
Contents
18 Varshachi Mulgi Bepatta :शिरूरमधून १८ वर्षांची मुलगी बेपत्ता!
शिरूर (पुणे), दि. २४ एप्रिल २०२५: (प्रकाश करडे यांच्याकडुन )
18 Varshachi Mulgi Bepatta:
शिरूर बायपास येथून एक १८ वर्षांची मुलगी दिनांक २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मुलगी शिरूर बायपास परिसरातील–
बेपत्ता झालेली व्यक्तीचे नाव सौ. जया करण चव्हाण (वय १८ वर्षे ९ महिने) असे आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील असून, सध्या त्या शिरूर बायपास परिसरातील सर्जेराव चव्हाण यांच्या जागी आपल्या पतीसोबत तात्पुरत्या निवासात राहत होत्या.
बेपत्ता होण्याचा प्रकार:
२३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जया चव्हाण कोणालाही काहीही न सांगता तंबूमधून निघून गेल्या आणि अद्याप परत आलेल्या नाहीत. यानंतर त्यांचे पती शिवाजी अर्जुन चव्हाण (वय २५, व्यवसाय – मजुरी) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत मिसिंगची तक्रार दाखल केली.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
•’रंग: गोरा
• केस: काळे, बुचडा बांधलेले
• उंची: ५ फूट २ इंच
• अंगावरील कपडे: पोपटी रंगाची साडी, काळा ब्लाऊज
• पायात सॅंडल, गळ्यात मंगळसूत्र, नाकात मुरणी
• मोबाइल फोन नाही
• भाषा: मराठी, हिंदी
• शिक्षण: सातवी पर्यंत
पोलीस तपास–
या प्रकरणाचा तपास पो. हवा. गरकळ करत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पो. नि. श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. प्राथमिक नोंद सहा फौजदार कदम यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
कृपया नागरिकांनी सहकार्य करावे–
जर कोणाला सौ. जया करण चव्हाण यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास मोबाईल नंबर ९५७९४८३४५९ वर त्वरित संपर्क साधावा.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …