
पुण्यातील रेव्ह पार्टी ,पक्षबदल, सोईची तेवढीत टिका आणि ड्रग्सचे सावट: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर आम आदमी पार्टीचा घणाघात!
रेव्ह पार्टी वर ‘आप’ ता घणाघात !
दिनांक २८ जुलै २०२५ | प्रतिनिधी |
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक; आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांची महायुती व महाविकास आघाडीवर घणाघात. महाराष्ट्रात ड्रग्स प्रस्थ वाढत असल्याने युवकांचे आयुष्य धोक्यात, असा इशाराही दिला.
पुण्यातील गाजत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला आहे.
“एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे कधी भाजपमध्ये, कधी राष्ट्रवादीत तर कधी दोन्ही ठिकाणी होते. त्यांच्या जावयांच्या विविध प्रकरणांवर सत्ताधारी आणि विरोधक ‘सोयीचं मौन’ बाळगत आहेत. एकीकडे गिरीश चौधरी यांच्या जमीन घोटाळ्यावर भाजप गप्प, तर दुसरीकडे खेवलकर प्रकरणावर राष्ट्रवादी मौन बाळगते. यावरून स्पष्ट होते की पक्ष बदल, भूमिका बदल आणि सोयीची टीका हेच धोरण राबवले जात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया किर्दत यांनी दिली.
त्याचबरोबर पुण्यातील वाढत्या ड्रग्स प्रकरणांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “ललित पाटील प्रकरण, फर्ग्युसन रोडवरील बार्स, कल्याणी नगरातील पार्ट्या, आणि पुणे विमानतळावरील ड्रग्स तस्करी हे सर्व संकेत देतात की पुणे महाराष्ट्रातील ‘ड्रग्ज हब’ बनत चालले आहे. हे केवळ पोलिस प्रशासनाचे नव्हे, तर संपूर्ण महायुती सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकारने ड्रग्स विरोधात मोहीम सुरू केली आहे. तशीच गरज महाराष्ट्रात आहे. अन्यथा या रेव्ह पार्टी संस्कृतीमुळे हजारो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतळांना•••••
1. https://www.loksatta.com/ – महाराष्ट्रातील राजकीय बातम्या
2. https://www.india.com/ – राष्ट्रीय बातम्यांसाठी
3. https://www.punekarnews.in/ – पुण्याच्या स्थानिक बातम्या
4.https://www.aamaadmiparty.org/ – आम आदमी पार्टीचे अधिकृत संकेतस्थळ
5. https://www.ncdirindia.org/ – भारतातील नशाबंदी संबंधित सरकारी माहिती
https://shorturl.fm/ZnkLv
https://shorturl.fm/ZVjz4
https://shorturl.fm/A78sL
https://shorturl.fm/NhBYi
https://shorturl.fm/kt23w