Shirur Crime News:डोंगरगण येथे गावठी हातभट्टी दारूवर शिरूर पोलिसांची कारवाईडोंगरगण येथे गावठी हातभट्टी दारूविरोधात शिरूर पोलिसांची कारवाई; २१ हजारांचा मुद्देमाल जप्त.

15 ऑगस्ट 2026

Shirur Crime News : डोंगरगण येथे गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई झाली आहे. त्यात २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सविस्तर बातमी वाचा….

Shirur Crime News:आरोपी घटनास्थळावरून पसार

शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथे शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

Shirur Crime News :भास्कर बबन चोरे आरोपी

पोलिसांच्या माहितीनुसार, भास्कर बबन चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरूर) हा १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घोडनदीच्या कडेला ज्वारीच्या कडवळाजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे आढळून आले.

एकूण २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० लिटर कच्चे रसायन, २० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू आणि लोखंडी ड्रम असा एकूण २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथक व पंचांची चाहूल लागताच आरोपी काटवनाच्या दिशेने पळून गेला.

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस शिपाई रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३५/२०२६ नुसार BNS कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करीत असून, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आणखीन बातम्या

Shirur Crime : तर्डोबाचीवाडीत गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author

You missed