Contents0.1 Ambedkar Jayanti 2026 Castes Today : जात व्यवस्था आणि आजची खरी स्थिती1 भारतातील जातींची एकूण संरचना1.1 एकूण जाती (Castes): अंदाजे: 4,000 ते 5,000+ जातीकाही अभ्यासांनुसार: 6,000+ जाती वेगवेगळ्या राज्यांमध्ये नावं आणि वर्गीकरण बदलतात1.2 पोटजाती (Sub-Castes:अंदाजे: 25,000 ते 30,000+ पोटजातीप्रत्येक जातीमध्ये अनेक पोटजाती (उदा. मराठा, कुनबी, यादव, जाट इ.)1.3 भारतातील प्रमुख प्रवर्ग (Categories)1.4 अंदाजे संख्या (Government Data Reference)1.5 उदाहरणे (काही प्रमुख जाती):SC (दलित) : महार,चांभार,मातंग,वाल्मिकी:ST (आदिवासी):भील,गोंड,संथाल,वारली, OBC:यादव,कुर्मी,जाट,मराठा (काही राज्यांमध्ये),General: ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य1.6 महत्वाची नोंद1.7 निष्कर्ष1.7.1 सामाजिक बदलातील अडथळे1.7.2 शिक्षण आणि जागरूकतेची गरज1.7.3 नव्या पिढीची भूमिका1.7.4 कायदा आणि समाज यांचा समतोल1.7.5 समतेकडे वाटचाल1.7.6 अंतिम विचार1.7.7 निष्कर्ष1.7.8 14 Date- 14 Revolutionary Articles वाचा >>>>1.7.9 About The Author1.7.9.1 Dr.Nitin Pawar1.7.10 ❤️ Support Satyashodhak Blog Ambedkar Jayanti 2026 Castes Today : जात व्यवस्था आणि आजची खरी स्थिती 7 April 2026 : ” Date 14 – 14 Revolutionary Articles ” by Dr. Nitin Pawar, Pune प्रस्तावना Ambedkar Jayanti 2026 Castes Today लेख 7 हा बाबासाहेबांना एक Atribute म्हणून आम्ही जो, ” 14 Date- 14 Revolutionary Articles “ लिहून ती जगभर शेअर करुन एखादे कणभर काम बाबासाहेबांनी दिलेल्या नवजिवनाची आठवण व त्यांना एक वेगळी मानवन्दना देण्याचा मी विचार केला. थोडेफार वाचन, माझे Interpretation, ब्लॉगसारखे साधन जे लिहिण्यासाठी उपलब्ध आहे. ते वापरून लिहिने शक्य आहे, हे समजल्यावर व ती इतर भाषांत लिहून मराठी, हिंदी व इन्लिश भाषेत लिहावीत आणि आज जे सोशल मिडियाचे माध्यम उपलब्ध आहे. दुसरे linkedin, X सारख्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठी, हिंदी व इन्लिश वाचकापर्यन्त पोचवावे, अशा भावनेतुन हा उपक्रम या वर्षी केला. United States मधून 250+ वाचकाकडुन वाचले गेल्याचे Analytics माध्यमातून समजल्यावर आनंद द्विगुणित झाला खरा! Ambedkar Jayanti 2026 Castes Today या लेख 7 मधे जात caste जी प्रयेकाची प्रत्येकाला प्रिय असते. पण ती वैज्ञानिक नाही. अन्धस्रद्धा आहे. जेनेटिक्स तपासा. मग कळेल. हे विशेष नमुद करतो. बाकी सर्व भ्रम, haullusination आहे. आभासी, काल्पनिक आहे. विज्ञान नीट समजून घेता शिक्षक प्राध्यापकानी आपल्याला शिकवले म्हणून नाही समजले. हे फक्त पोटार्थी होते व आहेत. राहतील. म्हणून तुच ‘तुझ्याा जीवनाचा शिल्पकार’ हे मानुन सत्य शोधावे. भारतातील सामाजिक रचनेत जात व्यवस्थेचा खोलवर प्रभाव राहिला आहे. या व्यवस्थेविरोधात सर्वात प्रभावी लढा दिला तो बाबासाहेब यांनी.याला तोड नाही. काळ, साधने, शासक ही बाब काहीशी जुळून आली. बाबासाहेबांनी त्याचे महत्व ओळखले. ‘लोहा गरम है,मार दो हातोडा’ सारखे लेखणीच्या एका फटकार्यात भारतातील अस्पृश्य तेची प्रथा बन्द करण्यात येत आहे, असे सन्विधानात स्पष्ट नमुद करुन देशपातळीवर कायद्याने ती बन्द केली. तशी इतिहासात कुणाला करता आली नव्हती. राजे अनेक होते. चांगले राजे, लोकाभिमुख राजे देखील होते. पण ते असे करु शकले नव्हते.Ambedkar Jayanti 2026 Castes Today हा लेख हे अधोरेखित करु इच्छितो. स्वातंत्र्यानंतर अनेक बदल झाले, कायदे बनले, शिक्षणाचा प्रसार झाला—पण प्रश्न असा आहे की, जात व्यवस्था खरोखर संपली आहे का?एकदम नकारात्मक उत्तर नाही याचे! काहींना उगाचच नकारात्मक उत्तर हवे असते. पण रोटी बन्दी हटली, अस्पृश्यतेची प्रथा गेली. पाणी हक्क मिळाला. मन्दीर हक्क मिळाला. नोकर्या मिळाल्या. माझ्या वडिलांचा शिपाई कुलकर्णी नावाचा केबीनच्या बाहेर स्टुलवर बसत असे. आत वडिल. Office Superitendant. Ambedkar Jayanti 2026 Castes Today या लेखात हे एक सत्य उदाहरण मुद्दाम देत आहे.’ते होवु शकत नाही, ये कभी नहीं हो सकता’ असे सांगणारे दलिंदर रस्तोरस्ती भेटतात. त्यांना धरुन पकडून नेउन किती तरी गोष्टी “झाल्या आहेत, ये हो गया है’ हे समक्ष दाखवावे. म्हणजे भानावर येतील. बेल वाजवली को तो शिपाई पटकन आत जात असे. काम करत असे. रजा, इतर अडचणींच्या वेळी कलेढोण च्या सरकारी क्वार्टर मधे घरी तो त्याची पत्नी येत असत. वडील त्यांच्या सोईने प्रश्न सोडवत असत. त्याला कधी रागावत नसत. तो गान्धीटोपी घालत असे. त्याचा वडिल खुप लाड करत. हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. कुणाला शन्का असेल तर कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा येथे जाऊन असे कोणी होते का? पाहिजे तशी चौकशी करा. असे झालेले बदल नोंद करण्याचे प्रमाण कमी दिसते. दलित साहित्यात नाही दिसत. मी दलित साहित्य वाचले आहे. असो. हे check करण्यासाठी असते. भारतातील जातींची अचूक संख्या सांगणे कठीण आहे—कारण देशभरात हजारो जाती (castes) आणि लाखो पोटजाती (sub-castes) आहेत, आणि सर्वांची अधिकृत एकत्रित यादी उपलब्ध नाही. तरीही सरकारी अहवाल, सामाजिक अभ्यास आणि सर्वेक्षणांवर आधारित एक स्पष्ट आणि उपयोगी लिस्ट खाली दिली आहे 👇 भारतातील जातींची एकूण संरचना “भारतामध्ये किती जाती आणि पोटजाती आहेत? या लेखात संपूर्ण माहिती जाणून घ्या.” एकूण जाती (Castes): अंदाजे: 4,000 ते 5,000+ जातीकाही अभ्यासांनुसार: 6,000+ जाती वेगवेगळ्या राज्यांमध्ये नावं आणि वर्गीकरण बदलतात पोटजाती (Sub-Castes:अंदाजे: 25,000 ते 30,000+ पोटजातीप्रत्येक जातीमध्ये अनेक पोटजाती (उदा. मराठा, कुनबी, यादव, जाट इ.) भारतातील प्रमुख प्रवर्ग (Categories) प्रवर्ग पूर्ण नाव वैशिष्ट्य SC अनुसूचित जाती ऐतिहासिकदृष्ट्या वंचित, दलित समाज ST अनुसूचित जमाती आदिवासी समाज OBC इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास EWS आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या कमजोर (General मध्ये) General सामान्य प्रवर्ग आरक्षण नसलेले अंदाजे संख्या (Government Data Reference) प्रवर्ग अंदाजे जाती संख्या SC ~1,200+ जाती ST ~700+ जमाती OBC ~2,600+ जाती General निश्चित नाही उदाहरणे (काही प्रमुख