शिरुरच्या जिजामाता उद्यानाजवळ एका इसमाचा मृत्यु झाला आहे. तर नागरगाव फाटा येथे एक इसम अपघातात ठार झाला आहे. शिरुर पोलिस ठाण्यात आज या दोन मृत्युंच्या नोंदी झाल्या आहेत. एका वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.भोसले

‘शिरुर’ च्या ‘त्या’ मृत घोषीत इसमाचा प्रत्यक्षात, ‘मारहाणीत
मृत्यु’ !

शिरुर’ पोलिसांच्या तपासात उघड? तर तिघांसह ‘दोन महिला’ देखील सी सी टी व्ही दिसल्या?

शिरुर,दिनांक- 9 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)

'शिरुर' च्या 'त्या' मृत घोषीत इसमाचा प्रत्यक्षात, 'मारहाणीतमृत्यु' झाला असल्याचे शिरुर पोलिस स्टेशनच्या तपासात समोर आला आहे. असे सुत्रांकडून समजते. तर तिघांसह 'दोन महिला' देखील सी सी टी व्ही दिसल्या आहेत,असा दावा मृत वसंत दिलीप भोसले यांची मुलगी रेहाणा सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.

 

‘शिरुर’ च्या ‘त्या’ मृत घोषीत इसमाचा प्रत्यक्षात, ‘मारहाणीत
मृत्यु’ झाला असल्याचे शिरुर पोलिस स्टेशनच्या तपासात समोर आला आहे. असे सुत्रांकडून समजते. तर तिघांसह ‘दोन महिला’ देखील सी सी टी व्ही दिसल्या आहेत,असा दावा मृत वसंत दिलीप भोसले यांची मुलगी रेहाणा सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

‘शिरुर’ च्या त्या मृत घोषीत इसमाचा प्रत्यक्षात, ‘मारहाणीत
मृत्यु’?

‘शिरुर’ पोलिस ठाण्यात नोंद केल्यानुसार दिनांक 01/08/2024 रोजी 14:00 वा वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत होलमिल बेकरी जवळ , डांबरी रोडवर फिर्यादी रेहाना मेहबूब सय्यद ,वय -33 वर्षे,राहणार, उबाळे नगर, वाघोली, तालुका-हवेली ,जिल्हा- पुणे (मयताची मुलगी ), यांचे वडील वसंत दिलीप भोसले, वय- 43 वर्ष ,राहणार-पाण्याच्या टाकीजवळ , शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांना त्यांची सून अंजली रुवल काळे हिच्या सोबत झालेल्या प्रापंचिक वादाच्या कारणावरून

1)नागरेष बाजीराव काळे
2) राजेश बाजीराव काळे
3) निघु बाजीराव काळे

सर्व राहणार-पाण्याच्या टाकी, जवळ ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे यांनी कोयता उलटा करून बोथट बाजूकडून कोयत्याने छातीत, पायावर मारून डांबरी रोडने फरपटत नेले.ही जबर मारहाण केली होती . त्या मारहाणीत फिर्यादीचे वडील वसंत भोसले हे दिनांक 05/08/2024 रोजी 2:30 वाजण्याच्या पूर्वी मयत झालेले आहेत. ‘शिरुर’

तीन आरोपींवर ‘शिरुर’ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ..

1) नागरेश बाजीराव काळे (जात पारधी)

2) राजेश बाजीराव काळे(जात पारधी)
3) निघु बाजीराव काळे (जात पारधी)

सर्व राहणार,पाण्याच्या टाकी जवळ,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशन स्टेशनला 680/2024, हा आहे.तर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) ,3(5) प्रमाणे करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस उप निरीक्षक श्री.पाटील हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार श्री.उगले हे करत आहेत प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. जोतीराम गुंजवटे हे करत आहेत.’शिरुर’

सी सी टी व्ही फुटेज कमेर्यात काय दिसले?

या आधी ‘सत्यशोधक न्युज’ने याबाबत बातमी दिली होती.जिजामाता उद्यानाजवळ बेशुद्धावस्थेत एक इसम आढळला.डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते.अकस्मात मृत्युची नोंद शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत करण्यात आली होती. पण हा अकस्मात मृत्यु नाही तर मयत वसंत दिलीप भोसले यांना आधी जबर मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत ते घायाळ झाले होते.

सी सी टी व्ही फुटेज मधील दोन महिला कोण?

त्यांना पारधी वस्तीच्या बाजुने जिजामाता उद्यानाजवळ फरपटत नेले गेले होते. ते तिथेच पडुन होते.पुण्यातुन आलेली त्यांची मुलगी रेहाणा सय्यद यांनी मात्र सागितले की, ‘सी सी टी व्ही फुटेज मधे त्यांना मारहाण करण्यात आली आहे असे दिसते आहे. एवढेच नाही तर मारहाण करणारे तिघे जण आहेत.ते त्यांच्या परिचयातील आहेत.तसेच नातेसंबंधातीलही आहेत.त्याव्यतिरिक्त तेथे जवळ दोन महिला देखील उपस्थित असल्याचे सी सी टी व्ही फुटेज कमेर्यात दिसत आहेत.’

एकंदरीत या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अधिक तपास होणे गरजेचे आहे. असे दिसते.

———-
‘शिरुर’ शहरातील दुसर्या एका घटनेत शिरुरच्या व्यावसायिकाचा ट्रक मालासह लांबवला?

'शिरुर' च्या 'त्या' मृत घोषीत इसमाचा प्रत्यक्षात, 'मारहाणीतमृत्यु' झाला असल्याचे शिरुर पोलिस स्टेशनच्या तपासात समोर आला आहे. असे सुत्रांकडून समजते. तर तिघांसह 'दोन महिला' देखील सी सी टी व्ही दिसल्या आहेत,असा दावा मृत वसंत दिलीप भोसले यांची मुलगी रेहाणा सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
शिरुर तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट?

 

‘शिरुर’ पोलिस स्टेशनला नोंद केल्यानुसार हकिगत अशी की दिनांक -04/07/2024 रोजी मध्यरात्री 01:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हददीत कांदा मार्केट ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथुन ‘हरियाना गुड्स कॅरीयर्स सावरगाव ,येवला जिल्हा – नाशिकचे

1) प्रो.प्रा.-पवनकुमार शर्मा यांनी पाठविलेलला ट्रक नं एच आर 73] 9756
2) चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांना विश्वासाने भरलेल्या कांदयाच्या 476 पिशव्या , 25495 कीलो ग्रॅम वजनाच्या 8.23, 224 रूपये माल ‘रावल ट्रेडिंग कंपनी’ गुडगाव, हरियाना राज्य या ठिकाणी पोहोचवण्याकरीता दिला होता. तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा अपहार केला असल्याची फिर्यादी – मच्छिंद्र लक्ष्मण रोडे, वय – 45 वर्षे, व्यवसाय – ‘बजरंग ट्रेडिंग कंपनी’ कांदा मार्केट,शिरूर राहणार – भांबर्डे, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे यांची आर्थिक फसवणुकीला केली आहे. म्हणून त्यांच्या विरूध्द शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘शिरुर’

आरोपीं पवनकुमार शर्मा , चालक इसाक खान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला र.नं 679/2024 असा आहे.तर कलम 316(2) प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक श्री. जगताप करत आहे.तर दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. जाधव हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support