Shirur Woman Accidental Death: Archana Vitthal Gaikwad from Nhavara, Shirur, Puneशिरूर तालुक्यातील न्हावरा येथील महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू प्रकरणी शिरूर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद.(Image with AI help)

Shirur Woman Accidental Death घटनेत न्हावरा येथील 34 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेचा तपास शिरूर पोलिसांकडून सुरू आहे. वाता या बातमीत सविस्तर…

शिरूर, प्रतिनिधी, 29 जुन 2026

Shirur Woman Accidental Death प्रकरणात शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील 34 वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना विठ्ठल गायकवाड, वय 34 वर्ष , राहणार- गायकवाडवस्ती, न्हावरा, तालुका,शिरूर, जिल्हा-पुणे,यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचार सुरू असताना रविवारी दिनाक- 28 जून 2026 सकाळी 9.45 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पती विठ्ठल शिवाजी गायकवाड यांनी शिरूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बीएनएसएस कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक 103/2026 दाखल करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

Shirur Woman Accidental Death प्रकरणाचा तपास सुरू

प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, मृत्यूची नेमकी कारणमीमांसा आणि संबंधित परिस्थितीचा सखोल तपास सुरू आहे. तपासाचा अंतिम अहवाल आणि वैद्यकीय प्रक्रियेनंतरच अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

टीप : या प्रकरणातील सर्व माहिती प्राथमिक पोलीस नोंदीवर आधारित असून, तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निष्कर्षानुसार पुढील माहिती स्पष्ट होईल.

अधिक बातम्या—

शिरुर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल | Shirur Crime 769/2025

Shirur 18 Age Girl Missing News- शिरुरच्या महादेव नगर मधुन 18 वर्षीय मुलगी बेपत्ता!

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author

You missed