समाजातील कटू वास्तव मांडणारी ‘बालवधू वेश्या बनली’ ही मराठी लघुकथा – लेखक डॉ. नितीन पवार
Contents
बालवधू वेश्या बनल्याची कथा
(सत्य घटनेवर आधारित)
(लघुकथा — दलित साहित्य शैलीत)
19 th April 2026
क्रांती नगर.एक झोपडपट्टी होती.
हे या वस्तीचे नाव नेमके ठेवले कोणी? याचे उत्तर एक ‘conspiracy Theory’ ठरेल.पण कथा, कविता, काव्ये, महाकाव्ये यांचा विषय कधी मध्यम वर्गीय जीवनशैली जगणे किंवा अदानी अम्बानी सारखे जिवन बनु शकत नाही. कारण त्यात काही ,’ मसाला’ नसतो ! वेदना नसतात. वन्चितता नसते. दुख: नसते. विशेष घटनांची नागमोडी वळणे नसतात. वाचणारा झोपुन जाईल ते वाचताच!
हा नामकरण कर्ता प्रतिभावान नक्की असावा. पण त्याची प्रतिभा उलटी असावी. कारण क्रांती नगर मधे शांती नसे नान्दत! आणि शांती ही क्रांती ची पुर्व अट असते. असे शोकडो पुस्तके वाचून देखील कुठे सापडले नाही. किंबहुना क्रांती आणि शांती एकत्र नान्दू शकत नाही. सन्सार करु शकत नाही.
हे नाव मोठं. पण वास्तव कुजलेलं. क्रांती जीवन बदलणारी असते. बिगडवणारी नसते.इथे जीवन बिघडवणारे सर्व कारक खचुन भरलेले होते. तरी माणसाचे शरीर व मन कुठेही राहीले तरी स्वतः साठी एक confort zone किंवा cell बनवतेच! ही एक देणगी दिलेली असते. म्हणून इथे सरावाने आनंदी राहणारे लोक होते. त्यांचे एक विश्व त्यांनी बनवले होते.
तर क्रांती शगर मधे गटारांचा वास.
दारूच्या गुत्त्यांवर गर्दी.
मटक्याच्या आकड्यांवर जीव टाकणारे पुरुष.
जुगार, शिव्या, मारामाऱ्या.उघडी नागडी लेकरं.आणि एखाद दुसरा,’ एखादे पाखरू’ सापडते का? म्हणून चक्कर मारत असे.
झोपड्या एकमेकींना चिकटलेल्या.
श्वास घ्यायलाही जागा नाही.खाम्ब, पत्रे आणि भिन्त म्हणून कापड, पत्रे, जाळ्या, लुगडी वापरलेली असत.
त्या सगळ्यात एक मुलगी होती — कविता.
हसरी.
निरागस.डोळे अगदी अपवादात्मक ब्राऊन मार्बल सारखे. हेच तिचे वैशिष्ट्य. सडपातळ शरीर यष्टी हाडकुळी आणि बारीख. रन्ग 15 दिवस किंवा 3 महिन्यानी आन्घोळ केल्यावर कसा असेल. तसा होता.ती गल्लीत मैत्रिणीसोबत खेळणारी होती.
तिच्या डोळ्यात अजून अंधार उतरला नव्हता.भविष्य काय वाढुन ठेवले आहे तिच्या वाट्याला येणारे, ते डावुक नव्हते.
दोन वर्षांनी ती पुन्हा दिसली.
पोटात मूल.म्हणजे लग्न उरकलं कुटुबीयानी. तिलाही त्याची गम्मत व मजा वाटलेली दिसत होती. तरी मैत्रीणीबरोबर ती पोट घेऊन सुद्धा खेळताना दिसली.
आता बालपण आणि मातृत्व —
एकाच शरीरात अडकलेलं.मिसळलेले. बाल वयातुन थेट प्रौढ वयात प्रवेश. हे भारतात पुर्वी पासून घडत आलेले एक महत्वाचे व युनिक फिचर आहे
बालपण ते थेट पौढपण. मधले तारुण्य या देशाला कधी मिळाले नाही. माझ्या आत्याचे लग्न झाले तेव्हा ती पाळण्यात होती. नवरदेवही दुसऱ्या पाळण्यात होता. हे मला वडिलांनी सांगितले होते. मी पाहिलेले नाही.
असे का? तर “आमच्यात असंच असतं,”
कोणीतरी सहज सांगून गेला.
लग्न झालं.
संसार सुरू झाला.
एकदा ती भिंत बांधत होती.
तो मुल कडेवर धरून उभा.पहिल्यांदा मी तो नवरा पाहिला होता. मला आनंद वाटला. जोडी छान होती. पण नजर लागणार होती कुणाची तरी पुढे!
पहिल्यांदा पाहताना वाटलं —
चित्र छान आहे.
पण ते फक्त थोडा काळ होतं.
दारू हळूहळू घरात शिरली.
नवरा तिच्यात नव्हता,
तो बाटलीत होता.
घर चालवायला ती बाहेर पडली.
ती फोनवर बोलताना दिसू लागली.
नवीन चेहरे.
नवीन ओळखी.
उशिरा घरी येणं.
अवेळी गायब होणं.
संशय मनात घर करू लागला.
एक दिवस सत्य समोर उभं राहिलं.
नातलगच मुली पुरवत होता.
रक्ताचं नातं —
दलालीत बदललेलं.
औद्योगिक भागात रात्र वेगळी असते.
लॉजच्या बाहेर सावल्या उभ्या असतात.
दलालांचे मोबाईल वाजत असतात.
“एक काम” —
कोडवर्ड.
मुली —
संख्या बनलेल्या.
पोलीस स्टेशन जवळच.
राऊंड येतो.
पण नेमकी जागा चुकते.
अज्ञान?
की संगनमत?
उत्तर कुणाकडेच नाही.
कविता आता बदलली आहे.
नजरेत सराईतपणा.
बोलण्यात कठोरपणा.
इशारे समजतात तिला.
आणि ती इशारे देतेही.
ती आता “मॅडम” आहे.
नवरा कोमेजलेला.
शेवटच्या टप्प्यात.
ती वाट पाहतेय —
त्याच्या मृत्यूची.
खलनायक एक नाहीत.
दारू आहे.
नातलग आहेत.
समाज आहे.
प्रशासन आहे.
आणि सर्वात मोठं —
दारिद्र्य.
वय वाढतं.
ग्राहक कमी होतात.
नवीन मुली येतात.
जुनी शरीरं —
रस्त्यावर पडतात.
दारूत बुडतात.
कोणी विचारत नाही.
ना समाज.
ना कुटुंब.
ज्यांनी ढकललं —
तेच दूर उभे राहतात.
एकदा विचारलं —
“हे सगळं थांबवत का नाही?”
उत्तर आलं —
“आमच्यात असंच असतं.”
ही परंपरा आहे.
शोषणाची.
अंधाराची.
कविता दोषी नव्हती.
ती परिस्थितीची कैदी होती.
कोणतीही मुलगी
स्वतःहून वेश्या होत नाही.
तिला बनवलं जातं.
स्वप्नं होती —
शाळेची, खेळाची.
आता फक्त व्यवहार आहेत.
प्रश्न अजूनही उभाच आहे —
हा अंधार कधी संपणार?
यांचा स्वाभिमानी समाज कधी येणार?
यांचा शेवटचा माणूस कधी हसेल?
क्रांती नगर अजूनही तिथेच आहे.
आणि कविता…
अजूनही कुठेतरी जिवंत आहे.
