर तरलेले!“कॉक्रोच” म्हणणाऱ्या व्यवस्थेला तरुणांचा सवालजर आम्ही कॉक्रोच आहोत — तर आम्हाला असं बनवलं कोणी?• शिक्षण व्यवस्था?• भ्रष्ट भरती प्रक्रिया?• राजकीय फसवणूक?• खोटे आश्वासन?• की रोजगारविहीन विकास?आणि ‘कॉक्रोच’चे नातलग, जातभाई, वडीलधारी, समाज, इतिहास व त्याची विरासत कॉक्रोच’च नाही का ठरत? शेवटी Species एकच ना- कॉक्रोच किंवा सेपियन्स!हा प्रश्न आता जोरात विचारला जातोय.Cockroach Janata Party भारताच्या राजकारणाला बदलू शकते का?• कदाचित नाही.• कदाचित हो.पण इतिहास सांगतो — मोठ्या क्रांती सुरुवातीला विनोद वाटत आलेल्या आहेत.एका ‘मीम’मधून सुरू झालेली एखादी गोष्ट उद्या आंदोलन बनू शकते.आंदोलनातून संघटना तयार होऊ शकते.आणि संघटनेतून नवं राजकारण जन्माला येऊ शकतं.कदाचित ‘क्रांती'(?) व्यापक सकारात्मक अर्थाने!हा लेख लिहिणारा तरुणान्चे प्रतिनिधित्व करणारा शेवटी एवढंच म्हणेल…हो…मी बेरोजगार आहे.पण मी निकम्मा नाही.मी स्पर्धा परीक्षा दिलीय.मी अभ्यास केलाय.मी संघर्ष केलाय.त्याला खुप बौद्धिक कस्ट करावे लागतात. त्या कष्टाला उर्जाही जास्त लागते. ती दिली आहे.माझ्या घरच्यांनी उपाशी राहून मला शिकवलंय.म्हणून जर व्यवस्था मला “Cockroach” म्हणणार असेल — तर लक्षात ठेवा…कॉक्रोच मरत नाहीत.ते अंधारातून पुन्हा बाहेर येतात.आणि यावेळी ते फक्त जगणार नाहीत… तर प्रश्न विचारणार आहेत!निष्कर्षCockroach Janata Party ही फक्त सोशल मीडिया ट्रेंड नाही.ती भारतीय बेरोजगार तरुणांच्या मानसिक जखमेवर उमटलेली प्रतिक्रिया आहे.ती भारतीय उपखन्डातही फैलावेल.हा राग आहे.ही वेदना आहे.ही चीड आहे. आणि कदाचित… ही नव्या राजकारणाची सुरुवातही असू शकते.अधिक माहितीसाठी भेट द्या खालील सन्केतस्थळाना—labour.gov.in ncs.gov.in cmie.com eci.gov.in‘सत्यशोधक’ चे आणखीन वाचनीय लेख–Ambedkar Jayanti Article Series: 14 Revolutionary Articles by Satyashodhak NewsDonald Trump: Personality Conspiracy – A Critical InvestigationComrade Sharad Patil : काम्रेड शरद पाटील: वर्ग व जातीव्यवस्थेसंबंधी विचारांचे क्रांतिकारी प्रवक्ते | जन्मशताब्दी विशेष लेख |About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनMaharashtra Din : महाराष्ट्र दिनी “माझी मैना गावाकडे राहिली…” ते आजचा महाराष्ट्र – अस्मिता, संघर्ष आणि वास्तव Buddha Compassion : बुद्धाची करुणा आजही जपली ! घायाळ पक्षाला दिले जीवदान!