Country Made Pistol Seized in Maharashtra ही Breaking News हाती येत आहे. शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपी जेरबंद केले आहेत.तर तीन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. शिरूर, पुणे | प्रतिनिधीCountry-Made Pistol Seized in Maharashtra या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹1.24 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Contents1. Country-Made Pistol Seized in Maharashtra : न्हावरे-तळेगाव ढमढेरे रोडवरील बसस्टॉप परिसरातील घटना2. Country Made Pistol Seized in Maharashtra : गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त3. Country Made Pistol Seized in Maharashtra : 18 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी3.1. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट पाहू शकता:4. FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न —4.1. आणखीन शिरुर क्राईम न्यूज वाचा—4.2. About The Author4.2.1. Dr.Nitin PawarCountry-Made Pistol Seized in Maharashtra : न्हावरे-तळेगाव ढमढेरे रोडवरील बसस्टॉप परिसरातील घटनापोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील अधिकारी दिनांक 14 जून 2026 रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली. विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय 31, रा. आंबेडकरनगर, ता. शिरूर, जि. पुणे) हा मौजे न्हावरे गावाजवळील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रोडवरील बसस्टॉप परिसरात पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली.Country Made Pistol Seized in Maharashtra : गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे जप्तमाहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्या कमरेतून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.Country Made Pistol Seized in Maharashtra याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 561/2026 अन्वये शस्त्र अधिनियम, 1959 च्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे बापू कोंडीबा पारखे (वय 31, रा. सरकेवस्ती, निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याकडे दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी बापू पारखे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत राऊंड जप्त केले.Country Made Pistol Seized in Maharashtra : 18 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडीदोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून 18 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी जप्त केलेली गावठी पिस्तुले ही भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर शस्त्रांच्या श्रेणीत येतात.भारतातील शस्त्र कायद्याबाबत अधिक माहितीसाठीभारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट पाहू शकता:https://www.mha.gov.inतसेच शस्त्र अधिनियम, 1959 ची माहिती भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे:https://legislative.gov.in.पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाण यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय काळेकर, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.Country Made Pistol Seized in Maharashtra या गुन्हेगारी मागे असणारे मुळ शोधून ते नष्ट का करता येवू नये?” हाच खरा प्रश्न आहे. कारण तेवढी सरकारची क्षमता नक्कीच आहे.”FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न —Q1. शिरूर पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?उत्तर: शिरूर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.Q2. या कारवाईत किती पिस्तुले जप्त करण्यात आली? उत्तर: पोलिसांनी तीन गावठी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत.Q3. किती जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली? उत्तर: कारवाईदरम्यान चार जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आली.Q4. ही कारवाई कोणत्या पोलीस पथकाने केली? उत्तर: शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाने ही कारवाई केली.Q5. आरोपींना कुठून ताब्यात घेण्यात आले? उत्तर: न्हावरे-तळेगाव ढमढेरे रोडलगत असलेल्या परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.Q6. मुख्य आरोपीचे नाव काय आहे? उत्तर: मुख्य आरोपी विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (रा. आंबेडकरनगर, ता. शिरूर) आहे.Q7. या प्रकरणात कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे? उत्तर: शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Q8. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत किती आहे? उत्तर: जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹1.24 लाख आहे.Q9. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे का? उत्तर: होय. न्यायालयाने आरोपींना 18 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Q10. या कारवाईचे नेतृत्व कोणी केले? उत्तर: पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डीबी पथकाने ही कारवाई केली.आणखीन शिरुर क्राईम न्यूज वाचा—Shirur Crime News: शिरुर आता ; कोयता दहशत; साठी प्रसिद्ध होणार असे दिसते !Shirur Taluka Crime News: शिरूर: पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखलShirur Crime News : 2.5 तोळ्यांचे गंठण, 55 हजार रोख व दुचाकी चोरीला ! ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनMissing Woman Shirur : शिरूरमध्ये 52 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू Ranjangaon Job Fraud Allegation: नोकरीच्या आमिषाने फसवणूक? 10 दिवस, 12 तास काम, डिपोझिटही घेतले, मात्र पगार नाही, तर कुलूप बंद? पिडीताची पोलिस तक्रारीची तयारी?