19 August 2026 Pradip Jagtap : प्रदीप जगताप यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी दुसऱ्यांदा नियुक्तीContents1. Pradip Jagtap चे पिंपरी-चिंचवडचे2. Pradip Jagtap:समाजातील विविध घटकांशी आपले संबंध2.1. Read More》》》》》2.2. About The Author2.2.1. Dr.Nitin PawarPradip Jagtap चे पिंपरी-चिंचवडचेश्री. प्रदीप विष्णू जगताप यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.Pradip Jagtap:समाजातील विविध घटकांशी आपले संबंधजगताप कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी शहरात वास्तव्यास असून सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांशी आपले संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.Pradip Jagtap हे २५ वर्षांपासून पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी माननीय मंत्री अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.तसेच भाजप मंडळ अध्यक्ष सौ.अनिता गणेश वाळुंजकर यांच्या सहकार्यानेही त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.या कार्याची दखल घेत मंत्री अण्णा बनसोडे आणि मंडळ अध्यक्ष सौ. अनिता गणेश वाळुंजकर यांच्या शिफारसीनंतर प्रदीप जगताप यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली.या नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप जगताप यांचे स्वागत करून अभिनंदन केले.त्यांचे निकटवर्तीय तथा तप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता-दिग्दर्शक रामदासजी राऊत यांनीही त्यांचे अभिनंदन केले.परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रदीप जगताप यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.Read More》》》》》Shirur Woman Accidental Death: न्हावरा येथील 34 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरूAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनDigital Ecosystem म्हणजे काय? | व्यवसायाला ऑनलाइन ब्रँड बनवण्याची संपूर्ण मार्गदर्शिका