Contents
‘घुंगरू’ वाजणार ! इशक्याचा नाद खुळा “: शिरुर पंचक्रोशीत 24 डिसेंबर पासुन शूटिंग!
शिरुर,दिनांक 5 डिसेंबर 2025 |प्रतिनिधी|
‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर’ निर्मित ‘घुंगरू -इशक्याचा नाद खुळा’ या लघु चित्रपटाचे शूटिंग शिरूर ग्रामीण पंचक्रोशीत दिनांक 24 /12 /20 25 रोजी व 25 /12 /20250 रोजी सुरू होत आहे .या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक, लेखक ,रामदासजी राऊतसर या कथेविषयी थोडक्यात सांगत आहेत. ते असे – ‘ खरंतर हा तमाशा प्रधान चित्रपट आहे .हा चित्रपट करण्याचे नियोजन गेली एक वर्षापासून चालू होते. परंतु विषय वेगळा असल्याने मांडणी करण्यासाठी वेळ जातो. तसेच तसेच सहा लावण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंगचे काम चालू आहे. या कथेचा सारांश असा आहे की,आज खऱ्या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे .ज्यांचे जीवन या कलेवर अवलंबून आहे की एका कलाकार व्यक्तीच्या पाठीमागे पाच दहा लोक असतात आणि एकच व्यक्ती काम करत असतो .त्याची कसरत या ठिकाणी दाखवलेली आहे.’
ते पुढे सांगतात ‘कला केंद्र व तमाशा या जरी दोन बाजू भिन्न असल्या तरी कलाकार हेच माध्यम आहे .खरे रसिक मायबाप या कलेपासून वंचित असून ,जी पारंपारिक कला दाखवण्याचे व जपण्याचे काम या ठिकाणी या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. कुठेतरी एखादा कलाकार चुकतही असेल म्हणून सर्व कलाकार दोषी आहेत असे नाही. त्यामुळे सर्व कलाकारावर तो ठपका बसतो. असं घडू नये त्यासाठी या कथेमध्ये योग्य अशी मांडणी केली असून तेही दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.’
कलाकारांना जो न्याय मिळायला पाहिजे तो न्याय आज मिळत नाही .या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या कलावंतांना न्याय मिळावा म्हणून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे . ‘घुंगरू’ या चित्रपटांमध्ये सहा नृत्यांगना असून त्यातील प्रथम
एक नृत्यांगना आहे की यांनी साता समुद्रा पडलीकडे जाऊन लावणी पोचवली आहे. अशा त्या नृत्यांगना नृत्यबिजली रेश्मा परतीकर वरील फोटो मध्ये दिसत आहेत.
दुसरी लावणी करत आहे. ‘नृत्यांगना शुभांजली थोरात ,(वरील फोटो ) श्रीगोंदा’ यांनी यापूर्वी आमच्या प्रोडक्शनला ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ ही लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत. त्याही ही एक नवीन ढंगाची लावणी सादर करत आहेत.
तिसर्या लावणी सादर करीत आहेत नृत्यांगना श्रुती भोसले पुणे! ( वरील फोटो) यांनी पुणे जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्र मध्ये लावणी सादर केलेली आहे .’अशा लावण्यवती’ या चित्रपटामध्ये एक फक्कड अशी लावणी सादर करत आहेत.नृत्य बिजली श्रुती भोसले या आर्केस्ट्रा मध्ये उत्कृष्ट लावणी सादर करत असतात. त्याही या चित्रपटांमध्ये एक चांगल्या प्रकारची लावणी सादर करत आहे
चौथी लावणी सादर करत आहे नृत्यनंगा प्राजक्ता माटे (वरील फोटो) या लावणीकार उत्तम प्रकारे लावणी सादर करणार आहेत. त्याही एक सुंदर असे लावणी वर नृत्य सादर करणार आहे .प्राजक्ता माटे ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय अशोक पेटकर यांची नात आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लावणीचे शो त्या करत असून या चित्रपटात एक सुंदर लावणी ते सादर करणार आहेत.यात लीडची भूमिका या करत आहेत.
पुढील लावणी सादर करीत आहे नृत्यांगना उमा तासगावकर (वरील फोटो )या उत्कृष्ट जुने आणि नवीन पिढीतील लावणी सादर करत आहेत. या चित्रपटामध्ये अप्रतिम लावणी सादर करत आहेत. अशा सहा कलावती लावणी सादर करणार आहेत.
(फोटो- लंका पाचेगावकर,नृत्यांगना)
लंका पाचेगावकर या सांगली जिल्ह्यातील पाचेगाव या ठिकाणच्या तमाशा कलावंत आहेत.जुन्या आणि नवीन रंगाची लावणी सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याही या चित्रपटांमध्ये एक लावणी सादर करत आहेत.
तसेच ‘घुंगरू’ या लघु चित्रपटांमध्ये खालील प्रमुख भूमिका काही कलाकार सादर करत आहेत ते पुढील प्रमाणे- अभिनेते राजेंद्र ताम्हाणे पुणे ,अभिनेत्री अलका जोगदंड खेड, अभिनेत्री प्राजक्ता माटे ,घोडेगाव ,तमाशा जेष्ठ कलावंत पापाभाई बोरगावकर एक लीडींग रोल करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत काम करत आहेत.
