Shirur Crime अन्तर्गत शिरूर पोलिसांनी तर्डोबाचीवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे Shirur Crime तर्डोबाचीवाडी गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर पोलिसांनी तर्डोबाचीवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तर्डोबाचीवाडी (ता. शिरूर) येथील राहत्या घराच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला छोटुबाई तानाजी पवार (वय 53) या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी महिला पाच लिटर गावठी दारूसह आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुशिल चंद्रकांत सुरवसे यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 526/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत. Read more — Shirur Crime Savindane Firing Incident: परवानाधारक पिस्टलचा गैरवापर, तिघांवर गुन्हा दाखल Shirur Crime News : 2.5 तोळ्यांचे गंठण, 55 हजार रोख व दुचाकी चोरीला ! ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Murder Case 2026 : शिरूरमधील खून प्रकरणी सात आरोपींना अटक; 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी! Shirur Police Station : शिरूर तालुक्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत सलग कारवाया; 8 जणांवर गुन्हे