IMG 20260315 WA0002

Shirur Police Station : शिरूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याची विशेष मोहीम राबवत तालुक्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू व बेकायदा मद्यविक्री प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

7 जून 2026

Shirur Police Station शिरूर तालुक्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत सलग कारवाया; 8 जणांवर गुन्हे

शिरूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याची विशेष मोहीम राबवत तालुक्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू व बेकायदा मद्यविक्री प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

तर्डोबाचीवाडी, कुरुळी, नागरगाव, न्हावरे, उरळगाव, राक्षेवाडी, मांडवगण फराटा आणि कवठे यमाई या भागांत पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.

पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बेकायदा मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.