Shirur Taluka News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील मोटारी व केबल चोरीला Caption:उरळगावातील बोअरवेलमधील मोटारी व केबल चोरीप्रकरणी शिरूर पोलिसांची कारवाई

15 August 2026

Shirur Taluka News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील मोटारी व केबल चोरीला गेल्या आहेत.शिरूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Shirur Taluka News:शिरुर तालुक्यातील उरळगाव येथील घटना

उरळगाव (ता. शिरूर) येथील शेत गट नं. १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने दोन पाण्याच्या मोटारी व तांब्याची केबल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे १७ हजार रुपये आहे.

Shirur Taluka News : रामदास लहानु काळे यांची फिर्याद!

याप्रकरणी रामदास लहानु काळे (वय ७१, रा. उरळगाव) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या व त्यांच्या भाऊ बाळासाहेब काळे यांच्या शेतातील बोअरमधून ५ एचपीची एक मोटार व २५० फूट तांब्याची केबल, तसेच ३ एचपीची एक मोटार व २५० फूट तांब्याची केबल चोरीला गेली.

ही चोरी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर ते १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सदर साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shirur Taluka News उरळगाव प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७३७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफौ चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहवा पवार (ब. नं. ३९८) करीत आहेत. आरोपी अद्याप अज्ञात असून चोरीचा माल मिळालेला नाही.

आणखीन बातम्या वाचा

Shirur Pune Crime Farmer Beating : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ज्येष्ठ शेतकऱ्याला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author

You missed