31 मे 2026, शिरुर Shirur Crime Hathbhatti Daru बनवणे व विक्रीवर शिरुर पोलीसाची कारवाई सलग काही दिवसांपासून सुरु आहे. आज शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा व विक्रीसाठी साठा करणार्यांविरुध्द रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. Contents1 Shirur Crime Hathbhatti Daru : 1.05 लाखांचा मुद्देमाल जप्त, सराईत आरोपीला अटक!2 Shirur Crime Hathbhatti Daru : निमगाव भोगीचा आरोपी?3 गुप्त माहितीच्या आधारे कारवाई—4 काय जप्त करण्यात आले?5 घटनास्थळीच नाश—6 आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे—-7 पोलिसांचे पथक-—-7.1 About The Author7.1.1 Dr.Nitin Pawar7.2 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Crime Hathbhatti Daru : 1.05 लाखांचा मुद्देमाल जप्त, सराईत आरोपीला अटक! या कारवाईत सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. Shirur Crime Hathbhatti Daru : निमगाव भोगीचा आरोपी? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसान निलेश गुलाब लोंढे,वय- 34 वर्ष राहणार- शेवाळे वस्ती, निमगाव भोगी, तालुका- शिरूर याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 250/2026 दाखल असा करण्यात आला आहे. आरोपीला 29 मे 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांनी त्याला 3 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई— 29 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास निमगाव भोगी गावाच्या हद्दीतील शेळके वस्ती परिसरात राजणगाव पोलिसांनी छापा टाकला. या वेळी आरोपी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, काही तयार दारू व अन्य साहित्य बाळगलेला सापडला. काय जप्त करण्यात आले? पोलिसांनी कारवाईदरम्यान पुढील मुद्देमाल जप्त केला.500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन (अंदाजे किंमत ₹10,000), 👉200 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (अंदाजे किंमत ₹20,000), 👉एक पांढऱ्या रंगाची अल्टो कार,क्रमांक – MH-12-PN-3634 किंमत ₹75,000 असा एकूण ₹1,05,000 किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळीच नाश— विशेष बाब म्हणजे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, खड्डे व साहित्य हे दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने घटनास्थळीच पोलीसाकडून नष्ट करण्यात आले. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पुन्हा अवैध दारू निर्मिती होण्यास प्रतिबंध होणार असल्याचे पोलिसांचे मत आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे—- पोलिस नोंदीनुसार आरोपी निलेश लोंढे विरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे तो या प्रकारातील सराईत आरोपी मानला जातो. प्राथमिक तपासात हे समोर आले आहे. पोलिसांचे पथक-—- ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके,विलास आंबेकर,संतोष औटी,उमेश कुतवळ,योगेश गुंड, विद्या बनकर,किशोर शिवणकर,अमोल रासकर,अजित पवार व चालक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची ही मोहीम सुरू राहणार आहे.अशा प्रकारच्या कारवायांना आगामी काळातही वेग दिला जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्राकडुन देण्यात आली आहे. Breaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल Shirur Crime Drugs News : मोठी बातमी? शिरूरमध्ये अमली पदार्थ प्रकरण उघड; तिघांना अटक, 21.52 लाखांचा मुद्देमाल जप्त! Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Gold Loan Fraud Ranjangaon : रांजणगावमध्ये बनावट सोन्यावर गोल्ड लोन?