लावणी गायिका शोभाताई लाखे नूतन कला केंद्र,इस्लामपूर जिल्हा सांगली या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका करत आहे .तसेच अभिनेते उदय ढगे पुणे, रमेश खुडे काठापुरकर ,वसंत चव्हाण व सौ.रेखा चव्हाण कोर्टीकर ,अभिनेते दत्ता भुरे पुणे ,अभिनेत्री मोहिनी शिंदे पुणे ,अभिनेते निळकंठ चोरे अभिनेते ,रमेश खाडे ,अभिनेते रवी शिंगाडे,अभिनेते वजीर शेख पाथर्डी,अभिनेते तेलधुणेसर,दौंड
‘त्याचप्रमाणे अनुभवी तमाशामध्ये अनेक विविध प्रकारचे भूमिका सादर केलेले आमचे सहकारी मित्र मुरली तात्या शिंदे एक आगळीवेगळी भूमिका सादर करत आहे .त्याचप्रमाणे अभिनेते माननीय खंडूजी भुकनसर यांनी आमच्या तृप्तीचे प्रोडक्शनला आतापर्यंत नऊ ते दहा चित्रपटातून आपल्या भूमिकेचा ठसा उम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरे मित्र सुदामजी डफळ, श्रीगोंदा तसेच आमचे जवळचे स्नेही कविवर्य सितारामजी नरकेसर, पुणे ,त्याचप्रमाणे कलाप्रेमी असणारे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक संजय थोरातसर, सांगली ,तसेच आमचे जवळचे सहकारी मित्र राकेशजी डोळस ,बेल्हे,साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था संचालक तसेच आमचे दुसरे मित्र साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बेल्हे संचालक संजय विश्वासराव व आमचे सहकारी मित्र श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था संचालक मधुकर कसाळ, पारगाव,त्याचप्रमाणे मखन शेख, तसेच पाहुणे कलाकार म्हणून आमचे गुरुस्थानी असणारे व श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय वसंतराव बबन जगताप उर्फ जगतापअण्णा बेल्हे, यांच्या मार्गदर्शनाने या चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे .या चित्रपटासाठी या वरील सर्व मंडळीच योगदान आहे. त्यांना मी धन्यवाद देईल!’
‘ त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी मित्र चित्रपट निर्माते व अभिनेते माननीय काळूराम ढोबळे,पुणे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमचे सहकारी मित्र माननीय बाबाजी कोरडेसर ,तमाशा कला अभ्यासक राजगुरुनगर, तमाशा कलावंतावर नितांत प्रेम करणारे त्यांना मदत करणारे असे आमचे विश्वासू मित्र असून तेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. तसेच आमचे सहकारी मित्र माननीय वसंत पवार मा.पोलीस फौजदार, मुंबई हे मुंबईवरून कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या पारनेर तालुक्याचे भूषण नाट्य निर्माता दिग्दर्शक लेखक माननीय मोहन पानसरे,ठाणा मुंबई त्याचप्रमाणे आमच्या पहिल्या फिल्ममध्ये काम केलेले आमचे जवळचे स्नेही श्री. लेखक खंदारेसर ,नेवासा, लेखक डॉ.संपतराव पार्लेकरसर ,पलूस त्याचप्रमाणे आमचे स्नेही व महाराष्ट्रातील सर्व कलावंतावर निस्वार्थपणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व मा. राजेंद्र.डी.मोरेसर,बारामती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.’असे पुढे दिग्दर्शक रामदास राऊत यांनी सांगितले आहे.
तसेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत रामलिंग चे विद्यमान सदस्य माननीय शंकरराव गायकवाड उर्फ दाजी,त्याचप्रमाणे आम्हाला सतत सहकार्य करणारे आमचे दुसरे मित्र शिरूर ग्रामीणचे विद्यमान सदस्य व गीताई मंगल कार्यालयाचे संचालक माननीय दिनकरराव साबळेसर यांची मोलाची साथ आम्हाला मिळत आहे .त्याचप्रमाणे शिरूर पंचक्रोशीत असणारे सर्व आमच्या प्रोडक्शन वर प्रेम करणारे, आमच्या प्रोडक्शन मध्ये यापूर्वी काम केलेले जुने नवीन सर्वच कलाकार यांचे मी आभार व्यक्त करतो .सर्वांना संधी देणे शक्य नाही. कुणी चुकून संधी देण्यासाठी राहिले असेल तर पुढील प्रोजेक्टसाठी विचार केला जाईल. त्याच प्रमाणात ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’ला गेले पाच वर्षापासून रसिक मायबापांनी एका उंचीवर नेऊन ठेवले अशा सर्व मायबापांना मनापासून धन्यवाद देईल आणि हा चित्रपट नवीन वर्षात 2026 मध्ये आपणास पाण्यासाठी तृप्ती फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चैनलवर प्रदर्शित होईल .सर्वांनी याची नोंद घ्यावी, चित्रपट पहावा, असे आवाहन निर्माता ,दिग्दर्शक लेखक रामदास राऊत,शिरूर यांनी तमाम महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मराठी चित्रपट शौकीनाना केले आहे.
Read more>>>>
तृप्ती फिल्म प्रोडक्शन चे रामदास राऊत यांचा नवीन चित्रपट ‘यातना’ लवकरच प्रेक्षकांसमोर!






