International Day Against Drug Abuse म्हणजेच आन्तरराष्टीय अंमली पदार्थांविरोधी दिनानिमित्त रांजणगावमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संदेश समाजाला दिला. विद्यार्थी वर्गालाही दिला. सविस्तर या बातमीमधे माहिती देण्यात आली आहे. रांजणगाव गणपती, प्रतिनिधी, 26 जुन 2026https://www.satyashodhak.blog/wp-content/uploads/2026/06/VID-20260626-WA0015.mp4International Day Against Drug Abuse (26 जून) निमित्त रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नशामुक्ती जनजागृती रॅली आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समावेश होता.Contents1. International Day Against Drug Abuse : रांजणगाव गणपती पोलिसांचा स्तुत्य उपक्रम2. International Day Against Drug Abuse : महिला पोलीस व विद्यार्थीनीचा सहभाग प्रभावी माध्यम जनजागृतीचे2.1. About The Author2.1.1. Dr.Nitin PawarInternational Day Against Drug Abuse : रांजणगाव गणपती पोलिसांचा स्तुत्य उपक्रमसकाळी 10.15 ते 11.15 या वेळेत रांजणगाव गणपती गावातून नशामुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये श्री महागणपती करिअर अकॅडमी, रांजणगाव गणपती येथील सुमारे 120 ते 150 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचे संदेश देणाऱ्या घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.त्यानंतर 11.30 ते 12.00 या वेळेत महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल येथे International Day Against Drug Abuse निमित्त विशेष नशामुक्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच व्यसनापासून दूर राहून निरोगी व जबाबदार जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.International Day Against Drug Abuse : महिला पोलीस व विद्यार्थीनीचा सहभाग प्रभावी माध्यम जनजागृतीचेया कार्यक्रमास पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक पासलकर, पोलीस हवालदार ब्रह्मा पोवार, संतोष औटी, सूरज वळेकर तसेच महिला पोलीस अंमलदार रोजना भोजने उपस्थित होते.रांजणगाव पोलीस स्टेशनच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या वाचा—Shirur Encroachment Protest: 3 दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासन झुकले?Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाईShirur Illegal Liquor Raid : शिरूर तालुक्यात पोलीस ;सिंघम; मोडवर !गावठी व विदेशी दारूचा वाल्यांवर ;कहर; बरसला! ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनRanjangaon Job Fraud Allegation Case : बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एका कामगाराला थकीत रक्कम मिळाल्याचा दावा; इतर प्रकरणांवरही तोडग्याची प्रक्रिया सुरू Shirur Weekly Market Police Patrol: आठवडे बाजारात विशेष पेट्रोलिंग; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई