Breaking Shirur Crime News : शिरूर पोलिस स्टेशनमध्ये 24.38 लाखांची फसवणूक प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखलशिरूरमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking Shirur Crime News Cheating For 24.38 lakhs

शिरूर (पुणे), दि. 23 एप्रिल 2026 : प्रतिनिधी

Breaking Shirur Crime बातमी हाती येत आहे. शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक केल्याची घटना उडडकीस आली आहे. शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील एका साखर कारखान्याशी संबंधित 24 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 352/2026 असा नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी श्री. राहुल रामदास भाकरे,वय- 36, राहणार-माळवाडी, टाकळीहाजी, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे यांनी तक्रार दिली आहे.तर या प्रकणात आरोपी गोरख भारमल राठोड,नितीन तुळशीराम चव्हाण,ज्ञानेश्वर गबरु राठोड, सर्व राहणार- घोडेगाव, तालुका-चाळीसगाव, जिल्हा-जळगाव हे आहेत.

दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी सुमारे 12 वाजता रावडेवाडी येथील पराग अॅग्रो फुड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या साखर कारखान्यात हा प्रकार घडला. आरोपींनी ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून फिर्यादी व कारखान्याचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या रकमा त्यांच्या बँक खात्यावर घेतल्या.गोरख राठोड – ₹8,18,000,नितीन चव्हाण – ₹4,86,000,ज्ञानेश्वर राठोड – ₹11,34,000

अशा प्रकारे एकूण ₹24,38,000 रक्कम घेतल्यानंतर काम न करता फसवणूक केल्याचा आरोप या तिघांवर आहे.

या प्रकरणी 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:34 वाजता शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल अंमलदार पोलीस हवालदार जाधव हे आहेत. पुढील तपास पोलीस सब ईन्स्पेक्टर पवार हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखली हा पुढील तपास चालू आहे.

👉 अशाच अपडेट्ससाठी Satyashodhak News सोबत राहा.

Read more >>>>

Shirur Crime Savindane Firing Incident: परवानाधारक पिस्टलचा गैरवापर, तिघांवर गुन्हा दाखल

Shirur Crime Breaking : शिरूर तालुक्यात धक्कादायक अपघात, ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा मृत्यू

Shirur Crime Breaking ; शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हा

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support