जाती):SC (दलित) : महार,चांभार,मातंग,वाल्मिकी:ST (आदिवासी):भील,गोंड,संथाल,वारली, OBC:यादव,कुर्मी,जाट,मराठा (काही राज्यांमध्ये),General: ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य महत्वाची नोंद भारतात जात व्यवस्था अत्यंत जटिल आहे प्रत्येक राज्याची स्वतंत्र OBC/SC/ST यादी असते 1931 नंतर पूर्ण caste census झालेला नाही (Socio-Economic Caste Census 2011 झाला पण पूर्ण डेटा सार्वजनिक नाही) निष्कर्ष 👉 भारतात: 5000+ जाती 30,000+ पोटजाती 5 प्रमुख प्रवर्ग (SC, ST, OBC, EWS, General) ही व्यवस्था सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या खूप गुंतागुंतीची आहे. Ambedkar Jayanti 2026 Castes Today : इतिहास ते वर्तमान पूर्वीच्या काळात जात व्यवस्था अत्यंत कठोर होती. व्यक्तीचा जन्मच त्याचे भविष्य ठरवत होता.त्याचा व्यवसाय, पेहराव, वस्ती, आभुषणे, खाणे, पिणे, नातलग अगदी त्याचे सर्व जीवनच जन्माने ठरत होते. आज हे किती तरी भयंकर वाटते. स्वातंत्र्याचा हा मोकळा श्वास ही बाबासाहेबांची देण आहे. तरी आज परिस्थिती बदलली आहे, पण पूर्णपणे नाही. शहरांमध्ये आधुनिकता दिसते, ती फक्त Hardware मधे म्हणजे आधुनिक घरे, पोषाख, गाड्या, वस्तू इ. पण मेन्दुची विचार करण्याची पद्धती software हे काही फारसे बदलले नाही.शहरात लोक शेवटी गावामधुनच येत असतात. पण अनेक लाम्ब लाम्बुन वेगवेगळ्या कारणास्तव लोक शहरात येतात. सम्बंध नवा असतो. गावासारखा पिढ्यानं पिढ्याचा नसतो.व्यवसाय, राहणीमान, सरकारी नोकरीचा factor, भाषा, शहरात थेट शेती नसते. कारखाने असतात, इ. इ. अनेक कारणामुळे जातीभेदाचे प्रमाण जवळ जवळ सम्पले आहे. तरुण तरुणी जात न पाहता विवाह करु लागली आहेत. कदाचित उरली सुरली जातीव्यवस्था नवीन पिढी येत्या 10 वर्षात पालापोचोळ्यासारखी उडवून लावेल. पोलीस स्टेशन मधे येणारे तरुण तरुणीचे विचार ऐका म्हणजे समजेल. अर्थात हे ते जाणीवपूर्वक करणार नाही. नकळतपणे घडेल. जाती व्यवस्था शेवटच्या घटका मोजत आहे. हे नक्की. जात नाही ती जात. यात तथ्य नाही. तत्थ्य फक्त जात शब्दाचा यमक जुळतो एवढेत. पण प्रेम, शरीर, वासना, स्री पुरुष यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती या secular च होत्या. आणि राहतील. माणसाने निर्माण केलेले नियम वेगळे आणि निसर्गाने निर्माण केलेले नियम वेगळे. निसर्ग वारंवार झटका देऊन पृथ्वीवरते सन्तुलन पुर्ववत करत असतो. जात कधीच नष्ट होणार नाही, असे एक वकील मित्र म्हणाला होता मला मन्चर मधे. मी विचारले, ” पृथ्वी नष्ट होणार आहे का सुर्यातली उर्जा नष्ट झाल्यावर? बरे त्याला भुगोल माहिती होता. तो म्हणाला,’बरोबर आहे तुमचे! बदल हा निसर्गाचा नियम आहे. पुर्वी जिथे राजे, रजवाडे, सरन्जाम होता. आजचे ते आमदार, खासदार, सन्सद होते. पण वन्शजही शोधावे लागतात आज. दिल्लीचा लाल किल्ला, ताज महाल कोण असते तिथे. फक्त पर्यटक!वन्शज सापडत नाहीत. असो. जातही नष्ट होणार आहे आपण स्वतः decaste झालो तर लवकर होईल. मी 25 वर्षापुर्वी decaste झालो. मला कधी देवळात जायची गरज वाटली नाही. कधी यात्रेला नाही. कधी पुरोहिताची गरज लागली नाही. कधी उपवास, नवस करायची गरज लागली नाही. तरी मी आनंदात जगलो. ती पापी, लोभी व भित्र्या लोकांना लागते. लोकच मला म्हणत असतात. “तुम्ही सुखी आहात राव!”थोडफार दुख: आहेच. पण या लोकांच्या पेक्षा कमी!असो. ग्रामी भागात अजूनही जातीय भेदभावाचे स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहे. आजची वास्तव स्थिती ° आज आपण पाहतो: • विवाहांमध्ये अजूनही जात महत्त्वाची मानली जाते • काही ठिकाणी सामाजिक बहिष्काराच्या घटना • शिक्षण आणि नोकरीत असमानता • कायदे असूनही मानसिकता बदलण्यात अजून वेळ लागतो. • जात तोंडातुन शब्द रुपाने बाहेर येत नाही. मनात आहे. हे ही नवीन 15/16 वर्षांची मुले मुली बन्द करतील. कारण रक्ताची नाती तयार होतील. मग आपल्या रक्ताला कोणी छोटा कसा समजेल? रक्तच मिसळुन जाईल. • आणि एक राष्ट्र म्हणून तसे होणे आवश्यक आहे! संविधानाची भूमिका • सन्विशानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. • जातीय भेदभावाविरुद्ध कठोर कायदे आहेत. पण केवळ कायदे पुरेसे नाहीत—त्यांची अंमलबजावणी आणि सामाजिक स्वीकारही तितकाच महत्त्वाचा आहे. डिजिटल युगातील बदल • आज सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे लोक अधिक जागरूक होत आहेत. • जातीय अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, चर्चा होते, आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न होतात. हा एक सकारात्मक बदल आहे. आपण काय करू शकतो? जात व्यवस्था संपवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे: • जात विचार न करता माणूस म्हणून वागणे(decaste होणे) • भेदभावाविरुद्ध आवाज उठवणे • शिक्षण आणि जागरूकता वाढवणे छोट्या कृती मोठा बदल घडवू शकतात. सामाजिक बदलातील अडथळे आजच्या काळात कायदे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजात मोठे बदल झाले आहेत. पण जात व्यवस्थेच्या मुळाशी असलेली मानसिकता अजून पूर्णपणे बदललेली नाही. अनेक वेळा लोक बाहेरून आधुनिकतेचा स्वीकार करतात. पण विचारसरणीत अजूनही जुने भेदभाव टिकून आहेत.आधी लिहिल्याप्रमाणे. उदाहरणार्थ, उच्च शिक्षण घेतलेले किंवा शहरात राहणारे लोक देखील विवाह, सामाजिक संबंध किंवा व्यवसायिक निर्णय घेताना जात विचारात घेतात. यावरून स्पष्ट होते की समस्या केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर ती समाजाच्या प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे.पण नवीन पिढीसाठी नगण्य आहे. शिक्षण आणि जागरूकतेची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक क्रांतीचे सर्वात मोठे साधन मानले. त्यांचा विश्वास होता की शिक्षणामुळे व्यक्तीला स्वतःचे अधिकार कळतात आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळते. आजही शिक्षण हेच एक प्रभावी माध्यम आहे ज्यामुळे जातीय भेदभाव कमी होऊ शकतो. शाळा, महाविद्यालये आणि समाजमाध्यमे यामधून समानता, मानवता आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे.