Contents
- 1 खोक्या भोसले कसे निर्माण होतात? संपूर्ण माहिती !
- 1.1 खोक्या भोसले कसे निर्माण होतात? एक खरे संपूर्ण विश्लेषण !
- 1.1.1 खोक्या भोसले म्हणजे काय?—–
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 खोक्या भोसले निर्माण होण्याची कारणे कोनती असतात?—-
- 1.1.5 • राजकीय संदर्भ आणि पार्श्वभूमी—-
- 1.1.6 • सामाजिक परिणाम काय असतात?
- 1.1.7 अशा इतिहासातून शिकण्यासारखे धडे कोनते असतात ? —
- 1.1.8 खोक्या भोसले या नव्या संकल्पनेचे पैलू कोनते?—
- 1.1.9 जनतेची भूमिका आणि भविष्याचा अंदाज काय आहे?—
- 1.1.10 About The Author
- 1.1 खोक्या भोसले कसे निर्माण होतात? एक खरे संपूर्ण विश्लेषण !
खोक्या भोसले कसे निर्माण होतात? संपूर्ण माहिती !
खोक्या भोसले कसे निर्माण होतात? एक खरे संपूर्ण विश्लेषण !
सत्यशोधक न्युज संपादकीय : 15 मार्च 2025
खोक्या भोसले कसे निर्माण होतात? हा या लेखाचा मुख्य विषय आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक नव्या संकल्पना, विशेषणे आणि उपमा वेळोवेळी चर्चेत येत असतात. सध्या “खोक्या भोसले” हा शब्दप्रयोग गाजत आहे. खोक्या भोसले हे एका आरोपीचे नाव आहे. पण नेमके असे शब्द कसे जन्माला येतात ? यामागे कोणती कारणे असतात ? आणि त्याचे राजकीय,सामाजिक,गुन्हेगारीवर परिणाम पुढे काय असतील? याचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
खोक्या भोसले म्हणजे काय?—–
“खोक्या भोसले” हा शब्द एक प्रकारचा खरे तर ,’ राजकीय सर्वनाम (लक्षवेधी विशेषण) बनत असतो.हे सुरेश धस यांच्या कथित व आरोपी असलेल्या कार्यकर्त्याचे खरे नोंद असलेले नाव नाही.तर एक ,’ सर्वनाम आहे.हा शब्द लोकांमधे व माध्यमांमधे महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरील भाष्य करण्यासाठी वापरण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काही विशिष्ट घटनांच्या पार्श्वभूमीवर हा शब्द रूढ झाला आहे. तो जनमानसात ‘गाजत‘ ही आहे. एवढेच नाही तर ती एक ,’उपमा‘ म्हणुन पुढे वापरला जाणार आहे. जसे,’संतोष देशमुख ‘ चे होणार आहे. ‘तुझा संतोष देशमुख करुन टाकीन’ किंवा ,’तुमचे खैरलांजी करुन टाकीन’ असे वाक्यप्रयोग ऐकायला मिळाले आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
खोक्या भोसले निर्माण होण्याची कारणे कोनती असतात?—-
• राजकीय संदर्भ आणि पार्श्वभूमी—-
महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात असे अनेकदा झाले आहे. प्रत्यक्षात समाजात राजकारण आणि समाजकारण यांमधील सीमारेषा पुसट असते.आणि जिथे राजकारण आणि समाजकारण हे जातीवर आधारित चालते.तिथे जगाच्या इतर भागातील समाजशास्र व राजकारण यांतले सिद्धान्त व ग्रहितके लागु होत नाही. कार्ल मार्क्स यांनी सुद्धा भारताबाबत ‘वेगळे?’मत मांडलेले होते !
Read more >>
DeepSeek काय आहे? कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात चीनचे अमेरिकेला आव्हान !
पक्षांतर,आणि सत्तासंघर्ष पाहायला मिळतो.त्यातुन तुमचा,’कराड’ तर आमचा,’खोक्या भोसले’ असे वळण हेतुपूर्वक देण्यात येते.आणि राजकारणातील वार पलटवार केले जातात.मुळ समस्यांवरुन सामान्य नागरिकांच्या मुलभुत समस्या सोडवण्यावरुन लक्ष दुसरीकडे वळवले जाते.सामान्य माणुस याला प्रतिक्रियाही देतो.त्यात बराच वेळ निघुन जातो.म्हणजे नागरिकांच्या मुलभुत समस्या बेरोजगारी,दारिद्य,भ्रष्टाचार,महागाई,इ.समस्या सामाण्य माणुस विसरुन . हेच राजकीय सत्तेला हवे असते.असा तो भाग आहे.
Read more >>
काही विशिष्ट राजकीय नेते काही विशिष्ट भुमिका घेत असतात.त्या भूमिकांमुळे आणि त्यावरून झालेले आरोप-प्रत्यारोप यामुळे असे शब्द चर्चेत राहतात.काही दिवस चालतात,उदाहरणार्थ, ‘जरांगे फॅक्टर’ ! नंतर हळुहळु चर्चेतुन कमी होतात न होतात तर दुसरे ,’ शब्द ‘ पुढे येतात.पण राजकिय व सामाजिक शक्तींना हे ,’टुल्स‘ उपयोगी ठरतात.
बहुतेक सत्तेच्या लालसेपोटी घेतलेले निर्णय,जनतेची दिशाभूल करण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी केली जाणारी राजकीय समीकरणे ही देखील यामागील महत्त्वाची कारणे असतात.सामान्य माणुस हे समजण्याच्या आत वेळ निघुन गेलेली असते.
• सामाजिक परिणाम काय असतात?
एक तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवरील विश्वास कमी होणे या गोष्टी होतातच.पण भारतासारख्या जाती समाजात याचे दुरगामी परिणाम होतात.जसा,’छावा‘ मुळे होवु घातलेला आहे. तरुण युवक वर्गाची राजकीय जाणीव ,समज यावर परिणाम होतो.परिणामी नव्या नेतृत्वाची गरज निर्माण होणे.ते निर्माण होतेही.प्रसार माध्यमांना अशा प्रतिकांमुळे (?) राजकीय वाद रंगवायला मोठ्या प्रमाणात चालना मिळणे–
Read more >>
Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !
अशा इतिहासातून शिकण्यासारखे धडे कोनते असतात ? —
इतिहासात वारंवार असे प्रसंग घडलेले आहेत.जेव्हा नेते आपली निष्ठा बदलताथ आणि राजकीय समीकरणे उलथवली जातात. त्याचे दीर्घकालीन परिणाम जनतेवर,समाजकारणात, राजकारणावर पडतात. त्यामुळे अशा घटनांकडे अभ्यासपूर्ण व गांभिर्याने पाहणे आवश्यक असते.
खोक्या भोसले या नव्या संकल्पनेचे पैलू कोनते?—
यामधे राजकीय व सामाजिक परस्पर विरोधी दृष्टीकोन असणे.हा एक महत्वाचा पैलु आहे.
अनेक विरोधक याला ‘राजकीय हेतु’आणि ‘जनतेची दिशाभूल’ असे शब्द बहुतांश वेळा वापरतात. ते त्यातुन सत्ताधाऱ्यांवर टीका करतात.याच्या समर्थकांचा युक्तिवाद काय असतो? तर याचे काही समर्थक याला ‘राजकीय रणनीती’ असा शब्द वापरतात.तसेच यात काहीही गैर नाही असे समजतात.पुष्कळ लोकही असेच समजतात.याच्या समर्थनार्थ उपमा,अलंकार,ऐतिहासीक,साहित्यातील,कवितेतील,शाहिरीतील घटना मानतात. जसे ,’ प्रेम ,राजकारण व लढाईत सर्व क्षम्य असते’ !,’चाणक्य‘ इ. त्यांचे म्हणणे असे असते की, ‘सत्तेत टिकून राहण्यासाठी हे आवश्यक असते’.
Read more >>
पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
जनतेची भूमिका आणि भविष्याचा अंदाज काय आहे?—
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.पण हा सुज्ञपणा तिला उशीरा येतो. कोणतेही राजकीय आंदोलन असो किंवा उलथापालथ असो. ती काळजीपूर्वक निरीक्षण करत असते.असे म्हणणे काही सत्याला धरुन नाही.अन्यथा प्रत्येक नेता,राजकीय पक्ष,संघटना यांना लाखोंनी ‘अंधभक्त‘ अनुयायी मिळाले नसते ! येणार्या भविष्यात “खोक्या भोसले” यासारख्या संकल्पना कितपत प्रभावी ठरतात, हे निवडणुकांमध्ये,सामाजिक व्यवहारामधे,नैतीकतेमधे स्पष्ट होईल.
एकुणच “खोक्या भोसले” हा शब्द आज राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा घटनांकडे निर्भीडपणे,निर्भयपणे पाहणे, त्यांचे तटस्तपणे विश्लेषण करणे आणि त्यातून बोध घेणे आवश्यक असते हे मात्र नक्की . सामान्य जनतेने राजकीय व सामाजिक घडामोडींचे मूल्यमापन करणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते.तरच राजकीय व सामाजिक लोकशाही तग धरु शकते.
#सत्यशोधकन्युज कडे आपले मत नोंदवा.खोक्या भोसले या नव्या ‘संकल्पने’बद्दल तुमचे काय मत आहे?ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा! आम्हाला अधिक अभ्यासपुर्ण व निर्भयपणे लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल !

