शिरुरच्या जिजामाता उद्यानाजवळ एका इसमाचा मृत्यु ! तर नागरगाव फाटा येथे एक इसम अपघातात ठार !
शिरुरच्या जिजामाता उद्यानाजवळ एका इसमाचा मृत्यु झाला आहे. तर नागरगाव फाटा येथे एक इसम अपघातात ठार झाला आहे. शिरुर पोलिस ठाण्यात आज या दोन मृत्युंच्या नोंदी झाल्या आहेत. एका वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुरच्या जिजामाता उद्यानाजवळ एका इसमाचा मृत्यु ! तर नागरगाव फाटा येथे एक इसम अपघातात ठार !
शिरुर पोलिस ठाण्यात आज दोन मृत्युंच्या नोंदी ! एका वाहन चालकावर गुन्हा दाखल !
शिरुर,दि.5 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुर मधील जिजामाता उद्यानाजवळ एका इसमाचा मृत्यु झाला आहे. तर नागरगाव फाटा येथे एक इसम अपघातात ठार झाला आहे. शिरुर पोलिस ठाण्यात आज या दोन मृत्युंच्या नोंदी झाल्या आहेत. एका वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यातील नागरगाव फाटा येथे अपघात….
शिरुर पोलिस ठाण्यात फिर्यादीत नमुद केल्यानुसार
हकीकत अशी आहे. तारीख 05/08/2824 रोजी सकाळी 66:15 वाजण्याच्या सुमारास नागरगाव , तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे गावच्या हद्दीत नागरगाव फाटा येथे हॉटेल अन्नपुर्णासमोर दत्ता चांगदेव सोनवणे, राहणार-किनगाव, तालूका- अहमदपुर, जिल्हा- लातुर याने त्याच्या ताब्यातील कंटेनर नं एन एल 01 ए-ई 8252 हा हयगईने, अविचाराने, स्त्याच्या आजुबाजुला न पाहता कंटेनर चालवीत नेला.तो पुढे घेवुन जात असताना लाभेश गणपतराव औटी, वय – 39 वर्षे, धंदा- शेती, राळेगणसिद्धी, तालूका- पारनेर, जिल्हा-अहमदनगर
यांचा पुतण्या मनोजकुमार सोन्याबापू औटी, वय- 32 वर्षे, राहणार,राळेगण सिद्धी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर यास जोरात धडक बसली.
डोक्याची कवटी फुटली….
त्या अपघातामध्ये त्याच्या डोक्याची कवटी फुटुन त्याचा जागीच मृत्यूस झाला.तसेच सागर रावसाहेब भूजबळ, राहणार- भुजबळ वस्ती, नाशिक रोड, पोहेगाव, तालुका-कोपरगाव, जिल्हा-अहमदनगर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांची स्विफ्ट कार नंबर एम एच 12 एच झेड 7577 हिचे नुकसानी झाले.
वाहन चालकावर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. …
म्हणुन आरोपी वाहन चालक दत्ता चांगदेव सोनवणे, राहणार,किनगाव, तालुका- अहमदपुर, जिल्हा-लातूर याच्या विरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी दत्ता चांगदेव सोनवणे, राहणार,किनगाव, तालुका- अहमदपुर, जिल्हा-लातूर याच्यावर शिरुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. 674/2824, भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (अ), 125 (ब), 186 (1) (2), 324 (4) (5), मो.वा.का.क-184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस नाईक श्री.टेंगले हे आहेत.तर पुढील तपास सहायक फौजदार श्री. कदम हे करत आहेत.
——
Dr.Nitin Pawar,Editor,Shirur.
” शिरुर येथील सुंदर नाव व स्वरुपही असणारे जिजामाता उद्यान आहे.शिरुरकरांची आज हे उद्यान एक भावनिक आधार व गरज बनले आहे.ते गजबजलेले आहे.दररोज शिरुरकर या उद्यानात येतात.आबालवृद्ध येतात.वयोवृद्ध येतात.जागिंगसाठी येतात.लहान मुले येथे खेळतात.झोपाळा आहे,घसरकुंडी आहे.तलाव आहे.लगतच अनेक रुचकर पदार्थांच्या गाड्या टपर्या आहेत.इथं आनंदासाठी माणुस येतो.आनंदी होतो.क्षणभर का होईना त्याचे दु:ख तो विसरतो.
या ठिकाणी कोणाचा मृत्यु होणे वाईटच.पण ही पहिली घटना असावी.असे काही दिसल्यास येथील पहारेकरी व नागरिकांनी तत्काळ रुग्णालयाशी संपर्क केला पाहीजे.नव्हे तर त्याला ताबडतोब दवाखान्यात हलवले पाहिजे. एकेकटे राहणारे वडिल किंवा आई हे मुलांसाठी लाजिरवाणी बाब आहे.”
शिरुर मधील जिजामाता उद्यानाजवळ दुर्दैवी मृत्यु. …
वसंत दिलीप भोसले
शिरुरशहरातील घटनेत फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकीगत अशी की खबर देणार रिहाना मेहबुब सय्यद, वय- 33 वर्षे , धंदा-घरकाम, राहणार- उबाळेनगर, वाघोली, तालुका- हवेली, जि पुणे यांचे वडील वसंत दिलीप भोसले, वय- 43 वर्षे हे पाण्याची टाकी,शिरूर, तालूका- शिरूर , जिल्हा-पुणे येथे एकटेच राहण्यास होते . ते मिळेल तेथे मजुरीने काम करून उपजिविका करत होते.
रिहाना सय्यद यांनी केली मदत…
दिनांक 05/08/2024 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास खबर देणार खबर देणार – रिहाना मेहबुब सय्यद, वय -33 वर्षे ,धंदा-घरकाम, राहणार- उबाळेनगर, वाघोली, तालूका- हवेली, जिल्हा-पुणे, पुणे मो. नं 8669250994 हे राहत्या घरी उबाळेनगर येथे असताना त्यांचे चुलते दिपक दिलीप भोसले यांनी त्यांना फोन करून सांगितले की, ‘ तुझे वडील वसंत भोसले हे जिजामाता गार्डन शिरूर येथे होलमिल चहाच्या दुकानाचे बाजुला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले आहेत.ते काहीच हालचाल करीत नाहीत . तु शिरूरला ये’, असे सांगितले. त्यानंतर खबर रिहाना मेहबुब सय्यद, वय- 33 वर्षे ,धंदा-घरकाम, राहणार- उबाळेनगर, वाघोली, तालुका- हवेली,जिल्हा-पुणे यांनी सांगितले.
मुलगा उबाळेनगर येथे. ….
तेव्हा दिपक भोसले,उबाळेनगर येथुन निघाले. दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास ते शिरूर पोलिस स्टेशन येथे आले. वडीलांच्या घटनेबाबत पोलिसांना माहीती दिली .त्यानंतर शिरूर पोलिसांसह जिजामाता गार्डन येथे गेले. तेव्हा खबर देणार यांचे वडील बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. त्यांची काही एक हालचाल होत नव्हती. त्यानंतर शिरूर पोलिसांनी अब्युलन्स बोलावुन घेवुन वसंत भोसले यांना ग्रामीण रुग्णालय , शिरूर येथे उपचारासाठी आणले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी खबर देणार यांचे वडील वसंत दिलीप भोसले यांना तपासुन ते दुपारी 2:30 वाजताच्या पुर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले आहे. म्हणून मयत दाखल करणेत आले आहे.
या घटनेची नोंद अ.म.र.नं रजि नं. 101/2024 बी. एन. एस. एस कायदा 2023 चे कलम 194 प्रमाणे शिरुर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दाखल अमंलदार पो लिस नाईक श्री. टेंगले हे आहेत. तर पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर श्री. पाटील हे करत आहेत.
Dr. Nitin Pawar is a journalist, social analyst and editor at Satyashodhak Blog. He writes on democracy, social justice, rural Maharashtra and political analysis with reformist perspective.