शकतो, शकतो म्हणारे खुप असतात. पण आता आणि इथेच सम्पवणारेही वाढत आहेत. नव्या पिढीची भूमिका आजची तरुण पिढी ही डिजिटल युगात वाढलेली आहे. त्यांना माहिती मिळवणे, प्रश्न विचारणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे सोपे झाले आहे. जर ही पिढी जात, धर्म, भाषा यापलीकडे जाऊन “मानवतेला” प्राधान्य देईल,जात पाहून बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड निवडतील तरी पुढे चांगल्या भविष्याची शाश्वती नाही.भविष्यातील भारत अधिक समतावादी आणि प्रगत होऊ शकतो. सोशल मीडियाचा योग्य वापर करून सकारात्मक विचार पसरवणे ही आजच्या तरुणांची मोठी जबाबदारी आहे. कायदा आणि समाज यांचा समतोल भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. जातीय भेदभावाविरुद्ध कठोर कायदे अस्तित्वात आहेत, परंतु केवळ कायदे करून समाज बदलत नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे मूल्य स्वतःच्या आयुष्यात स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा कायद्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलते, तेव्हाच खरा सामाजिक परिवर्तन घडतो. समतेकडे वाटचाल आज भारत एका परिवर्तनाच्या टप्प्यावर उभा आहे. एकीकडे आधुनिकता, तंत्रज्ञान आणि शिक्षण आहे, तर दुसरीकडे अजूनही जातीय विचारांची सावली आहे. या विरोधाभासातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात समानतेचा विचार स्वीकारला, तर समाजात मोठा बदल घडू शकतो. अंतिम विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी दिलेला संदेश — “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” — हा केवळ घोषवाक्य नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आहे. जात व्यवस्था पूर्णपणे संपवायची असेल, तर केवळ कायदे नव्हे तर विचार बदलणे गरजेचे आहे. “जात नाही, माणूस महत्वाचा!” हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला, तरच खरी समता आणि न्याय मिळू शकतो. निष्कर्ष जात व्यवस्था कायद्याने कमी झाली असली, तरी मानसिकतेत अजूनही तिचे अंश आहेत. 👉 म्हणूनच — “जात नाही, माणूस महत्वाचा!” हा विचार स्वीकारल्याशिवाय खरी समता शक्य नाही. ” आणि सर्वात महत्वाचे ती टिकून राहावी असा प्रयत्न बहुदा राजकीय क्षेत्रातुन होतो. त्यापासून सावध रहावे. त्यांना vote bank हवी असते ! हे सर्व पक्ष, सन्घटना, कार्यकर्ते कळत नकळत करत असतात.’ Authoritative Links अधिक माहितीसाठी- https://www.britannica.com/topic/caste-social-differentiation https://www.un.org/en/fight-racism https://www.amnesty.org/en/what-we-do/discrimination/ “समतेचा विचार पुढे नेण्यासाठी हा लेख शेअर करा!” 14 Date- 14 Revolutionary Articles वाचा >>>> Dr B R Ambedkar Biography 2026 | अभिनव अभिवादन ;14 दिन – 14 क्रांति लेख; Ambedkar Jayanti 2026 | विशेष लेखमाला | 14 दिनांक 14 क्रांतिकारी लेख | लेख :2 Ambedkar Jayanti 2026 Our Duties : आपली संविधानिक जबाबदारी काय असते ? -4 About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Ambedkar Jayanti 2026 Education : Why Education is a Tool of Social Change | 6 Indian Constitution and Modern Democracy Explained – Article – 9