Contents1. Shirur Crime Drugs News मेफेड्रान शिरुरमधे : चिंताजनक परिस्थिती?1.1. आणखीन Shirur Crime च्या बातम्या वाचा>>>>1.2. About The Author1.2.1. Dr.Nitin PawarShirur Crime Drugs News मेफेड्रान शिरुरमधे : चिंताजनक परिस्थिती?शिरूर (पुणे), दि. 17 एप्रिल 2026 : प्रतिनिधीShirur Crime Drugs News हाती येत आहे. शिरुर मध्ये अलीकडच्या काळात प्रथमच अमली पदार्थ मेफेड्रोन व इतर गंभीर स्वरूपाच्या अमली पदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती . याचा अर्थ अशा घाटके आम्ही पदार्थांचा वापर तरुणांमध्ये किंवा इतर कोणी यांच्यामध्ये होत आहे. ही बाब निश्चित चिंताजनक आहे.आता शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 335/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 3(5) तसेच एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8(क), 21(ब) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार तुषार अशोककुमार पंदारे यांनी फिर्याद दिली आहे.दि. 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1:35 वाजण्याच्या सुमारास मौजे शिरूर येथील बाबुराव नगर ते न्हावरे (कानीफनाथ) फाटा रोड परिसरात, पाटील वॉशिंग सेंटरपासून बाबुरावनगरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर कच्च्या रस्त्याच्या कडेला पोलिसांनी ही कारवाई केली.या कारवाईत विशाल मारुती मोरे (वय 20, रा. बाफनामळा, शिरूर), प्रतीक संतोष लंघे (वय 25, रा. करडे, शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय 26, रा. रामलिंग रोड, शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.तपासादरम्यान आरोपींकडून मॅफेड्रोन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. विशाल मोरे याच्याकडून 42.18 ग्रॅम, प्रतीक लंघे याच्याकडून 3.24 ग्रॅम आणि मिथुन सिंग याच्याकडून 2.18 ग्रॅम असा एकूण 47.60 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 9 लाख 52 हजार रुपये इतकी आहे.याशिवाय आरोपींकडून 20 रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, एक मारुती वॅगनार कार (क्र. MH12 JC 4894) आणि एक हुंडाई वेरना कार (क्र. MH12 VC 9200) असा एकूण सुमारे 21 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत. तर कारवाई पोलीस हवालदार आगलावे यांनी केली असून, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.👉 अशाच ताज्या अपडेट्ससाठी Satyashodhak News सोबत राहा.आणखीन Shirur Crime च्या बातम्या वाचा>>>>Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak NewsShirur Crime News Nimone | निमोणे येथे शेताच्या वादातून ऊस चोरीचा प्रकार Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीलाAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनBreaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल Shirur Crime: हातभट्टीवर पोलिसांचा धडाका, अनेक आरोपी फरार