शिरूर | प्रतिनिधी,24 ऑगस्ट 2026Trupti Films News : पारनेरच्या मातीतील हरहुन्नरी कलावंत मोहनराव पानसरे यांचा खडतर ते यशस्वी कलाकार, वाचा सविस्तर…अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मोहनराव पानसरे यांनी नाटक, लोकनाट्य, लेखन, दिग्दर्शन आणि गीतलेखन अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोकरी सांभाळत रंगभूमीवर केलेली सातत्यपूर्ण मेहनत, मिळवलेली अनेक पारितोषिके आणि आता चित्रपट गीतलेखनाच्या क्षेत्रात सुरू झालेली वाटचाल हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.Contents1. Trupti Films News:गाढवाचं लग्न या लोकनाट्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव…2. Trupti Films News:१९८८ रोजी ठाणे येथे ‘गाढवाचं लग्न’चा पहिला प्रयोग सादर केला3. सुमारे ७७ प्रयोग केले.4. नोकरी आणि रंगभूमी असा दुहेरी प्रवास5. ठाणे शहराच्या सांस्कृतिक वातावरणाचा मोठा फायदा6. आतापर्यंत जवळपास ७५ पारितोषिके7. ‘बिमोड मुळासकट!’मधून लेखक म्हणूनही ठसा8. आगामी हिंदी चित्रपटासाठी त्यांच्या तीन गीतांचे कॉन्ट्रॅक्ट9. रामदास राऊत यांच्याकडून पानसरे यांचा सन्मान10. रामदास राऊत हे लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार आणि लावणीकार10.1. About The Author10.1.1. Dr.Nitin PawarTrupti Films News:गाढवाचं लग्न या लोकनाट्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव…मुंबई-ठाण्यात संघर्षमय सुरुवात करताना पानसरे यांनी तात्पुरती नोकरी शोधून ठाणे येथे वास्तव्य सुरू केले. त्याच काळात नाटक व एकांकिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांशी संपर्क साधत त्यांनी रंगभूमीवर संधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या काळात प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार तसेच मधू कडू यांच्या गाढवाचं लग्न या लोकनाट्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला.Trupti Films News:१९८८ रोजी ठाणे येथे ‘गाढवाचं लग्न’चा पहिला प्रयोग सादर केलायातून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचा नाट्यगट तयार करून तालमी सुरू केल्या आणि १ जानेवारी १९८८ रोजी ठाणे येथे ‘गाढवाचं लग्न’चा पहिला प्रयोग सादर केला. या प्रयोगात पानसरे यांनी सावळ्या कुंभारची भूमिका साकारली, तर गंगीची भूमिका भारती गांगुर्डे यांनी केली. त्यानंतर ठाण्यातील गडकरी रंगायतन, परळ येथील दामोदर हॉल, दादर येथील शिवाजी मंदिर यांसह विविध ठिकाणी प्रयोग झाले. यात्रा-जत्रांमधील प्रयोगांचीही संधी मिळाली. सुमारे ७७ प्रयोग केले.पानसरे यांच्या माहितीनुसार, पुढील चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी गाढवाचं लग्न या लोकनाट्याचे सुमारे ७७ प्रयोग केले. मुंबईतील सीताराम गावकर यांच्या ‘महालक्ष्मी, मुंबई’ या संस्थेतूनही त्यांना सावळा कुंभारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ कलावंत प्रकाश इनामदार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयमाला इनामदार यांच्यासोबत काम करण्याचे भाग्यही त्यांना लाभले. त्या काळात सुनीलजी गोडबोले यांनी दिवाणजीची भूमिका साकारली.नोकरी आणि रंगभूमी असा दुहेरी प्रवासरंगभूमीवर काम मिळत असले तरी त्यातून घर चालेल आणि पोट भरेल इतके उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे नाटकाची आवड असूनही उपजीविकेसाठी सातत्याने निर्मात्यांच्या शोधात राहावे लागत होते. अखेर नशिबाने साथ दिली आणि काही काळ नाट्य क्षेत्र बाजूला ठेवून ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर नोकरी आणि रंगभूमी असा दुहेरी प्रवास सुरू राहिला.ठाणे शहराच्या सांस्कृतिक वातावरणाचा मोठा फायदाठाणे शहर हे कलेचे माहेरघर असून या शहराने महाराष्ट्राला अनेक उत्तम कलाकार दिले आहेत, असे पानसरे सांगतात. संगीत नाटकाची समृद्ध परंपरा आणि जाणकार रसिकवर्ग यामुळे येथे नाट्यप्रयोगांना मिळणारा प्रतिसाद त्यांच्या कलाप्रवासासाठी महत्त्वाचा ठरला.आतापर्यंत जवळपास ७५ पारितोषिकेनोकरी सांभाळत त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाच्या नाट्य स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. २०२५-२६ पर्यंतच्या स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकदा प्रथम तसेच द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या कलाप्रवासात आतापर्यंत जवळपास ७५ पारितोषिके मिळाल्याचे ते सांगतात.त्यांनी बेईमान, राधी, लफड्यात लफड, परके आभाळ, मोठी तिची सावली, इशारे निखारे, अविघ्नेया, बिमोड मुळासकट!, वाहतो ही दुर्वांची जुडी, सूर्यास्त, कथुली, चौकोनातील एक कोन यांसह अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच गाढवाचं लग्न, सोकाजीराव टांगमारे, विठाईच्या काठी, तमाशा, ती रात्र, डाव आदी व्यावसायिक नाटकांतही त्यांनी काम केले आहे.‘बिमोड मुळासकट!’मधून लेखक म्हणूनही ठसारंगभूमीवरील अनुभवाच्या बळावर पानसरे यांनी लेखनाकडेही वळण्यास सुरुवात केली. २०२४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘बिमोड मुळासकट!’ या नाटकाने मुंबईतील पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवला, तर अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय त्यांनी अनेक कॉमेडी स्किट्स लिहून सादर केल्या आहेत. त्यातील ‘बाबा तात्ताडांग’ आणि ‘बायकोची कमाल आणि यमाची धम्माल’ या स्किट्सना रसिकांची विशेष दाद मिळाली.पानसरे यांनी लावणी तसेच मराठी आणि हिंदी गीतलेखनालाही सुरुवात केली आहे. त्यांची सुमारे दहा मराठी गीते तयार असून, ज्येष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे यांच्या ‘माहेरची कन्या’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले गीत गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे.आगामी हिंदी चित्रपटासाठी त्यांच्या तीन गीतांचे कॉन्ट्रॅक्टयाशिवाय पद्मशीला प्रोडक्शनच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी त्यांच्या तीन गीतांचे कॉन्ट्रॅक्ट झाले असून त्यापैकी भगवान शंकरावर आधारित एका गीताचे गायन प्रसिद्ध गायक कैलाश खेर करणार असल्याचे पानसरे यांनी सांगितले. त्यांच्याकडे आणखी दहा हिंदी गीतेही तयार आहेत.आता नोकरीतून वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर पानसरे यांनी आपला पूर्ण वेळ नाटक, सिनेमा, लेखन आणि दिग्दर्शनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य संधी मिळाल्यास अभिनय क्षेत्रातही काम करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी एकांकिका लिहून त्यांचे दिग्दर्शन व सादरीकरण करण्याचाही त्यांचा मानस आहे.रामदास राऊत यांच्याकडून पानसरे यांचा सन्मानदरम्यान, तृप्ती फिल्म प्रोडक्शन, शिरूरचे निर्माते रामदास राऊत यांनी मुंबई येथे नाट्यनिर्माते, दिग्दर्शक व लेखक मोहन पानसरे यांची भेट घेऊन त्यांच्या कलाप्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर पानसरे यांनी आपल्या नाट्यप्रवासातील आठवणींना उजाळा दिला.तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या शिरूर येथील कार्यालयातही पानसरे यांचा सन्मान करण्यात आला. पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या पानसरे आणि राऊत यांचे मूळ एकाच तालुक्यात असल्याने पारनेरवासीयांच्या वतीने त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.रामदास राऊत हे लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार आणि लावणीकाररामदास राऊत हे लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार आणि लावणीकार म्हणून कार्यरत असून नाट्य व चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा पानसरे यांनी विशेष उल्लेख केला. कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तींबद्दल आपल्याला नेहमीच आदर वाटतो, असेही त्यांनी सांगितले.“प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वतःवर विश्वास असेल तर जीवनात अशक्य असे काहीच नाही,” हा विश्वास मनाशी बाळगून पानसरे यांनी संघर्षातून रंगभूमीपर्यंतचा प्रवास केला आहे. आता निवृत्तीनंतर त्यांच्या कलाप्रवासाचा नवा अध्याय सुरू होत असून नाटक, चित्रपट, लेखन आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून पुढील वाटचाल करण्याचा त्यांचा निर्धार आहे.आणखीन वाचादिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु , लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल ! ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनFilmi Kisse : अमिताभ बच्चन यांचा आवाज ‘रेडियो जॉकी जैसा’? काय किस्सा आहे?