9 जुन 2026 Filmi Kisse हा विभाग खास हिंदी, मराठी किंवा Hollywood मधील देखील किस्से आमच्या वाचकाना वाचायला देईल. ते वाचण्यात सिने रसिकाना मजा येते.आम्ही स्वतः देखील चित्रपट शौकीन आहोत.तर वाचा हा खुद्द शाहेनशहा अमिताभ बच्चन यांचा. वाचा सविस्तर… Contents1 Filmi Kisse : अमिताभ बच्चन यांचा आवाज ‘रेडियो जॉकी जैसा’? काय किस्सा आहे?2 Filmi Kisse : अमिताभचे डायलॉग फेमस झाले3 Filmi Kisse : रेशमा और शेरा -19714 अमिताभ बच्चनची कबुली —5 राजस्थानी गावातील कथा6 वहिदा रेहमान : कसलेली अभिनेत्री7 प्राण जाये पर वचन न जाये8 धर्मसन्कट9 आवाज आणि डायलॉग10 शिकण्यासारखे10.1 आणखीन ‘सत्यशोधक’ विशेष वाचा10.2 दिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु , लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! .10.3 About The Author10.3.1 Dr.Nitin Pawar10.4 ❤️ Support Satyashodhak Blog Filmi Kisse : अमिताभ बच्चन यांचा आवाज ‘रेडियो जॉकी जैसा’? काय किस्सा आहे? ‘रेशमा और शेरा’ चित्रपटात अमिताभचा रोल एका मूक-बधिर भावाचा होता. गंमत म्हणजे नायक सुनील दत्त यांना अमिताभचा आवाज अजिबात आवडला नव्हता. फिल्म रेश्मा और शेरा पहा खालील लिंकवर क्लिक करुन- https://www.youtube.com/results?search_query=Reshma+Aur+Shera+Full+Movie ते म्हणाले होते, “उनकी आवाज किसी रेडियो जॉकी जैसी लगती है”. तरी इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून म्हणे त्यांना रोल मिळाला होता.गांधी घराणे व बच्चन घराणे यांची निकटता जगजाहीर आहे. Filmi Kisse : अमिताभचे डायलॉग फेमस झाले हेच ते अमिताभ,ज्यांच्या आवाजावर पुढे अख्खा देश फिदा झाला! डायलॉग फेमस झाले. लोक बोलू लागले. सुदेश भोसले यांनी डब सुद्धा केला. Filmi Kisse : रेशमा और शेरा -1971 ‘रेशमा और शेरा’ नावाची ही हिंदी फिल्म 1971 ची.या चित्रपटात अमिताभ बच्चनचा छोटा रोल आहे. त्याचे नाव छोटू आहे. दोन गावांमध्ये वैर असते.अमिताभ बच्चन यामध्ये शेराचा लहान भाऊ असतो. त्याच्याकडून गोळीबार करून घेण्यात येतो.शेराच्या क्रोधाचा धनी बनतो. अमिताभ बच्चनची कबुली — अमिताभ बच्चन ने पुढे आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की,’ मी माझ्या कामांमध्ये मला जो प्रसंग करायचा आहे,अभिनय करायचा आहे, त्यावर पुर्ण लक्ष केंद्रित करतो.’ तुम्ही पाहता आजकाल शूटिंग करतानाचे देखील युट्युब वर व्हिडिओ आहेत.त्याचे लक्ष त्या प्रसंगावर केंद्र केलेले असते. तो आजूबाजूला असणारे बाकीची माणसे हिरोईन,बघे, इतर कर्मचारी यांच्याकडे लक्ष देत नाही. तर या चित्रपटांमध्ये या दोन गावांची दुश्मनी वाढते. रेश्मा आणि शेरा एकमेकांना चोरुन चोरुन भेटत राहतात. राजस्थानी गावातील कथा राजस्थानी ठाकुर यांच्या अहंकाराचा आणि परंपरांचा,क्षत्रियत्वाचे दर्शन दिसत राहते.पुढे पुढे चित्रपटांमध्ये कथेत दोन्ही बाजूंनी शस्त्राचा वापर होतो. त्या काळातली साधी बंदूक देखील आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. वहिदा रेहमान : कसलेली अभिनेत्री रेशमा ची भुमिका अभिनेत्री वहिदा रेहमान ने केली आहे. ही कसलेली अभिनेत्री होती. तिने अमिताभ बच्चनच्या नायकाची नायिका म्हणून देखील भूमिका केली. त्याचबरोबर अमिताभ बच्चनची आई म्हणून देखील भूमिका केलेले आहे.अगदी अभिनेत्री राखी प्रमाणे! तर घायाळ झालेला शेरा त्या वाळवंटी गावाच्या बाहेरच्या भागात पडुन राहिलेला असतो.समोरून बारात येते. सुनील दत्त पाहतो. छोटू बाराती मध्ये दुल्हा असतो. ‘छोटूला शेरा कोनत्याही परिस्थितीमध्ये जिवंत ठेवणार नाही,अशी प्रतिज्ञा करुन बसलेला असतो. प्राण जाये पर वचन न जाये आणि क्षत्रियाची प्रतिज्ञा म्हणजे,’ प्राण जाये पर वचन न जाये’! क्षत्रिय राजपूत यांच्या प्रतिज्ञा अगदी रामायण, महाभारतामध्ये गंगापुत्र भीष्मापासून अगदी द्रोपदी पर्यंत दिसतात. त्या पूर्ण करणे हे जणू जीवित कार्यच असते,अशी परंपरा उत्तर भारतामध्ये आढळते आजही आढळते.तर आता शेराने प्रतिज्ञा केलेली असल्याने तो त्याची बंदूक छोटूच्या दिशेने रोखतो. नेम धरत असतो. धर्मसन्कट तोपर्यंत बारात पुढे पुढे येथे आणि त्या ठिकाणी शेरा पाहतो, दुल्हन खुद्द रेश्माच असते. मग पुढे काय होते?ते आपण प्रत्यक्ष चित्रपटातच पाहू शकता. youtube वर आहे. राजस्थानचे वाळवंट, गाव, जीवन, लोक, पद्धती, संस्कृती,पेहराव असे एक वेगळे दर्शन आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळेल. अमिताभ बच्चनचा आवाज त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस चित्रपटाचा नायक पहाडी आवाजाचा सुनील दत्त यांनी नाकारलेला होता-“उनकी आवाज किसी रेडियो जॉकी जैसी लगती है”. आणि इतिहास गवाह आहे.अमिताभ बच्चनच्या आवाजाचा ब्रँड तयार झालेला, वर्षानुवर्षी त्याचे डायलॉग आणि त्यांच्या तोंडची वाक्ये अनेक मिमीक्री मध्ये वापरले जातात. आवाज आणि डायलॉग ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है शहंशाह,”(शाहेनशहा),’ विजय दिनानाथ चौव्हाण,बापका नाम दिनानाथ चव्हाण, उमर -36 साल,11 महिने, आठवा दिन..(शाहेनशहा) ”सरजमी हिंदोस्तान! सलाम ए वालेकुम'(खुदा गवाह) इ. इ. अशा अनेक चित्रपटांमध्ये हाच तो आवाज चित्रपट शौकिनांचा प्राण बनलेला दिसतो. तो आवाज जो सुनील दत्त यांनी- ” घटिया किसम का आवाज” म्हणून हिणवला होता. तो आवाज रन्ग लाया.आवाज भी रंग लाता है! हा पुढचा इतिहास.अशा मोठ्या लोकांच्या अनुभवांमधून एक गोष्ट सामान्य माणसाला देखील शिकण्यासारखे असते. चार लोक काय म्हणतील? याला माणूस फार घाबरतो. शिकण्यासारखे पण जे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामांमध्ये सातत्य, एकाग्रता, धैर्य आणि कष्ट घेत राहतात, त्यांना यशापासून कोणी रोखू शकत नाही! Filmi Kisse मनोरंजन करतात. तसेच काही सन्देशही देत असतात. आणखीन ‘सत्यशोधक’ विशेष वाचा दिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु , लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! . About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Mamta Kulkarni as ‘महामंडलेश्वर’? का बनली ममता कुलकर्णी ‘अशी’?- खास रिपोर्ट !