'Red Alert' Bangladeshi Prostitutes in MIDC?'Red' Allert Bangadeshi Prosicutes in MIDC? : रांजणगाव MIDC परिसरातील पोलिस कारवाईनंतर निर्माण झालेले गंभीर प्रश्न आणि सत्यशोधक टीमचा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

3 मे 2026

‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? : Real Ground Report मात्र आणखीन वेगळा आहे.रांजणगाव MIDC वेश्या प्रकरणात ‘सत्यशोधक टिम ‘ला याबाबत आणखीन माहिती प्राप्त होत आहे.यात मानवी तस्करीचा संशय घेण्यास वाव आहे.

शिरूर गुन्हेगारी बातम्या या आमच्या सेक्कनमधील बातम्या पाहता शिरुर तालुका, कायदा व सुव्यवस्था, लैंगिक शोषण, सामाजिक अस्थिरता आणि पडद्यामागील आर्थिक व्यवहार इ. परिस्थिती धोकादायक बनत आहे. असे दिसते.याबाबत नागरिकांकडुन बरीच माहिती मिळत आहे. त्यानुसार हे हिमनगाचे फक्त दिसणारे टोक आहे. पाण्याखाली हिमनगाचा केवढा भाग असतो हे माहितगाराना वेगळे सांगण्याची गरज नसते.’बाग्लादेशी महिला वेश्या’ सापडल्या आहेत. हे खरे. पुढे वाचा…

‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? : Real Ground Report

MIDC रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वेश्या व्यवसायावर पोलीसानी छापा टाकला. रांजणगाव MIDC पोलिस कारवाई मधे रांजणगाव पोलीस व दहशतवाद विरोधी शाखेची संयुक्त या कारवाईत सात महिलांची सुटका केली गेली आहे.मात्र आता हा विषय काहीसा बांगलादेशी महिला प्रकरण असा बनला आहे.

दिनांक 02/06/2026 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास कारेगावच्या हद्दीतील नगर पुणे हायवे रोडलगतच्या “जयश्री फर्निचरच्या” बाजुला असलेल्या लॉजिंगमध्ये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन व दहशतवादी विरोधी शाखा यांनी संयुक्त छापा मारत कारवाई केली आहे. सदरची कारवाई ही मा. भुषण माने, पोलीस उपअधीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.

‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? केस ला वेगळा आयाम असु शकतो का याची पाडताळणी पोलीस करत आहेत.कारण पासपोर्ट व इतर काही कागदपत्रे शन्शयास्पद आहेत.

त्यांच्या नेतृत्वामध्ये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन व दहशतवाद विरोधी शाखा- पुणे ग्रामीण पोलीस यांच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.’Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC?:या ‘रेड’ मधील आरोपी नावे

1) लुतफ्फर मुज्जमलहक शेख वय- 45 वर्षे, मूळ राहणार-नालीताजल, तालुका- बाजितपुर, थाना-धनियाखाली, जिल्हा-हुगली, पश्चिम बंगाल, सध्या राहणार-कारेगाव, तालुका- शिरूर, जिल्हा,पुणे

2) बबलू साहू सध्या राहणार- कारेगाव, तालुका- शिरूर, जिल्हा, पुणे मूळ राहणार,उडीसा.

यांच्या विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हे महिलांच्या असहायतेच्या फायदा घेऊन त्यांची लैंगिक हेतू साठी अवैधरित्या संगणमताने देहविक्री करत असताना सापडले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी लुतफर शेख याला  अटक करण्यात आलेली आहे.दुसरा आरोपी बबलू साहू हा फरार झाला आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील अशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालविले प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.असे समजते.

‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? – बांगलादेशी महिला?

सदर छापा कारवाईमध्ये एकूण सात महिलांची पोलिसांनी सुटका केली.सुटका केलेल्या महिलांपैकी तीन महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.असे पोलीस सुत्राकडुन समजते.

सदर पीडित महिलांना महिला सुधारगृह, मुंढवा, पुणे येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे. सदर पीडित बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत बांगलादेशामध्ये पाठविण्याची (डिपोर्ट) कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

मात्र काही प्रश्न उपस्थित होत आहेत—

‘Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC? केसच्या अनुषंगाने काही प्रश्न

1. बांगलादेशामधील महिला, परराज्यातील आरोपी केवळ स्वतःच्या बळावर इथे चक्क वेश्या व्यवसाय चालवतात. हे पटायला अवघड जाते. त्यांना स्थानिक,’हात’ पाठिंबा देत नसतील, अशी शक्यता कमी आहे. कोण आहेत हे ‘स्थानिक’ हात?

बांगलादेश सारखा भागातील ‘भुकेकन्गाल’असा काही भाग भारतात काही पोट भरण्यासाठी जागा शोधणे हे बेकायदेशीर असले तरी शेजारील देश म्हणून व पुर्वी एकच देश असणारे हे देश आहेत. आम्ही समर्थन करत नाही. पण स्थानिक लाजचे मालक कोण आहेत? असा प्रश्न पडतो.

2. बांगलादेशामधील महिला सापडल्या हाच मुद्दा रेटून स्थानिक, स्वदेशी, राजस्थानी, नेपाळी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, झोपडपट्टी वाल्या वेश्या, वेश्यावृत्तीच्या वेश्या, त्यांचे दलाल, जे फोटो दाखवून ग्राहकांना माहिती देऊन ‘देणेघेणे’ठरवणारे हस्तक यश इन चौक ते पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी ते पुढे सुप्यापर्यन्त चालणारा हा धन्दा काय पोलिसांना ‘गुप्त’ सुत्राकडुन समजत नाही का?

की एखादी कारवाई करुन इतर ‘महाजाल’आर्थिक कारणासाठी झाकले जात आहे का?

4. मुख्य भाग यात लाखो रुपये बेकायदा कोण कमवते?

5. यश इन चौकात सन्ध्याकाळी काय चित्र असते? ते ठिकाण पोलीस स्टेशन पासून किती अन्तरावर आहे?तेथे सी सी टी व्ही लावलेले आहेत का?

6 . चक्क एक माजी प्रशासनातील कर्मचार्याच्या परवानाधारक हॉटेल cum lodge बाबत नागरिक बोलत आहेत. त्याची सत्त्यता पोलीस पाडताळुन पाहतील, अशी अपेक्षा आहे.

7 . एक तथाकथित पत्रकार म्हणे lodge अगदी कायदेशीरपणे चालवतो? पण परिसरातील नागरिक मात्र वेगळेच काही बोलतात? याची पाडताळणी पोलीस करतील का?

8 . तर चक्क एक पोलीस अधिकारी यात पैसा गुन्तवतो, असे एकाने सांगितले. जर हे खरे असेल तर कायद्याचे रक्षक ‘भक्षक’ बनलेत हे फिल्मी सन्वाद खरे सिद्ध होत तर नाही ना?

9 . कोनत्याही रेडमधे मालक, मेनेजर फरारी किंवा निर्दोष असतात तर प्रत्यक्ष तेथे काम करणारे गरीब व दलित तरुण ताब्यात घेतले जातात?

उदाहरण- शिरुर मधील पोलीस स्टेशन नजीक मागे रेड पडली. मालक, मेनेजर सापडले नाहीत. फरार होण्यात ‘सफल'(?) झाले. काय योगायोग? आणि फरार होण्याचे कौशल्य पहा?

10 . या केसमधे हायवे रोडलगतच्या “जयश्री फर्निचरच्या” बाजुला असलेल्या लॉजिंगमध्ये असे म्हटले जाते, सांगितले जाते. मात्र हे’लॉजिंग’ असुन त्याला नाव मात्र काहीच नाही. 🤣

असो. पण ‘सत्यशोधक’ आपला प्रश्न विचारण्याचा हक्क बजावल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या समाज निर्मिती साठी आयुष्य पणाला लावणारे ध्येयवादी, फुले, शाहु, आम्बेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या प्रेरणा घेऊन जगणारी माणसे ‘सत्यशोधक’ मधे आहेत. हे विसरु नका.

पारनेर पोलीस काय झोपा काढतात काय?

पारनेर पोलिसांच्या अभ्यासात किंवा नकाशात सतरा कमानीच्या पुलाजवळची गावे नसावीत. काही (स्रिगोन्दा हद्दीत ) असावीत. किंवा इतके लाम्बचे अन्तर म्हणजे जरा अवघडच नाही का? आणि पुलाच्या अलिकडे किंवा पलीकडे पलायन केले गेले तर अधिकार क्षेत्र बदलते ना? जणू हिना फिल्म मधे भारत व पाकिस्तान यांची सिमा चुकून बदलते. आणि एका शोकांतिकेला जन्म देते.

