
Contents
Shirur Kathine Marhan: जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीस ठीने मारहाण.
Shirur Kathine Marhan: चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
शिरूर | दिनांक 9 मे 2025:(कल्पना पुंडे यांच्याकडुन )
Shirur Kathine Marhan:शिरूर शहरातील गोलेगाव रोड येथील वात्सल्य हॉस्पिटलच्या शेजारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात श्रद्धा भगत भोसले (वय २२) या तरुणीच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना ५ मे २०२५ रोजी रात्री ९.३० ते १० दरम्यान—
ही घटना ५ मे २०२५ रोजी रात्री ९.३० ते १० दरम्यान घडली.आरोपी दीपक बबन गुंजाळ, विश्वास बबन गुंजाळ, सोहम झरेकर आणि एक अनोळखी इसम यांनी फिर्यादी, तिचे आई-वडील, भाऊ आणि चुलत मामा यांना लाकडी काठ्यांनी व हाताने मारहाण केल्याची माहिती एफआयआरमध्ये नमूद आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल —
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 351(2)(3), 352, आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलीस कर्मचारी खेडकर यांच्या नोंद केली.तर सहाय्यक फौजदार साबळे तपास करत असून, पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇
✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा..
✅ बुद्ध:शरद पाटील..
✅ मेत्ता व करुणा..
✅ बुद्धकालीन समाज..
✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने…