IMG 20260730 WA0389
Advertisement
162334
previous arrow
next arrow

Government Job Scam Maharashtra: महाराष्ट्रात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, कोल्हापूरातील नव्या प्रकरणानंतर आम आदमी पक्षाने राज्यभरातील अशा सर्व प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर | प्रतिनिधी

महाराष्ट्रात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवक-युवतींची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणांची राज्यस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी आम आदमी पक्षाने (आप) केली आहे.

कोल्हापूरात नवीन फसवणुकीचा गुन्हा

कोल्हापूर येथे गुन्हा क्रमांक 102/2026 अंतर्गत सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी बबन बाबुराव कुंभार (रा. वारणुळ, ता. पन्हाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली.

कोणत्या आरोपींवर गुन्हा?

या प्रकरणात अमृतराव किसन काळोखे (सातारा), सुरेश शामराव देसाई (सांगली) आणि शिवाजी भाऊसाहेब मोहिते (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SIT नेमण्याची ‘आप’ची मागणी

‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले की, राज्यभरात अशा प्रकारची ९३ हून अधिक प्रकरणे समोर आली असून, या सर्वांची एकत्रित चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने SIT नेमावी.

रोजगार फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ

प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनीही राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०२० ते जुलै २०२६ या कालावधीत नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली असून, आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रे, सरकारी शिक्के, लेटरहेड आणि अन्य कागदपत्रांचा वापर करून बेरोजगारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बेरोजगारांनी कोणती काळजी घ्यावी?

राज्यभरातील सर्व FIR, आरोपी, बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि बनावट कागदपत्रांचा एकत्रित तपास केल्यास संघटित रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.

राज्यातील बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(“प्रसिद्धीपत्रकावर आधारित”)

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.