अभिनंदन कारवाई बद्दल व हातभट्टी विरोधी मोहिमेबद्दल🙏

मात्र आम्ही अभिनंदन जरुर करतो जो बेकायदेशीर दारू वर पोलीसानी घातलेला घणाघात याचे!मटका, जुगार, हातभट्टी दारू, दलाल तरुण,’ चटक ‘ लागलेल्या काही यौवना,काहींचे कुटुंब प्रमुखच दलालाच्या भुमिकेत, पोलीस स्टेशन मधेच मारामारी सुरु करण्याचे निर्माण झालेले धाडस, बेकायदेशीर शस्रे उपलब्ध असणे, फायरिंग न घाबरता बिनधास्त करणे, मुडदे पाडणे, मिसिंग, अल्पवयात पळून जाणे, नेणे, म्हणजे कसली भिती नाही.

कायद्याचा धाक नाही, किंवा माहिती नाही. काही रिक्षावाले थोडे पैसे जास्त मिळतात, म्हणून वेळी अवेळी ‘वाहतूक’ करतात. कधी पान्ढरी कार,कधी काळी काच असणारी महागडी चाकी वाहने चर्चेत येतात. पण पुढे तपास काय होतो. ते सम्बन्धितानाच माहीत.

तात्पुरता मिळणारा पैसा पहायचा की दुरगामी होणारा परिणाम पहायचा? हा नैतिकतेचा, विवेकाचा प्रश्न आहे.

” एक मात्र आहे की स्वतः च्या घराच्या फार जवळ हे आले आहे. काहींच्या घरात शिरलेही आहे. पुढच्या पिढ्यान्चे जीवन कुत्र्याच्या जगण्यासारखे होणार हे दिसते!”- सत्यशोधक न्यूज

या प्रकरणात सदरची कारवाई ही मा. संदीप गिल साहेब,पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण,श्री. प्रशांत ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी,शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. भुषण माने, पोलीस उपअधीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांच्या नेतृत्वामध्ये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे श्री. अविनाश थोरात, पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. संतोष औटी, पो. हवा. विलास आम्बेकर, ब्रह्मा पवार, विजय सरजिने, संदीप जगदाळे, पो. कॉ. संतोष साळुंखे, अमोल रासकर, किशोर शिवणकर, योगेश गुंड, म. पो. हवा. विद्या बनकर, म. पो. कॉ. मोहिनी पाटील, म. पो. कॉ. शुंगांगी लबडे, सोनाली जगताप इ.

तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस अंमलदार सहा. फौज. महेश गायकवाड, सहा. फौज. विशाल गव्हाणे, पो. कॉ. ओंकार शिंदे, पो. कॉ. मोसिन शेख, पो. हवा. गणेश चंदनशिव यांचे दोन वेगवेगळे पथके तयार करून करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यांचा पुढील तपास श्री. महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. अविनाश थोरात, रांजणगाव MIDC पो. स्टे. हे करीत आहेत.’

Red Alert’ Bangladeshi Prostitutes in MIDC?  आणि  MIDC ग्राउंड रिपोर्ट प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा आहे. वाचा, शेअर करा.

लेखात आम्ही “हे हिमनगाचे फक्त टोक आहे” अशा वाक्यांसोबतच “सत्यशोधक न्यूज च्या अनेक दाव्यांची स्वतंत्र पडताळणी करत असून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही” हे आम्ही जाणतो.

FAQs : नेहमी विचारले जाणारे प्रश्न–

प्रश्न 1. रांजणगाव MIDC परिसरात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली?

उत्तर: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत संशयित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून काही महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

प्रश्न 2. ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय का व्यक्त केला जात आहे?

उत्तर: प्राथमिक चौकशीत काही महिलांच्या ओळखपत्रे, वास्तव्य आणि नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास आणि कागदपत्र पडताळणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रश्न 3. या प्रकरणामुळे कोणते गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत?

उत्तर: मानवी तस्करी, बेकायदेशीर वास्तव्य, कायदा-सुव्यवस्था, कामगार वसाहतींची सुरक्षा, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि पडद्यामागील आर्थिक साखळी याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्यांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

आणखीन ‘सत्यशोधक’ बातम्या —

रात्रीस खेळ चाले ; या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)

बालवधू वेश्या बनल्याची कथा

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support