15 जुलै 2026,प्रतिनिधी Shirur BSNL Office Theft : शिरूरमधील बीएसएनएल कार्यालयात घरफोडी झाली आहे.यात १.५८ लाखांचे मदरबोर्ड चोरीला गेले आहेत. सविस्तर बातमी वाचा…..Contents1. Shirur BSNL Office Theft घटना शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील बीएसएनएल कार्यालयात2. Shirur BSNL Office Theft : बीएसएनएल कंपनीचे ३३ मदरबोर्ड (पीसीबी) लम्पास3. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल3.1. About The Author3.1.1. Dr.Nitin PawarShirur BSNL Office Theft घटना शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील बीएसएनएल कार्यालयातशिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील बीएसएनएल कार्यालयात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे १ लाख ५८ हजार ४०० रुपयांचे कंपनीचे मदरबोर्ड (पीसीबी) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Shirur BSNL Office Theft : बीएसएनएल कंपनीचे ३३ मदरबोर्ड (पीसीबी) लम्पासपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १३ जुलै रोजी सकाळी ९.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील इतर खोल्यांचे कुलूप तोडून बीएसएनएल कंपनीचे ३३ मदरबोर्ड (पीसीबी) चोरून नेले.शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलयाप्रकरणी राजेश बळीराम भुरले ,वय – 43 , राहणार-वाघोली, तालुका- हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Shirur BSNL Office Theft गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.आणखीन बातम्या वाचा—-Shirur Crime Police Action News : आलेगाव पागा येथे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखलShirur Crime : तर्डोबाचीवाडीत गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखलBreaking Shirur Crime : शिरूरमध्ये 24.38 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखलAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Crime Police Action News : आलेगाव पागा येथे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल Sardawadi Bike Theft : सरदवाडी येथे ३० हजारांची मोटारसायकल चोरी; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल