Contents1. Shirur Police Action 2026 Report Details2. Shirur Police Action 2026- धडक कारवाई; गुन्हेगारीवर कडक नियंत्रण:2.1. Read more ‘Shirur Crime’>>>>2.2. About The Author2.2.1. Dr.Nitin PawarShirur Police Action 2026 Report Detailsदिनांक 21 एप्रिल 2026 : सत्यशोधक टिमShirur Police Action 2026 चा लेखाजोखा शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षण सन्देश केन्जळे यांना प्रसिद्धीस दिला आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर drug MD Mafedron ताब्यात घेऊन 21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 2024-25 व 2025-26 या कालावधीतील कामगीरीची माहिती देण्यात आली आहे.Shirur Police Action 2026- धडक कारवाई; गुन्हेगारीवर कडक नियंत्रण:शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली 2024–2026 या कालावधीत विविध प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक धडक मोहिमा राबवण्यात आल्या असून त्याची अधिकृत माहिती पोलीस विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. गोपनीय बातमीदारांच्या मदतीने केलेल्या कारवाईत 16 बेकायदेशीर गावठी पिस्तुले आणि 23 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात 23 आरोपींना अटक करण्यात आली असून अजूनही शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.अवैध दारू विक्री, वाहतूक आणि गावठी हातभट्टी निर्मितीवरही कठोर कारवाई करण्यात आली. एकूण 134 गुन्हे दाखल करून 127 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काही नाशवंत मुद्देमाल नियमांनुसार नष्ट करण्यात आला आहे.अमली पदार्थांविरोधातही पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. गांजासंदर्भात 8 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 3 लाख 14 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आणि 13 आरोपींना अटक करण्यात आली.तसेच एमडी (MD) ड्रग्स प्रकरणात 5 गुन्हे दाखल करून तब्बल 21 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई सुरू आहे.Shirur Police Action 2026 मधील ही बाब लक्षणीय आहे.संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘मिनी मोक्का’ अंतर्गतही पावले उचलण्यात आली. वारंवार गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 111 आणि 112 अंतर्गत कारवाई करण्यात आली.दरोडा, जुगार आणि चोरी करणाऱ्या टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले.रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 व 56 अंतर्गत अनेक आरोपींना तडीपार करण्यात आले.काही आरोपींना दोन वर्षांसाठी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. खंडणी, चोरी, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर ही कारवाई करण्यात आली.याशिवाय, एकूण 4775 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.Shirur Police Action 2026 मधे विशेष म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. ब्लॅक फिल्म असलेल्या 124 वाहनांवर कारवाई करून 1.40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करून 68 वाहनांवर 68 हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच 30 सायलेन्सर नष्ट करण्यात आले.बुलडोझर वापरून प्रथमच कारवाई करण्यात आली.Shirur Police Action 2026 मधे ही बाब चर्चेची ठरली.फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या 1653 वाहनांवर कारवाई करून 8.35 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10,689 वाहनांवर कारवाई करून तब्बल 1.98 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूणच 19 कोटी 75 लाख 82 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे,संदीप सिंह, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरिक्षक सन्देश केन्जळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर आणि धडक कारवाया सुरू राहतील, असा इशारा शिरुर पोलीस प्रशासनाने दिला आहे.Read more ‘Shirur Crime’>>>>Shirur Crime Savindane Firing Incident: परवानाधारक पिस्टलचा गैरवापर, तिघांवर गुन्हा दाखलShirur Crime Breaking : शिरूर तालुक्यात धक्कादायक अपघात, ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा मृत्यूShirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाईAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनPune Corporation Tender Controversy: बाणेर वसतिगृह प्रकरणात टक्केवारीचा आरोप Breaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल