
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 Shirur Taluka Crime News:मारहान करुन जीवे मारण्याची धमकी !
Shirur Taluka Crime News:मारहान करुन जीवे मारण्याची धमकी !
Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे येथील घटना !
Shirur Taluka Crime News 28 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime News:मारहान करुन जीवे मारण्याची धमकी एकाला देण्यात आली आहे.ही घटना शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे येथे घडली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर हकीकत अशी आहे—
सविस्तर हकीकत अशी आहे. दिनांक 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5: 30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी सचिन नारायण पानगे,वय -28 वर्षे, धंदा -शेती ,राहणार- निमगाव दुडे ,तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे हे त्यांच्या घराच्या समोर पत्राच्या शेडमध्ये आराम करत होते. तेथे भागा यशवंत हजारे, नवनाथ भागा हजारे, मच्छिंद्र भागा हजारे हे आले.त्यांना नवनाथ हजारे बोलला,’ तू माझ्या वडिलांना सकाळी शेतामध्ये का बोललास?’. या कारणावरून नवनाथ याने त्याच्या हातामधील लोखंडी रॉड ने फिर्यादीच्या पाठीत मारले. तर मच्छिंद्र हजारे व भागा हजारे यांनी त्यांना लाथा बुकयाने मारहाण केली.
Read more >>
जीवे मारण्याची धमकीही दिली—-
नवनाथ ला सांगितले की ‘याला मार ! ‘नवनाथ ने त्याच्या हातामध्ये लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पाठीत कमरेच्या खाली पायाला व मानेवर मारून शिविगाळ केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. मच्छिंद्र यांनी तेथील दगड उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकला. तो दगड फिर्यादीच्या डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागला. म्हणून फिर्यादीने भागा यशवंत हजारे, नवनाथ भागा हजारे, मच्छिंद्र भागा हजारे यांच्या विरुद्ध फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन मधे
दाखल केली आहे.
Read more >>
फिर्यादी –
सचिन नारायण पानगे, वय -28 वर्षे ,धंदा -शेती, राहणार -निमगाव दुडे, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे
आरोपी –
1) भागा यशवंत हजारे
2) नवनाथ भागा हजारे
3) मच्छिंद्र भागा हजारे
आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118 (1), 115(2),352,351(2)(3),3(5) प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमंलदार पोलीस हवालदार श्री.टेंगले हे करत आहेत.तर पुढीलतपास अमंलदार पोलीस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलीस निरिक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Read more >>
Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल!
.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