Chetak E-Bike Theft in Shirur : Chetak e-bike stolen from showroom in Shirur, Puneशिरूरमध्ये शोरूमच्या आवारातून १.५७ लाखांची Chetak ई-बाईक चोरी
Advertisement
Advertisement

21 August 2026

Chetak E-Bike Theft in Shirur;शिरूरमध्ये चेतक ई-बाईकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

●Chetak E-Bike Theft in Shirur:शिरूर शहरातील गंगा पेट्रोल पंपाजवळील आवारातून चोरी

शिरूर शहरातील गंगा पेट्रोल पंपाजवळील जे. सी. मोटोप्लेक्स चेतक शोरूमच्या आवारातून सुमारे १ लाख ५७ हजार १४८ रुपये किमतीची चेतक ई-बाईक चोरीला गेल्याची घटना १८ ऑगस्ट २०२६ रोजी घडली.

●Chetak E-Bike Theft in Shirur:शोरूमचे मॅनेजर संदिप शिवाजी सोनवणे यांनी दिली फिर्याद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोरूमचे मॅनेजर संदिप शिवाजी सोनवणे (वय ४०, रा. पिंपरी दुमाला, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० नंतर ते सायंकाळी ७.३० पूर्वीच्या कालावधीत शोरूमच्या गेटच्या आत लावलेली काळ्या रंगाची चेतक C3501 मॉडेलची ई-बाईक अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

●बाईकची किंमत १ लाख ५७ हजार १४८ रुपये

चोरी झालेल्या ई-बाईकची किंमत १ लाख ५७ हजार १४८ रुपये असून तिचा चॅसी क्रमांक MD2B35306TAD29063 असा आहे.

अज्ञात चोरट्याने शोरूमच्या आवारातून ही दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

●शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 754/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार पवार/३९८ यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार खेडकर पुढील तपास करीत आहेत.

●Read more》》》》

Shirur Taluka News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील मोटारी व केबल चोरीला

About The Author