Ambedkar Jayanti 2026: बाबासाहेब आजही आवश्यक आहेत का? –"14 दिनांक -14 क्रांतिकारी लेख"
Ambedkar Jayanti 2026 | विशेष लेखमाला |14 दिनांक 14 क्रांतिकारी लेख|लेख – 2
Ambedkar Jayanti 2026 निमित्ताने मी सम्पादक, सत्यशोधक ब्लॉग/न्यूज वेगळ्या पण अर्थपुर्ण आणि सर्व भारतीय समाजाला बाबासाहेब आजही आवश्यक आहेत का ? या प्रश्नावरचे उत्तर विचार करुन काय मिळते? ते माझ्या उपक्रमातुन बाबासाहेबांना आदरांजली द्यायची ती Ambedkar Jayanti 2026 साठी “14 दिनांक – 14 क्रांतिकारी लेख” हे लेख लिहून प्रसिद्ध करुन सर्वत्र शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे या स्वरुपात मला शक्य आहे. म्हणून या अभिनव उपक्रमाने आदरांजली द्यायची. हाच उद्देश.
मी म्हणतो ज्याला जे सुट होते ते त्याला विकसित करायला प्रोत्साहन देणे ही एक महत्वाची समज बाबासाहेबाच्या अनुयायामधे फार कमी दिसते. चळवळ जर खरी असेल तर ती चालवायची नाही. तर यशस्वी करायची असते.फक्त चालवायची म्हटले तर त्यात प्रस्थापिताना काही अडचण नाही. ते मागील दाराने रसद पुरवतील. पण तेच सत्तेत राहतील. मान्य. कान्शीराम यांच्या नंतर चळवळ फक्त चालली आहे.
Ambedkar Jayanti 2026 फक्त चालवुन आपला, कार्यभाग साधत असेल तर ती फक्त चालवण्यामधे काही जणांना रस वाटू लागतो. सामाजिक, राजकीय उद्देश पुर्ण होत नसतील तरी! कोणी निवडून येत नसेल तरी. सत्ता मिळत नसेल तरी. अशांना नोयडा वगैरे मधुन रसद येते. असे मी लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान ऐकले होते. अर्थात सच्च्या ध्येयवादी कार्यकर्त्यांना सावध राहणे आवश्यक असते.
प्रस्तावना—
भारतातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तनाचा इतिहास लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.मुख्य कारण कमी वेळात बाबासाहेबांनी ते यशस्वी केले. फार कमी वेळात एक चमत्कार वाटावा असे बदल झाले.बाबासाहेब केवळ एका व्यक्तीचे नाव नाही, तर एक विचारसरणी , एक चळवळ आणि एक क्रांती आणि तत्वज्ञान आहे. एक युग बदलणारे आहेत .असे दाखले जगाच्या इतिहासात फार कमी आहेत. आज 2026 मध्येही त्यांचे विचार तितकेच जिवंत आणि आवश्यक आहेत, जितके ते त्यांच्या काळात होते.
पण तरीही मी प्रश्न हा विचारला की खरच आवश्यक आहेत का? कुणाला ते कालबाह्य वाटु शकतात. ते काम झाले आहे, असे वाटु शकते. कारण सन्विधान लागु आहे. प्रत्येकाने फक्त त्याचे पालन स्वतः करायचे. बस्स बाकी काही नाही. काहींना ती हौस वाटू शकते. अधिवेशनाच्या निमित्ताने सहल देखील दरवर्षी उरकून घेता येते सहकुटुंब म्हणून!
खरे तर आमच्या मते समता आणि न्यायाची लढाई आजही सुरू आहे. सन्विधानच निष्क्रिय करण्याचे प्रयत्न आधी कधी नव्हते त्यापेक्षा जास्त आणि चौफेर चालू आहेत. बाबासाहेबांनी समाजातील स्वातंत्र्य, विषमता, अन्याय आणि जातीय भेदभावाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. आज भारत आधुनिक झाला आहे. तरी सामाजिक स्तरावर अजूनही अनेक समस्या अस्तित्वात आहेत. जात, धर्म, लिंग या आधारे होणारा भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. तर हेतू पुरस्कर वाढवला जात आहे. म्हणून Ambedkar Jayanti 2026 निमित्ताने बाबासाहेब आजही आवश्यक आहेत का ?
जात प्रवर्ग निर्माण करुन बाबासाहेबानी जातीचे वर्गात रुपान्तर केले होते.ते परत उलटे करुन प्रवर्गातील एका एका जातीला स्वतन्र आरक्षणाने विकास होईल, असे भासवून, भिती दाखवून लिलया जातींना पुन्हा जातीची ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे जिचा अन्त करायचा आहे.समाज डिकास्ट जातविरहित बनवायचा आहे.अगदी त्याच्या उलट प्रयोग केला जात आहे.एनकेन प्रकारे सरकारी सन्थान्चेच खाजगीकरण करुन प्रगती रोखण्यात आली.
पुर्वी शिक्षणान्तर हमखास नोकरी मिळायची शिपायाची तरी. त्यातुन आर्थिक सुरक्षितता, थोडी प्रगती आणि सामाजिक दर्जात वाढ व्हायची. हे मी पहात पहात मोठा झालो आहे.आज मुलं थोडी मोठी झाली की कुठेही कामाला पाठवणे क्रमपात्र झाले. सन्ख्येनुसार प्रतिनिधित्व, पर्यायाने निर्णय प्रक्रियेत सहभाग घटत गेला. दुसऱ्या बाजूला सामाजिक व आर्थिक स्थिती एकुण लोकसंख्येच्या मानाने जैसे थे. काही परत मागे जाऊ लागले. बन्धुता रक्ताच्या नात्यान्च्या भावनेतुन येते. त्यासाठी आन्तरजातीय विवाह विचारावर आधारित होणे गरजेचे होते.
ते काही प्रमाणात माध्यमे बिझनेस साठी म्हणून उत्तान फोटो, व्हिडीओ, पोर्न साईटस्, ओटीटी प्लेटफार्म, मोबाईल फोन, लोकसंख्या गर्दी, शिक्षण कमी असणे, पैशाचे short कट मार्ग म्हणून म्हणजे विचारांच्या ऐवजी विकृत मानसिकतेतुन होत आहेत. हा सामाजिक परिवर्तनाचा नाही तर बदफैलीपणाचा प्रकार असतो. म्हणून बाबासाहेब आजही आवश्यक आहेत का ? हे Ambedkar Jayanti 2026 निमित्ताने आन्तरजातीय विवाह विचारांवर आधारित करावेत. असे आम्ही मानतो.
Ambedkar Jayanti 2026 ला स्वातंत्र्याची स्थिती काय आहे? साधे खरे बोलण्यास देखील माणूस आता घाबरू लागला आहे. बाकी विचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, सन्धीची समानता, आस्था, उपासनेचे स्वातंत्र्य, लेखनाचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य कुचकामी ठरले आहेत. समतेचे तसेच आहे. अमर्याद भान्डवल, कमी पगारात कामगार, स्रमिक उपलब्ध होणे क्रमपात्र आहे. त्यातून आर्थिक शोषण पुर्वीपेक्षा वाढले.
आर्थिक दरी वाढली. आर्थिक विषमता वाढली. स्पर्धा, नफेखोरी, बेकायदेशीर सम्पत्ती, काळा पैसा, भ्रष्टाचार यातुन काय ढेकळ आर्थिक विषमता सम्पणार आहे. ती वाढत आहे. टोकाची स्थिती क्रोनी केपिटेलिझम म्हणजे मोठे उद्योग समुहच दुसरा समुह विकत घेतो. यातुन मक्तेदारी जागतिक पातळीवर निर्माण होत आहे. इथं कार्ले मार्क्स यांचे अर्थशास्त्र फारच मागे पडले.
अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे “समता, बंधुता आणि स्वातंत्र्य” हे तत्व आजही मार्गदर्शक ठरते.
शिक्षण:
खऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली शिक्षण हे असते. ते मिळाले तर पाहिजे! ते अधिक कठीण झाले. शिवाय काय शिकवायचे? काय नाही हे देखील वरच्या पातळीवरुन सत्ता व भान्डवलशाही ठरवू लागले आहेत. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते — “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” आजच्या डिजिटल युगात शिक्षणाची साधने वाढली आहेत, पण गुणवत्तापूर्ण शिक्षण अजूनही सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर आजही दिसते. त्यामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे आणि ज्ञानाच्या माध्यमातून सशक्त होणे ही बाबासाहेबांची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे.
संविधान:
लोकशाहीचा पाया भारताचे संविधान तयार करताना बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण केले. हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर देशाच्या लोकशाहीची आत्मा आहे. आजच्या काळात संविधानाचे महत्व समजून घेणे आणि त्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.एवढे कमीत कमी प्रत्येकाने स्वतः करावे लागते.
डिजिटल युगातील बाबासाहेब :
आज सोशल मीडिया, AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार अधिक वेगाने पसरत आहेत. युवक आता केवळ वाचत नाहीत, तर विचार करतात, चर्चा करतात आणि बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी जित आहे.पण खुप अपुर्ण आहे. त्यावर सर्व प्रकारच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली राजकीय सत्ता मिळु शकत नाही.
आजच्या युवांसाठी संदेश-
आजच्या युवकांनी बाबासाहेबांकडून तीन गोष्टी शिकायला हव्यात: प्रश्न विचारण्याची सवय शिक्षणाची कदर, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य. युवकच देशाचे भविष्य आहेत, बाबासाहेबांचे विचार त्यांना योग्य दिशा देऊ शकतात.हे त्यांना समजून सांगितले पाहिजे.
निष्कर्ष—
बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते आजच्या आणि उद्याच्या भारतासाठी एक मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार जिवंत ठेवणे म्हणजेच एक समतामूलक आणि न्याय्य समाज घडवण्याची दिशा आहे.
म्हणूनच — “बाबासाहेब आजही आवश्यक आहेत, आणि पुढेही राहतील!”
अधिक माहितीहसाठी व अभ्यासासाठी उपयुक्त लिंकस् >>>>>>
https://www.britannica.com/biography/B-R-Ambedkar
https://www.constitutionofindia.net
https://www.un.org/en/global-issues/human-rights
बाबासाहेबांवरील महत्वपूर्ण अन्य लेख>>>>>
Conspiracies on Constitution, B. R. Ambedkar, and V. N. Rav
Dr.Babasaheb Ambedkar यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या ५ रंजक गोष्टी : एक सखोल लेख
