Contents1 दिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु ‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !1.0.1 Read more >>>>>1.0.2 About The Author1.0.2.1 Dr.Nitin Pawar1.0.3 ❤️ Support Satyashodhak Blog दिग्दर्शक रामदास राऊत यांचा नवा चित्रपट घुंगरु ‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! शिरुर, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५|संपादकीय | ” दिग्दर्शक रामदास राऊत यांच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा नवीन चित्रपट “घुंगरु – नाद इश्काचा खुळा” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. बेल्हा सांस्कृतिक लोककला तमाशा महोत्सवात संगीतरत्न दत्ता महाडीक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या राऊत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले आहे. सांगलीतील नुतन कलाकेंद्र येथे चित्रपटाचे शूटिंग होत असून त्यात तब्बल सहा लावण्या, ग्रामीण कलावंत आणि तमाशा परंपरेचा नवा पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.” श्री.रामदास राऊत,पुरस्कार विजेते ! आषाढी वारीला देशभरातून अनेक दिंड्या आणि लाखो भाविक पंढरपुराकडे पायी चालत मार्गस्त होत असतात . मात्र पंढरपुरला पोहोचताना एक दोन दिवसांच्या प्रवासानंतर प्रत्येक भाविकाला पांडूरंगाच्या चरण स्पर्शाची भेटी, ओढ लागलेली असते. ती ओढ पांडूरंगाच्या दर्शनानेच शांत होते . प्रत्येक भाविक आत्मीयतेने पांडूरंगाचरणी लीन होतो .तद्वतच ‘बेल्हा सांस्कृतीक लोककला तमाशा महोत्सव‘ दोन दिवसावर आला की ‘ सर्व कलाप्रेमी रसिकांची महोत्सवास जाण्यासाठी लगबग सुरु असते . आदरणीय जगताप आण्णांवरती प्रेम करणारे हितचिंतक ‘ मित्र,स्नेही, ‘ कला अभ्यासक ‘, छोटे मोठी लेखक मंडळी महोत्सवाचे मोठेपण व्हाटस् अप व्दारे लेखणीतून लिहीत असतात .महोत्सवास सर्वांनी येण्यासाठी आवाहन करीत असतात .महोत्सवाच्या निमित्ताने बेल्हे गावी कलाप्रेमींची मांदीयाळी जमा होते . मग प्रत्येकाच्या गाठीभेटी, एकमेकांची ख्याली- खुशाली विचारण्याने प्रत्येकाचा आनंद व्दिगुणीत होत असतो . त्यातून लोककलेतील सर्व कलावंत या महोत्सवामध्ये पारंपारिक कला सादर करण्यासाठी विशेष तयारीने आणि स्फुर्तीने येवून कला सादर करीत असतात . तीन दिवसाच्या महोत्सवासाठी येणाऱ्या कलाप्रेमींना चहा ‘ नाष्टा जेवण आणि राहाण्याची व्यवस्था महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी काळजीने प्रेमपूर्वक करीत असतात . कलावंतांना पारंपारिक कला सादर करण्याची आणि कलाप्रेमींना मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी ‘बेल्हा तमाशा महोत्सव‘ सर्वांसाठी आनंद देणारा ठरतो . सांस्कृतिक लोककला महोत्सव,बेल्हे 2025 यंदाच्या नाविन्यपूर्ण लोककला महोत्सवास सर्वांना उपस्थित राहण्याचे विनंती करण्यात आली आहे. यंदा २०२५ च्या सांस्कृतिक लोककला तमाशा महोत्सावामध्ये ” संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ” लघु चित्रपट निर्माते – श्री.रामदासजी राऊत ‘, तमाशा कलावंत – सौ. रेखा व वसंत चव्हाण कोर्टीकर ‘ रमेश खुडे काठापूरकर ‘ ,निवृत्ती पोंदेवाडीकर या जेष्ठ कलानिपुण कलावंत मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे . बेल्हा तमाशा महोत्सवाचे उद्घाटक , प्रमुख पाहुणे , अध्यक्ष, विशेष उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन व स्वागत ‘ साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ‘ उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन मुरली तात्या शिंदे यांनी केले आहे. रामदास राऊत यांच्या तृप्ती प्रोडक्शन चे अनेक लघुपट हिट ठरले आहेत.अखंडित पणे त्यांच्या प्रोडक्शन ने १६५ एक से बढकर एक भाग पुर्ण केले.आता ते दोनशे कडे वाटचाल करत आहेत. त्यांनी आशयप्रधान,सामाजिक जाणिव व उपेक्षितांच्या जिवनाचे चित्रण या भागांमधे केले.ग्रामीण व गरजु कलाकारांना संधी दिली.सातत्यपूर्ण स्वत: अभ्यास करुन,चिंतन करुन कथानके लिहिली.दिग्दर्शन केले.अभिनयही केला.याला प्रेरकांनी भरभरून दाद दिली.याच कामाची दखल घेवुन त्यांना यंदाचा संगितरत्न दत्ता महाडिक जिवनगौरव पुरस्कार प्राप्त होत आहे.