Contents 1. दारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला : शिरूरमध्ये गंभीर प्रकार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल !1.1. दारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला केल्याने खळबळ !1.1.1. सविस्तर घटना अशी आहे —-1.1.2. शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास—1.1.2.1. अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••1.1.2.2. आणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••1.1.3. About The Author1.1.3.1. Dr.Nitin Pawarदारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला : शिरूरमध्ये गंभीर प्रकार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल !दारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला केल्याने खळबळ !शिरूर ,पुणे , दिनांक ७ ऑगस्ट २०२५ |प्रतिनिधी |शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात एकाने दारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण बातमी.दारूच्या नशेत महिलेवर चाकू हल्ला केल्याची घटना शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात घडली आहे. या महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आली आहे.या घटनेतील आरोपीने दारूच्या नशेत जेवण अथवा पैसे देण्याची मागणी करत या पीडितेवर हा हल्ला केला असे पोलिस सूत्रांकडून समजते.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर .574/2025 असा नोंद करण्यात आला आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118(1), 352, 351(2)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर शहर व शिरुर तालुक्यात महिलांवरील महिलांच्या सु रक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केला गेला आहे.नुकताच शिरुर शहरातील रामलिंग रोड परिसरातील ओएसिस वसाहतीमधे ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे इसम पब काढत असल्याचे बी सी टी व्हा फुटेज मधे स्पष्ट दिसले आहे.मात्र हे चोरटे इसम अजुन पकडले गेलेले नाहीत.अशा या ताज्या प्रकरणात फिर्यादी वनिता अशोक सनन्से (वय- 26वर्षे ) या व्यवसायाने मजुर, मूळ राहणार – बोराखेडी, तालुका – मोताळा, जिल्हा – .बुलढाणा येथील आहे.ती सध्या सरदवाडी येथे तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथे रहात आहे. पुष्कळ वेळा महिला भितीपोटी पोलिस स्टेशन मधे जाण्यास उशीर होतो.त्यामुळे अशा मानसिकतेचा गैरफायदा हिंसक वृत्तीचे पुरुष समाजामधे घेत असतात.दारुचे व्यसन जडण्यास आजची भवतालची परिस्थिती अनुकूल अशी झाली आहे.त्यात बेकायदा दारु विक्री व निर्मिती शिरुर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. व्यसनाधीन पुरुष व्यसनाधिनतेमधे कोनत्याही स्तराला जात असतात.ही बाब महत्वाची आहे.सविस्तर घटना अशी आहे —-दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजता शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे फिर्यादी वनिता अशोक सनन्से या आपल्या बहिणीच्या घरासमोर बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी राहुल तुकाराम माळी (राहणार – सरदवाडी, मूळ राहणार – बोराखेडी, मोताळा, बुलढाणा, हा दारू पिऊन तेथे आला.फिर्यादीला म्हणाला, “जेवायला दे नाहीतर पैसे दे, मला गावाकडे जायचे आहे.”मात्र फिर्यादी त्याची मागणी पुर्ण करण्यासाठी साहजिकच बांधिल नव्हती.अशा परिस्थितीत फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगत जेवण देऊ शकत नाही, असे सांगितले. असे तिने सांगितले असता आरोपीने रागाच्या भरात त्यांच्या छातीवर व हातावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच “आज तुला जीवे मारूनच टाकतो,” अशी धमकीही दिली. यानंतर आरोपीने शिवीगाळही केली.म्हणुन अखेर फिर्यादी वनिता अशोक सनन्से यांनी शिरुर पोलिस स्टेशन कडे धाव घेतली आहे.शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास—शिरुर पोलिस स्टेशन, शिरुरया प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. कळमकर हे करत आहेत. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पुढे सुरु आहे. मात्र शिरुर शहर व तालुक्यातील महिला सु रक्षिततेचा प्रश्न कठीण होत चालला आहे.याचे हे उदाहरण आहे.अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••🔗https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळhttps://pune.gov.in – पुणे जिल्हा प्रशासनhttps://www.ncw.nic.in – राष्ट्रीय महिला आयोगhttps://www.indiatvnews.com/crime – भारतातील गुन्हेगारी संबंधित बातम्याआणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••उसतोड कामगार बंदीस्त करुन ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शिरुरमधे उघड! Ranjangaon MIDC News : कारेगाव येथून अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाने फूस लावून पळवली Shirur Crime News : 2.5 तोळ्यांचे गंठण, 55 हजार रोख व दुचाकी चोरीला !About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरूर : शिरसगाव काटा येथे घरफोडीची घटना – सोन्याचे दागिने चोरीला, 2.20 लाखांचा ऐवज लंपास! विजेची थेट चोरी उघड – १२ महिन्यांत ₹१२,८१० ची वीज वापरून महावितरण कंपनीची फसवणूक!