
Contents
- 1 Shirur Domestic violence दिराने भावजय व पुतणीस केले रक्तबंबाळ ?
Shirur Domestic violence दिराने भावजय व पुतणीस केले रक्तबंबाळ ?
Shirur Domestic violence शिरुर मधील सिद्धार्थ नगर मधील घटना !
Shirur Domestic Violence News 22 February 2025 :
Shirur Domestic violence दिराने भावजय व पुतणीस रक्तबंबाळ करण्याची घटना शिरुर मधे घडली आहे. घराशेजारी हे दोघे नातलग रहात आहेत. Shirur Domestic violence ही घटना शिरुर मधील सिद्धार्थ नगर मधे घडली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
कौटूबिक वादाची Domestic Violence Shirur घटना सिद्धार्थ नगर मधे —-
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी आहे. अनिता याकस्वामी किन्नीरा ,वय- 40 वर्ष, व्यवसाय – सीटकव्हर विक्री ,राहणार – सिदधार्थनगर ,शिरूर ,तालुका – शिरूर , जिल्हा – यांनी समक्ष जबाब दिला आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे येवुन त्यांनी फिर्यादी जवाब दिला आहे. तो असा की वरील ठिकाणी त्या व त्यांचे पती याकस्वामी गणपत किन्नीरा, मुलगा शिवाजी याकसवामी किन्नीरा, बालाजी याकस्वामी किन्नीरा, मुलगी मनिषा याकस्वामी किन्नीरा असे एकत्र राहतात.त्यांचा वाहनाचे सीट कव्हरचा व्यवसाय आहे .त्यावर कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवितो.
Read more>>
मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ ; 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन झाले लंपास !
आधी नवरा बायकोचे भांडण ; नतर दिराशी कौटूबिक वाद Domestic Violence !
दि.19/2/2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचा पतीशी त्यांचा पैशावरुन घराच्या बाहेर वाद चालु होता. तेव्हा पती याकस्वामी गणपत किन्नीरा यांनी त्यांच्या अंगावर पाण्याची बाटली फेकुन मारती. त्या बाटलीतील पाणी त्यांचा दिर संजय नडपी बसवराज किन्नीरा याच्या घराच्या पायरीवर पडला. त्यांनतर त्यांचे पती व ते सर्वजण घरात झोपी गेले.
फिर्यादी —
अनिता याकस्वामी किन्नीरा, वय -40 वर्ष, व्यवसाय- सीट कव्हर विक्री, राहणार- सिद्धार्थ नगर ,शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे
आरोपी – —
संजय नडपीबस्वराज किन्नीरा ,राहणार – सिद्धार्थ नगर ,शिरूर, तालुका -शिरूर, जिल्हा – .पुणे
सकाळी पुन्हा झाले भांडण व मारामारी—
तेव्हा दीर संजय नडपीपी बस्वराज याने घराचा पडदा उघडला .घरात घुसुला . पती याक स्वामी गणपत किन्नीरा यांना घरबाहेर ओढत आणले. घरासमोर लाथाबुक्याने मारहान केली. घराच्या पत्र्यावर लाथा मारून पत्रा पाडुन टाकला. तेव्हा त्या व त्यांची मुलगी निषा याकस्वामी किन्नीरा असे बाहेर आले. त्यांनी, ‘ काय झाले ‘ म्हणुन विचारले. तेव्हा त्याने मुलीस , ‘ तु मध्ये बोलु नको ‘ असे तिला धक्का दिला . तेव्हा तेथे त्यांचे भांडण मिटले होते.
Read more>>
पुतणी व भावजयीस केले रक्तबंबाळ Shirur Domestic Violence!
नंतर दिनांक 21/2/2025 रोजी पहाटे 6.00 वाजण्याचा सुमारास त्यांचा मुलगा शिवाजी याकस्वामी किन्नीरा, बालाजी याकरवामी किन्नीरा हे झोपेतुन उठले. दिर संजय नडपीबस्वराज किन्नीरा याला दि. 19/02/2025 रोजी झालेले भांडणाबाबत विचारण्यास गेले. की, ‘ काका तु आमचे घराचा पत्रा का पाडला, मुलीच्या अंगावर हात का उचलला?. असे विचारत असताना दिर संजय नडपीबस्वराज किन्नीरा याने काही न विचारता तेथील लोखडी रॉड ने मुलगा शिवाजी याकस्वामी किन्नीरा, बालाजी याकस्वामी किन्नीरा यांना मारू लागला . तेव्हा त्या व मुलगी मनिषा याकस्वामी किन्नीरा व पती याकस्वामी किन्नीरा असे मध्ये पडुन भांडणे सोडवणेसाठी गेले.
‘ तुम्हाला जीवे मारून टाकीन’- धमकी देखील दिली —
तरी त्याने त्यांना व मुलगी मनिषा असे दोघींना लोखंडी रॉडने मारहान केली. त्यांच्या नाकातोडांतुन रक्त येवुन जखम झाली. ‘ तुम्ही पोलीस स्टेशनला तकार दिली तर तुम्हाला जीवे मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणामध्ये त्यांना ,पतीस, मुलीस व मुलांना मार लागुन दुखापत झाली आहे. त्यामुळे ते सर्वजण शिरूर पोलीस स्टेशन येथे आले. तेव्हा पोलीसांनी उपचारसंबंधी चिट्ठी दिली. उपचार घेवुन आज रोजी शिरुर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
Read more>>
पत्नी पंजाबी ड्रेस घालते म्हणून तिला पोळपाटाने मारले ! पतीवर गुन्हा दाखल!
Shirur Domestic Violence case मधे दिरावर गुन्हा दाखल —

तरी दीर संजय नडपीबस्वराज किन्नीरा, राहणार- सिदधार्थनगर, शिरूर, तालुका – शिरूर , जिल्हा – पुणे याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.शिरुर पोलिस स्टेशन मधे आरोपीवर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 118/1,115(2),352, 351(2)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. आगलावे हे आहेत. तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री.बनकर करत आहेत. प्रभारी आधिकारी Icons निरिक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.