घोषीत झाला आहे. ” तृप्ती फिल्म प्रोडक्शन मध्ये अनेक कलाकारांनी रोल केले असून त्यांना काही थिएटर फिल्म मिळाल्या आहे त्यापैकी अभिनेते सिताराम नरके सर अभिनेत्री अलकाताई जोगदंड अभिनेते राजेंद्र ताम्हणे सर अभिनेते बाळासाहेब निकाळजे अभिनेते सचिन शिंदे कवठेकर यांनाही नवनवीन चित्रपट मिळत आहे तसेच अलीकडेच यातना हा लघु चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये ज्येष्ठ कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांनी प्रमुख भूमिका साकारली त्यांना दिनांक 2/11/2025 रोजी संगमनेर येथे शासनाच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले !” ‘ तृप्ती फिल्म प्रोडक्शन त्यांना नेहमीच चांगल्या भूमिका देऊन पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचे काम करणार आहे ,असे मत निर्माते रामदासजी राऊत सर यांनी व्यक्त केले.आगामी ,’घुंगरु- नाद इश्काचा खुळा’ हा महात्वाकांक्षी चित्रपट प्रेक्षकांसाठी साधारण २०२६ मधे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तब्बल ६ लावण्या प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहेत. या चित्रपटाचे शुटींग सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील, ‘नुतन’ कलाकेंद्र येथे होणार आहे. त्याकामी सांगली जिल्ह्यातील अभ्यासु व्यक्तींची साथ त्यांना लाभणार आहे. त्यामधे श्रिमती शोभा लाखे ,पापाभाई बोरगावकर,डॉ.संपतराव पार्लेकर,प्रा.संजय थोरात, योगेश पाटील ,मुरलीतात्या शिंदे या सर्वांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. या चित्रपटासाठी नृत्यांगणा उमा तासगावकर,रेश्मा परतीकर,लता लंका पाचेगावकर या आपल्या नृत्यांनी व अदांनी प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी नृत्यकौशल्य पणाला लावलेले दिसणार आहे. साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.वसंतराव बबन जगताप उर्फ आण्णा मु.पो.बेल्हे,ता.जुन्नर,जि.पुणे यांचे विशेबष मार्गदर्शन या कामी लाभणार आहे. ‘घुंगरु…’ या चित्रपटाच्या निर्मितीविषयी रामदास राऊत सांगतात की ,’ हा चित्रपट यापुर्वी मराठीत झालेल्या तमाशाप्रधान चित्रपटांपेक्षा वेगळा असेल !’पिंजरा‘,’नटरंग‘ असे चित्रपट प्रेक्षकांना कलाकारांची एकच ,’बाजु’ सांगुन जातात.मात्र ,’दुसरी ‘बाजु काय असते ती प्रेक्षकांना रामदास राऊत या ,’घुंगरु’ चित्रपटातुन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा चित्रपट OTT साठी देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मा.वसंत जगताप आण्णा, वसंत पवार,फौजदार,मुंबई,निर्माते काळुराम ढोबळे,नंदकुमार पाटील, पार्लेकर सर,पापाभाई बोरगावकर,शोभाताई लाखे,प्रा.संजय थोरात, मुरलीमामा शिंदे, योगेशजी पाटील,तसेच ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मा.वसंत जगताप आण्णा, वसंत पवार,फौजदार,मुंबई,निर्माते काळुराम ढोबळे,नंदकुमार पाटील, पार्लेकर सर,पापाभाई बोरगावकर,शोभाताई लाखे,प्रा.संजय थोरात, मुरलीमामा शिंदे, योगेशजी पाटील इ.सर्व मान्यवर मंडळी रामदास राऊत यांच्या पाठीशी उभी राहिली आहेत. इ.सर्व मान्यवर मंडळी रामदास राऊत यांच्या पाठीशी उभी राहिली आहेत. या चित्रपटात विशेष भूमिका शोभा लाखे,पापाभाई बोरगावकर, लता लंका पाचेगावकर,उमा तासगावकर,संजय थोरात, मुरलीमामा शिंदे, पार्लेकर सर, योगेश पाटील, राजेंद्र ताम्हाणे,नंदकुमार ताम्हाणे,सचिन शिंदे यांच्या असणार आहेत. या चित्रपटातील गीतांचे रेकार्डिंग चालु आहे.कथानकाची Script तयारी पुर्ण झाली आहे.प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबर वेगळे काही खास देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, असे ते सांगतात.तमाम प्रेक्षक पुर्वीप्रमाणेच आपला भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 🌐 Free Links (संदर्भ लिंक — विश्वासार्ह व मोफत स्रोत) पंढरपूर वारी माहिती: 🔗 https://mr.wikipedia.org/wiki/वारी_(पंढरपूर) तमाशा लोककला इतिहास: 🔗 https://mr.wikipedia.org/wiki/तमाशा मराठी सिनेमा परंपरा: 🔗 https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_चलचित्रसृष्टी सांस्कृतिक कार्यक्रम बातम्या: 🔗 https://www.loksatta.com/entertainment/ OTT वरील मराठी चित्रपटांची यादी: 🔗 https://www.primevideo.com/region/IN/browse/ref=atv_hm_hom_c_8zZ8D2_marathi बेल्हा गाव माहिती: 🔗 https://mr.wikipedia.org/wiki/बेल्हे_(जुन्नर) Read more >>>>> तृप्ती फिल्म प्रोडक्शन चे रामदास राऊत यांचा नवीन चित्रपट ‘यातना’ लवकरच प्रेक्षकांसमोर! About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन मांडवगण फराटा येथे कामाच्या पैशावरून मारहाण; आईलाही मारहाण करून गंभीर दुखापत गोडसेमळा, चांडोह येथे कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण – शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल