
Contents
- 1 Mamta Kulkarni ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ का बनली ? वाचा एक खास रिपोर्ट !
- 1.1 Manta Kulkarni ने महामंडलेश्वर बनण्यासाठी 10 कोटी रुपये दिले ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक 6 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : ‘महामंडलेश्वर’?
- 1.1.3 Mamta Kulkarni ममता कुलकर्णी चा इतिहास —
- 1.1.4 Mamta Kulkarni : न्यायालयाने ‘सिरीयल अफेंडर’ म्हटले होते !
- 1.1.5 Mamta Kulkarni ने नेमका हाच प्लटफार्म का निवडला ?
- 1.1.6 Mamta Kulkarni ला हिंदु परंपरेची शिकवण माहित नाही का ?
- 1.1.7 Mamta Kulkarni : ‘महामंडलेश्वर पदासाठी 100 कोटी रुपये?
- 1.1.8 Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : वैदीक ग्रंथांचा अभ्यास?
- 1.1.9 धर्म अफुची नशा – कार्ल मार्क्स ; Mamta Kulkarni हे खरे ठरवु पाहते का ?
- 1.1.10 Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : फ्रंट वुमन म्हणुन पुढे येत आहे का ?
- 1.1.11 About The Author
- 1.1 Manta Kulkarni ने महामंडलेश्वर बनण्यासाठी 10 कोटी रुपये दिले ?
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ का बनली ? वाचा एक खास रिपोर्ट !
Manta Kulkarni ने महामंडलेश्वर बनण्यासाठी 10 कोटी रुपये दिले ?
शिरुर,दिनांक 6 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks to pixabay.com for Images in this content)
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी महामंडलेश्वर का बनली ? यावर एक खास रिपोर्ट वाचायला या खास रिपोर्ट मधे मिळेल. ममता कुलकर्णी या पूर्वाश्रमीच्या बॉलिवुड अभिनेत्रीने
Manta Kulkarni ने महामंडलेश्वर बनण्यासाठी 10 कोटी रुपये दिले आहेत.अशा बातम्या येत असेत.पुर्वी ड्रग्ज च्या विक्रीच्या आरोपांत ममता कुलकर्णी सापडली होती.आणि आता ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनली आहे.ते ही महिलांच्या आखाड्याची प्रमुख नाही तर किन्नरांच्या आखाड्याची प्रमुख बनली आहे. आणि अचानक बनली ! काय कारण असु शकते ? काही अध्यात्मिक परिवर्तन होत अंधारातुन प्रकाशाकडे म्हणजे ‘तमसो मा जोतीर्मय’ वगैरे घडले की आणखी काही उद्देश या ममता कुलकर्णी Manta Kilkarni च्या सन्यासामागे आहे. याचा तपास यंत्रणाकडुन होणे अपेक्षित आहेच !
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : ‘महामंडलेश्वर’?

वास्तविक पाहता महिला आखाडा 2013 मधे बनवला गेला आहे. त्या आखाड्याचा संन्यास ममता कुलकर्णी घेउन पुर्वीच्या पापक्षालनासाठी चांगल्या कामांसाठी 10 कोटी रुपयांचा वापर ती करु शकत होती.पण ,’ महामंडलेश्वर प्रमुख बनण्यासाठी दिले ही बातमी खरी असेल तर ,’ डाल में कुछ काला है’ असे म्हणायला जागा आहे. की ,’ पुरी दाल ही काली है’ .असा प्रश्न निर्माण होत आहे.
Read more >>
सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी चा इतिहास —
ममता कुलकर्णी हीचा इतिहास जरा शोधला तर तो एक हिंदी अभिनेत्री म्हणून तिला शोभण्यासारखा बिलकुल नाही ! ममता कुलकर्णी ही दाऊट टोळीच्या निकट पुर्वीच गेली होती.ती ड्रग्ज वापर करत असल्याच्या बातम्या येत असत.नंतर तिने ड्रगसप्लायर असणार्या एका डिलरशी लग्न करती झाली. दाउद इब्राहिम चा हा माणुस होता.
Mamta Kulkarni : न्यायालयाने ‘सिरीयल अफेंडर’ म्हटले होते !

मुंबईमध्ये दाऊद इब्राहिम चा मुख्य धंदा ड्रग विक्री व नकली नोटांचा असल्याचे म्हटले जाते. ममता कुलकर्णी हिला पुर्वी अटक देखील झाली होती. न्यायालयाने ममता कुलकर्णी ला ‘सिरीयल अफेंडर ‘ असे म्हटले होते. म्हणजे वारंवार एखादा गुन्हा करणे असा होता. पण ममता कुलकर्णी हिने तो धंदा काही सोडला नव्हता.तर आपल्या पतीबरोबर ती दुबेई मधे 10 वर्षे राहिली.
Mamta Kulkarni ने नेमका हाच प्लटफार्म का निवडला ?
आणी आता एकाएक ती साधुसंत बनण्याचे सांगत आहे.साधुंच्या आखाड्यात ड्रग्ज वापरले जातात.ममता कुलकर्णी हिने नेमका हाच प्लटफार्म निवडला आहे. आखाड्यांचे साधु संत असे पदार्थ वापरतात. असे सर्वांना माहिती आहे. परंतु त्याचे कारण व स्वरुप वेगळे असते.पण अशी वरील पाश्र्वभूमी ममता कुलकर्णी ची असल्याने आखाड्यांच्या माध्यमातुन नशेच्या पदार्थाचे सर्वदुर जाळे पसरवण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात तर यामागे नाही ना ! अशी शंका निर्माण झाली आहे. हा करोडोंचा बेकायदा धंदा भारताच्या सिमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात केला जातो. अशी माहिती आहे.
Read more >>
Mamta Kulkarni ला हिंदु परंपरेची शिकवण माहित नाही का ?
ममता कुलकर्णी हिच्या अशा अध्यात्मिक परिवर्तनामागे धार्मिकता कमी दिसते. अधार्मिक जास्त दिसते.आणि धर्म कोठेही एखाद्या झोपडीतही पाळता येतो. ईश्वर तर ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी ‘ असा असतो.आतला,आतर्यामीचा प्रवास असतो.ईश्वर, अध्यात्म,ज्ञान,सत्य,आनंद स्व
रुपता,परमहंसता ,साक्षात्कार अंतर्यामी होत असतो.अशी शिकवण सर्व धार्मिक तत्वज्ञांनी सांगितले आहे.’अहं ब्रम्हास्मी’ असेही सांगितले आहे. ईश्वर माणसाच्या ,’आत मधे’ आहे.बाहेरची सर्व दुनिया ‘माया’ आहे. भ्रम आहे. ईश्वर माणसामधेच वास करतो.अशी शिकवण आहे.हिंदु तत्वज्ञान आहे.सनातन तत्वज्ञान आहे.
Mamta Kulkarni : ‘महामंडलेश्वर पदासाठी 100 कोटी रुपये?
ममता कुलकर्णी हिने सनातन धर्म,परंपरा,लोकांच्या आस्था,भावना पैशामधे ‘तोलल्या’ असे का म्हणू नये ? जर तिने ‘महामंडलेश्वर पद’ मिळवण्यासाठी 10 कोटी रुपये दिले असतील तर ! शिवाय हे पैसे तिच्याकडे कुठुन आले ? की दुसर्या कोनत्यातरी शक्तीने हे पैसे पुरवले आहेत. या शक्तींचा उद्देश काय असेल ? समाजात मादक द्रव्ये पसरवणे,करोडो रुपयांच्या या धंद्याचा विस्तार करणे असे कारस्थान परकिय भारत विरोधी शक्तींचा उद्देश तर यामागे नाही ना ? याचा सखोल तपास करणे आवश्यक आहे.
Read more >>
प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ; कारण.. अ,ब,क,ड ?
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : वैदीक ग्रंथांचा अभ्यास?
ममता कुलकर्णी हिने हिंदु वैदीक ग्रंथ असलेले
वेद ,वेदांत ,उपनिषद पुराणे यांचा अभ्यास केला आहे. असे ती म्हणते. काही वचने तीने पाठांतरीतही करुन सांगितली आहेत.त्यातुन पुर्वीचे ‘अधोविश्व’ सोडुन नव्या अध्यात्मिक प्रवासाला निघणे.अचानक निघणे यामागे काय खरे कारण आहे? बॉलीवुड स्टार विनोद खन्ना यांनी सुद्धा एके काळी ओशो रजनीश यांच्या मार्ग निवडला होता.पण त्यांची आधी आणि नंतरही अशी पार्श्वभूमी नव्हती.
धर्म अफुची नशा – कार्ल मार्क्स ; Mamta Kulkarni हे खरे ठरवु पाहते का ?

धर्माच्या माध्यमातुन ज्याला कार्ल मार्क्स यांनी ‘अफुची नशा’ असे म्हटले होते. त्यातच या आखाड्यांमधे नशेचे पदार्थ वापरले जातात. ती परंपरा आहे.नेमक्या अशाच धर्म पद्धती च्या ,उपासना पद्धतीच्या आणि तेही किन्नर आखाड्याची प्रमुखच ममता कुलकर्णी का बनली आहे ? हाच मुख्य प्रश्न आहे.
Mamta Kulkarni ममता कुलकर्णी : फ्रंट वुमन म्हणुन पुढे येत आहे का ?
नुकताच 13,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज दिल्ली त पकडले गेले आहे.भारताच्या सिमांचा वापर या धंद्यांच्या साठी केला जातो. ममता कुलकर्णी हिचे
अंडरवर्ल्डशी गंभीर स्वरूपाचे संबंध असणे काय दर्शवते ? अलीकडच्या काळात खोटे शंकराचार्य ,जगद्गुरु असे सनातनी प्रथेत प्रवेश करत असताना दिसत आहेत.या स्थितीत ममता कुलकर्णी
‘फ्रंट वुमन’ म्हणुन तर पुढे येत नाही ना ?
एकंदरीत या विषयाचा गंभीर पणे
तपास होणे आवश्यक आहे. सनातन परंपरा ,
हिंदु धर्माची ही बदनामी नाही का ?
1 thought on “Mamta Kulkarni ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ का बनली ? वाचा एक खास रिपोर्ट !”