27 May 2026 : प्रतिनिधी Gold Loan Fraud Ranjangaon प्रकरणात रांजणगाव MIDC HDFC च्या रांजणगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवले गेले. त्यावर गोल्ड लोन उचलले गेले. या प्रकरणात तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. अशी धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे.Contents1. Gold Loan Fraud Ranjangaon नुसार HDFC बँकेची 17.76 लाखांची फसवणूक, दोघांना अटक2. Gold Loan Fraud Ranjangaon : रांजणगाव पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल3. गोल्ड लोन व्हॅल्यूअर गुन्ह्यात सामील?3.1. About The Author3.1.1. Dr.Nitin PawarGold Loan Fraud Ranjangaon नुसार HDFC बँकेची 17.76 लाखांची फसवणूक, दोघांना अटकGold Loan Fraud Ranjangaon MIDC HDFC च्या रांजणगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवले गेले. त्यावर गोल्ड लोन उचलले गेले. या प्रकरणात तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. अशी धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे.या प्रकरणमधे रांजणगाव पोलिसांनी 12 जणांविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल केला आहे. यात दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.Gold Loan Fraud Ranjangaon : रांजणगाव पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखलया प्रकरणी शैलेश लालासाहेब जाधव,वय – 33, राहणार- शुक्रवार पेठ, हवेली, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 335/2026 असा आहे.भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 338, 336(3), 340(2), 3(5) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार Gold Loan Fraud Ranjangaon प्रकरणात आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर याच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक 3 ते 10 यांनी बनावट सोने खरे असल्याचा आभास निर्माण केला. ते सोने रांजणगाव शाखेत गहाण ठेवले. त्यानंतर संबंधितांनी गोल्ड लोन घेतले. अशा पद्धतीने बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केली.गोल्ड लोन व्हॅल्यूअर गुन्ह्यात सामील?रांजणगाव पोलीसान्च्या या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बँकेने नेमलेला गोल्ड लोन व्हॅल्यूअर संजय हिराचंद पंडित याने सदरचे सोने बनावट असल्याची माहिती असतानाही ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळेच बँकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.Gold Loan Fraud Ranjangaon प्रकरणात गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर,राहणार- राजापूर, तालुका- श्रीगोंदा, जिल्हा-अहिल्यानगर आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार,राहणार- संकल्प सिटी, रांजणगाव, तालुका-शिरूर यांना पोलिसांनी 25 मे 2026 रोजी रात्री अटक केली.यापैकी आरोपी लक्ष्मण वीर याला 29 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर आरोपी मच्छिंद्र खैरनार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.ही फसवणूक 18 जानेवारी 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधी दरम्यान बेन्केच्या रांजणगाव शाखेत घडल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय तिडके करत आहेत. तर पोलीस निरीक्षक श्री. एम. एस. वाघमोडे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.Read more>>>Shirur Crime News: शिरूर तालुक्यात डाळींब फळांची ४.५ लाखांची चोरी, पोलिसात गुन्हा दाखल!Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीलाShirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहारAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Missing Woman Case 2026 : शिरूरमधून 25 वर्षीय महिला बेपत्ता? Hathbhatti Daru : शिरूर तालुक्यात गावठी हातभट्टी दारूवर कारवाई सुरुच