Breaking News Firing Shirur Case : शिरूर तालुक्यातील रस्ते अपघातात विशाल काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर समोरासमोर धडकलेल्या दोन चारचाकी गाड्याशिरूर तालुक्यातील अपघातात विशाल काळे यांचा मृत्यू; दोन कारची समोरासमोर धडक.नन्तर गोळीबार?

शिरूर, दि. 1 जून 2026

Breaking News Shirur Firing Case ही शिरुर तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. यात विशाल काळे याचा मृत्यू झाला आहे. शिरुर पोलीस तातडीने तपास करत आहेत. पण सम्पुर्ण शिरुर नव्हे तर पुणे जिल्हा या घटनेने हादरुन गेला आहे. कारण स्पष्ट पुढे आलेले नाही.

Breaking News Firing Shirur Case : चित्तथरारक ! अनेक प्रश्न?

Breaking News Firing Shirur case पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सरदवाडी हद्दीत आज सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार राजस्थान ढाब्यासमोर दोन वाहनांमध्ये धडक घडवून आणली गेली. नन्तर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात विशाल काळे ठार झाला आहे. हा रेकार्ड वरील गुन्हेगार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा टायझर (MH 12 XQ 5104) या कारमधून उमेश अनिल जगदाळे,वय- 26 वर्ष, केदार झाडगे विशाल काळे हे तिघेजण न्हावरा बाजूकडून शिरूरकडे येत होते. त्यावेळी किया सोनेट (MH 14 LA 1128) या कारने त्यांच्या वाहनास धडक दिली.

Breaking News Shirur Firing Case : चार राउंड फायरिंग गाडीच्या काचेवर!

त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी टायझर कारच्या पुढील काचेवर अंदाजे चार राऊंड फायर केले केल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर तिघेही कारमधून उतरून पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी पुन्हा त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

Breaking News Shirur Firing Case Update—

” दरम्यान आणखीन माहिती पुढे येत आहे. त्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. काही वर्षांपूर्वी शिरुर नगरपालिकेचे मा. दिवन्गत नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भिषण खुन शिरुरच्या मध्यवर्ती पाच कन्दील चौकाजवळ झाला होता. तालुक्यातील ही पहिलीच भयंकर घटना होती. शिरुरसह पुणे जिल्हा या घटनेने हादरला होता. शिरुरला लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. जमावबन्दीचा आदेश दिला गेला होता. पोलिसांवर देखील हल्ल्याच्या घटना घडली होती.त्या खुनात हा काळे व यादव या दोघांचे नाव होते. ते मित्र ही होते. तरी यादव याने हे कृत्य का केले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांसमोर या तपासाचे आव्हान मानले जात आहे.”

या घटनेत विशाल काळे, वय – 30, राहणार-शिरूर याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा देखील आढळल्या आहेत. घटनास्थळी दोन रिकामी काडतुसे तसेच अनेक मोठे दगड आढळून आले आहेत.

दुसरा जखमी केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश अनिल जगदाळे हा घटनास्थळावरून पळून गेला होता.

उमेश जगदाळे पोलिसांच्या संपर्कात?

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

आरोपी सनी यादव राहणार- बकोरी फाटा, वाघोलीआणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृत विशाल काळे आणि संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. अधिकृत माहिती आल्यानंतर पुढील अपडेट दिले जातील.

Breaking News Firing Shirur Case : FAQ वारन्वार विचारले जाणारे प्रश्न—

Q1. विशाल काळे यांचा अपघात/खून नेमका कुठे झाला?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार हा भीषण रस्ते अपघात शिरूर तालुक्यात घडला.

Q2. अपघातात कोणाचा मृत्यू/खुन झाला?
उत्तर: या अपघातात विशाल काळे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Q3. अपघात कसा झाला?
उत्तर: आधी दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. (?) असे हा अपघात घडल्यानन्तर सांगितले जात आहे.

Q4. अपघातात आणखी कोणी जखमी झाले का?
उत्तर: जखमींबाबतची अधिकृत माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.मात्र ‘जगदाळे’ नावाच्या तरुणाचे नाव बोलले जात आहे.

Q5. अपघातानंतर मदतकार्य कसे करण्यात आले?
उत्तर: स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

Q6. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?
उत्तर: पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Q7. अपघातातील वाहनांचे नुकसान किती झाले?
उत्तर: दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे छायाचित्रांवरून दिसून येते.

Q8. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी कोणती काळजी घ्यावी?
उत्तर: वेगमर्यादा पाळणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, सीटबेल्ट वापरणे आणि सावधपणे वाहन चालवणे आवश्यक आहे.

Q. 9.महेंद्र मल्लाव या नावाचा काय सन्दर्भ येत आहे?

उत्तर- माजी नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा काही वर्षांपूर्वी शिरुर मधे भीषण खुन झाला होता. त्यात यादव व काळे यांची नावे होती.

Breaking News Firing Shirur Case व महेंद्र मल्लाव खुन प्रकरण सन्दर्भ यांची चर्चा परिसरात होत आहे. तर्क वितर्क लावले जात आहेत.

आणखीन ‘शिरुर क्राईम न्यूज’ वाचा- फक्त “Firing News’-

Shirur Crime Savindane Firing Incident: परवानाधारक पिस्टलचा गैरवापर, तिघांवर गुन्हा दाखल

Shirur Crime Breaking ; शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा

शिरुर मधे गोळीबार करणार्यास आप तासात पकडले !

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support