Contents1 शिरूरमध्ये अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत नेपाळी मजुराचा गंभीर दुखापतीने मृत्यू 1.0.1 About The Author1.0.1.1 Dr.Nitin Pawar1.0.2 ❤️ Support Satyashodhak Blog शिरूरमध्ये अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत नेपाळी मजुराचा गंभीर दुखापतीने मृत्यू शिरूर, पुणे (12 मे 2025): ( Satyashodhak News Report ) शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील एक गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 9:15 ते 9:30 च्या दरम्यान कोळपे हॉस्पिटलजवळील पुणे-अहिल्यानगर हायवेवर अज्ञात वाहनाने एक व्यक्तीस जोरात धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादी श्री. रुपेश टेकबहादुर दमाई (वय 24 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. बाबुराव नगर, ता. शिरूर, मूळ – अच्छाम, नेपाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चुलत्यांना – श्री. पहिला दिले दमाई (वय 50 वर्षे) यांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला व इतर भागांमध्ये गंभीर जखमा झाल्या असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 318/2025 अंतर्गत BNS कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), मो. वा. का. क 134, 177, 184 अन्वये नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पो.हवा खेडकर हे करत आहेत. अज्ञात वाहन व त्याचा चालक यांचा शोध सुरू असून स्थानिक पोलीस विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरूर : आठ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल – जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात मारहाण आणि शिवीगाळ बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ४ लाख ६८ हजारांचे दागिने लंपास !