
Contents
- 1 Shirur Crime News: शिरुर आता ,’ कोयता दहशत’ साठी प्रसिद्ध होणार असे दिसते !
- 2 Shirur Crime News: शिरुर मधे हाताने,कात्रीने मारहाण व कोयता फिरवुन दहशत !
- 3 एकतर ‘कोयता’ लोहाराकडे सहज 200/250 रुपयांना मिळतो—
- 4 सविस्तर घटना अशी आहे –
- 5 तुला आता दाखवतोच थांब !—-
- 5.1 फिर्यादी –
- 5.2 संतोष बाळू पाचरणे, वय -42 वर्षे, व्यवसाय -मजुरी, राहणार -जांभळी मळा ,तरडोबाची वाडी ,तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
- 5.3 आरोपी –
- 5.4 1) परवेश उर्फ पाप्या पठाण (पूर्ण नाव माहिती नाही ) 2) रुपेश चित्ते (पूर्ण नाव माहिती नाही ) 3) ओंकार दत्तात्रय जाधव . सर्व राहणार तरडोबाची वाडी,शिरुर, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे
- 6 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
- 7 खास भेट:
Shirur Crime News: शिरुर आता ,’ कोयता दहशत’ साठी प्रसिद्ध होणार असे दिसते !
Shirur Crime News: शिरुर मधे हाताने,कात्रीने मारहाण व कोयता फिरवुन दहशत !
Shirur Crime News 7 April 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Crime News: शिरुर आता ,’ कोयता दहशत‘ साठी प्रसिद्ध होणार असे दिसते ! असे म्हटले तर गैर ठरणार नाही. शिरुर मधे हाताने,कात्रीने मारहाण व कोयता फिरवुन दहशत करण्यात आल्याची घटना घडली आहे.’कोयता दहशतीचे शहर’ म्हणुन शिरूर नावारुपाला येणार आहे! बीड सारखे गंभीर गुन्हे घडण्याची ‘प्रोसेस ‘ आज चालु आहे.असा अंदाज कोणी केला तर आश्चर्य वाटणार नाही. इतके ,’कोयते’ शिरुर मधील रस्ता चुकलेल्या तरुणांकडे असल्याची माहिती मिळत आहे.
Read more >>
एकतर ‘कोयता’ लोहाराकडे सहज 200/250 रुपयांना मिळतो—
एकतर ‘कोयता’ लोहाराकडे सहज 200/250 रुपयांना मिळतो,असे आमचे सोर्सेस सांगतात.दुसरे ,’कोयता’ इतर लाकडे तोडणे,टोपली,केरसुण्या ,शेतीतील किरकोळ कारणे,बिबट्याचे भय इ.कारणांमुळे लोक लोहाराकडुन कोयता नेत असतात.पण ‘तळपता” कोयता व तो चिडलेल्या गुंडांचे अवसान पाहुन माणसांची चड्डी पिवळी होण्याचीच बाकी राहते.हे काही जणांच्या पक्के ध्यानात आलेले दिसते ! आणि हेच हेरुन कोयता जो गावठी पिस्तूल पेक्षा सहज व स्वस्त मिळाला तर दहशतीतील लोक पाहुन असुरी आनंद होणारे लोक तो का हवेत फिरवणार नाहीत?आणि हेच घडत आहे!
Read more >>
सविस्तर घटना अशी आहे –
दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे येथील विशाल कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये फिर्यादी फिर्यादी संतोष बाळू पाचरणे, वय -42 वर्षे, व्यवसाय -मजुरी, राहणार -जांभळी मळा ,तरडोबाची वाडी ,तालुका -शिरूर जिल्हा- पुणे तसेच मालक शिवम शिंदे काम करत होते.
तुला आता दाखवतोच थांब !—-
त्यावेळी 1. परवेज उर्फ पाप्या पठाण ,2. रुपेश चित्ते ,3. ओंकार दत्तात्रय जाधव ,सर्व राहणार –तरडोबाची वाडी ,तालुका -शिरूर ,जिल्हा -पुणे यांनी संगणमत करून ओंकार जाधव हा फिर्यादी यांना म्हणाला की “तुला लय मस्ती आली आहे काय ?आमची तक्रार तहसील ऑफिसला करतोस काय? तुला आता दाखवतोच थांब !” असे म्हणून त्या तिघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी केली. पाप्या पठाण याने हाताने तसेच दुकानांमधील कात्रीने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर व पायावर मारहाण करून त्यांना जखमी केले.तसेच रुपेश चित्ते याने त्याचे हातातील कोयता दुकानासमोर फिरवला. आजूबाजूचे परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी त्यांची दुकाने बंद केली. तसेच दुकानासमोर रोडवर असणारे इतर व्यक्ती देखील पळून गेले. त्यानंतर उपस्थित आरोपींनी दुकानांमध्ये येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात ,पाठीमागील बाजूस, वार करून फिर्यादी यांना जखमी केले
.फिर्यादी तसेच मालक शिवम शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने तिघेजण दुकानाचे बाहेर पळून गेली. रुपेश चित्ते हा त्याचे हातातील कोयता फिरवत दुकानाच्या बाहेर निघून गेला आहे.
Read more >>
फिर्यादी –
संतोष बाळू पाचरणे, वय -42 वर्षे, व्यवसाय -मजुरी, राहणार -जांभळी मळा ,तरडोबाची वाडी ,तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
आरोपी –
1) परवेश उर्फ पाप्या पठाण (पूर्ण नाव माहिती नाही )
2) रुपेश चित्ते (पूर्ण नाव माहिती नाही )
3) ओंकार दत्तात्रय जाधव .
सर्व राहणार तरडोबाची वाडी,शिरुर, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशन मधे भारतीय न्याय संहिता कलम 118(1 )352,351(2)(3)3(5) ,भारतीय हत्यार कायदा कलम
4, 25 फौजदारी सुधारणा कायदा 2013 चे कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हणुन फिर्यादी यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
दाखल अमलदार श्री. राऊत हे आहेत.पुढील
तपास सहाय्यक फौजदार साबळे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.मात्र या घटना म्हणजे शिरुर पोलिसांसाठी एक आव्हानच आहेत !