माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतर आत्मशोध आणि वैचारिक बदलाची सुरुवात
Contents
- 1 माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
- 1.1 माझी स्टोरी भाग 2: वाचनातून बदललेले जीवन
- 1.2 छातीवरचं दडपण उतरलं
- 1.3 वाचनाची नव्याने सुरुवात
- 1.4 जात, गुण आणि अपमान: माझी स्टोरी भाग 2 ला असलेला एक सामाजिक पैलु!
- 1.5 माझ्यातील आक्रमक विचारवंत
- 1.6 समाजाचा खरा चेहरा
- 1.7 लोकशिक्षकाची बीजं
- 1.8 ज्ञान म्हणजे प्रतिष्ठा
- 1.9 मी मोठा झालोय?
- 1.10 पुढच्या प्रवासाची चाहूल
माझी स्टोरी भाग 2: MBBS सोडल्यानंतरचा वैचारिक संघर्ष
माझी स्टोरी भाग 2: वाचनातून बदललेले जीवन
माझी स्टोरी भाग 2 ही माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याची कथा आहे जिथे MBBS सोडल्यानंतर माझ्या विचारविश्वात मोठा बदल झाला.पण सोडणे शब्द चुकीचा आहेच. सुटणे असा शब्द योग्य आहे. आणि वाचणार्यानी हेही लक्षात घेतले पाहिजे की on paper किंवा कायदेशीर पणे ना मी सोडले ना College चे मला कधी ते समाप्त होत असल्याचे किंवा Termination चे कधी पत्र आले. हे ही खरे आहे की college चे पत्र यायचे. शेवटचे पत्र आहे ते साधारण 54,000 pending फीज असल्याचे आहे. त्यापुढे नाही. मी ही कधी विचार केला नाही.
तर नाशिक वरुन गावात परत येताना माझ्या हातात कोणतीही पदवी नव्हती.पण माझ्या छातीत एक मोठं ओझं उतरलं होतं.गावात म्हणजे शिरुरला जेथे सविन्दणे या मुळ गावातुन घरभाडे देउन रहात होते. मी त्यावेळची भावना तुम्हाला सांगतो की heart वर pressure येवुन ना मी आज जिवंत असतो ना वडील!पुढे वडील 82 वयापर्यन्त जगले. मी अनेक कारनामे केले. Degrees, Certificates, Doctorate वगैरे खूप भरगच्च आयुष्य जगलो.
MBBS सोडणं हे बाहेरच्या लोकांना पराभवासारखं वाटलं असेल.नव्हे तर गुन्हा असं वाटलं. मी स्वतः ते सोडले. असे लोकांना वाटत असे. पण मी स्वतः ते सोडणे शक्य नव्हते. आजही माझे Admission एन डी एम व्ही पी समाज्स मेडिकल कालेज, आडगाव, नासिक येथे आहे. अनुसुचीत जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचे Admission रद्द करायला कोणी कारकून वा सरकार धजावत नाही. एट्रोसिटीला घाबरतात.मतांच्या vote bank च्या राजकारणाला पक्ष घाबरतात. जी आर आहे तसा की,मध्यन्तरी माझ्या एका नातलगाच्या पत्नीने अलिकडे अपूर्ण राहीलेले M.D. पूर्ण केले आहे. मग मी का नाही परत जात? पुर्ण करत? उत्तर पुढे सांगेन.आता इथे फक्त माझी स्टोरी भाग 2 आणि काही मर्यादित भाग.
त्यावेळी कदाचित काहींनी हळूच पुटपुटलं असेल, नाही तर प्रचार केला. की त्याला जमले नाही. त्याने तसे करायला नको होते.“इतके मार्क्स घेऊनही टिकला नाही…”ते काय कुणाचेही काम असते का? अन्थरुन पाहून पाय पसरावेत. एक बाई जी माझा फार द्वेष करायची. तिची मुले तिची स्वप्न पुर्ण करु शकत नसत. माझ्या body language मधुनच एक class one office दिसतो इतरांना. ते तेव्हा पासुन आजतागायत आहे. पुढे बी. एड. केले मधी. पण सरकारने शिक्षण सेवक पद आणले. नावात,’ सेवक’! कधी ढुंकून ही विचारणा केली नाही की जाहीरात पाहिली नाही. कारण एक Philosophy की जी मी जगली पाहिजे, ती माझ्या मते त्यावेळी तयार झाली. सविस्तर पुढे येईल.
पण त्या रात्री जेव्हा आम्ही CBS बसस्थानकातून एसटी पकडली.तेव्हा मी आणि वडील दोघंही जाणून होतो –काय जाणायच ते ! तेढी पुढे येईल. पण हा पराभव नव्हता.तर मग काय होते ते माझी स्टोरी भाग 2 म्हणून या भागात सक्षिप्त देणे हा हेतू आहे .आज इतक्या वर्षांनन्तर ते लिहीताना त्यावेळची स्थिती आणि भावना नेमक्या शब्दात लिहीली जावी. आणि याच platform वर! कारण हे मी निर्माण केले, जुळवले, स्वतः शिकुण! Online! सतत बदलत, update करत!
तो निर्णय होता.जीवन वाचवण्याचा निर्णय होता. माझा आणि वडीलान्चाही!सर सलामत तो पगडी पचास ही म्हण मी तोपर्यंत कुठं तरी वाचली होती. नव्हे!आठवलं-दहावीत इग्रजीच्या तासाला तरटे सरांनी कुठेतली तो उच्चार केला होता.
छातीवरचं दडपण उतरलं
त्या मेडिकल कॉलेजच्या वातावरणात
मी स्वतःच पेशंट झालो होतो.हे माझी स्टोरी भाग 2 मधे विशेष लक्षात घ्या. मला आज काही सिद्ध किंवा असिद्ध करायचं नाही. फक्त एक स्टोरी सागायकीय, खरी!Documentation होणे आवश्यक वाटते मला. अनुभव घेतले व समाज वाचला, अनुभवला, स्थित्यन्तरे अनुभवली. आणि आज मी काही पन्तप्रधान, किंवा मुख्यमंत्री झालो नाही. म्हणून आत्मकथन लिहावे. किंवा महापुरुष झालो आहे. बिलकुल एक पण थांबा. पुढे येईल.
TB ने शरीर कमकुवत झालं होतं.हे मी आज सांगु शकतो. कारण त्याला आता जमाना झाला आहे. आणि मला काही सोयरीक पहायची नाही.करायची नाही. ना माझी ना मुलगा, मुलगी जे असणे शक्य ही नाही. कारण मी विवाह करतच नाही. का? तेही पुढे येईल. तर हा पुर्ण बरा होणार आजार होता. आधीच कधी तरी बरा होवून गेला. एक्स रे काढतो. तेव्हा काही नसतं. ही आजची स्थिती. पण त्यावेळी मला त्याबाबत अनेक ऐकीव गोष्टी माहित होत्या. पुढे त्यांनी कोनता आणि किती त्रास झाला हे ही पुढे येईल.
मनात भीती मरतो की काय?
रक्ताची उलटी होते की काय?
मग आप्पान्चे काय हाल होतील?
ते कदाचित प्राण सोडतील.
भविष्य अनिश्चित. प्रत्येक सहा महिन्यांनी परीक्षा तिथे. त्या पेन्डीन्ग फीचा प्रश्न.प्राध्यापकांचा तुटक संवाद.त्यांचे बोलणेच समजत नसे. इंग्रजी माध्यमाची भीती.म्हणजे फ्लुएन्ट इन्ग्लिश ची!ही बाब माझी स्टोरी भाग 2 मधे विशेष नमुद करण्यायोग्य आहे. कारण हे अनेक मेडिकल स्टुडन्टस साठी अनुभवाची आहे ! त्याचा परिणाम इतर बर्याच Students वर झाला तिथे. हे मला नन्तर समजले.तिथल्या पर्टिक्युलर.
अशा पद्धतीने CVS cardio vascular system वर 😅 त्या सर्वांचा एक दाब येत होता.जणू कुणीतरी आतून दाब देत आहे ह्रदयावर!
गावी आलो.पहिल्या आठवड्यातच जाणवलं.श्वास खोल जातोय. झोप लागतेय. आईजवळ, भाऊ, बहीणीबरोबर बसताना शांत वाटतंय.
मी हरलो नव्हतो.काही गमावण्यासारखे नव्हतेच तसे. पिढ्यानं पिढ्या नव्हतं ते. काही त्याची हवय नव्हती. ऐषोआराम, प्रतिष्ठा, पद, पुरस्कार यांची.मी श्वास घेत होतो.आजाराच्या पाश्वभुमीवर. वाटायचं आता किमान मी जगणार. आप्पा मला जगवणार यात काही शन्का नव्हती.
श्वास महत्वाचा बनला होता. दोघांचा.त्याकाळी.
मी आणि आप्पा.माझी स्टोरी भाग 2 चा हा श्वास ठरो. ती पुर्ण बिनचुक, खरी उतरो. अशी आशा आहे. हे खरे!ती कुणाकडून परमेश्वराकडुन जो अस्तित्वातच नाही! पण मी आहे. माझ्या कडुन!
वाचनाची नव्याने सुरुवात
गावात परतल्यावर
मी पहिल्यांदा पुस्तक हातात घेतलं ते अभ्यासासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी.बरच काही समजून घेण्यासाठी. ती आकांक्षा पुढे वाढतच गेली. एक विषय सोडला नाही की मी ज्यात डुबकी मारुण तळ शोधायचा प्रयत्न केला नाही. सविस्तर पण पुढे!
मी स्वतःला विचारलं –
“MBBS म्हणजे काय?
जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे का?”काय आहे हे जीवन.आपण कशासाठी जगतोय? जर मृत्यू आपला शेवट करणरच आहे. प्रसिद्धी मिळाली तर ती किती दिवस टिकते. मृत्यू नन्तर चर्चा झाली तरी ते आपल्याला समजण्याचा मार्ग तो कोनता?तिही किती दिवस टिकणार? अलेक्झान्डर सिकंदर आपण आठवतो. पण कोनता. जी आपल्या मनाने त्याच्याबाबत जे वाचले असेल. जे कल्पना चित्र बनवले असेल. तो अलेक्झान्डर आपण समजतो. तो आणि मुळ असणारा कधी एकच असतील का?नसतात. हे इतरही सर्व प्रसिद्ध लोकांबाबत. म्हणजे केवळ एक भ्रामक चित्र. त्याची काल्पनिक प्रतिमा. तिची मेमरी. MBBS अमर असतो का? UPSC topper अमर असतो का? पन्तप्रधान की प्रेसिडेंट? हे काय चाललं आहे.मी कोण आहे? कुठून आलो आहे? कुठे चाललो आहे? अगदी तत्वज्ञानातले पहिले प्रश्न. आदीम प्रश्न. सनातन प्रश्न. ज्याचे समाधानकारक उत्तर अजून तरी मी वाचले नाही. अनुभवलेही नाही.
मी वाचायला सुरुवात केली.पहिलीच गाठ पडली ओशोची. सम्भोगातुन समाधीकडे!पुस्तकाचे नाव. पुर्ण वाचलं. प्रेम करायचं नसतं. प्रेममय व्हायचं असते. स्वर्ग आपणच जर आपले मनोविश्व स्वच्छ व सुंदर. नसेल तर नर्क आपणच. इथं आणि आताच. म्हणून वर्तमानात जगणे. पण ते कसे शक्य आहे? शक्य नाही. हे ही ओशो सांगतात. फक्त ते पाहणे साक्षीभावाने. हा साक्षीभाव तोच ‘मी’असतो. पहिल्या भागात मी विचार करत होतो तेव्हा लक्षात आलेला. असं बरच काही ओशो यांचे मोठे तत्वज्ञान. पुढे ते वाचतच गेलो. पदोपदी सावरायचो स्वतःला ते पुन्हा ओशो वाचुन.इतर तत्वज्ञानी लोक आणि तत्वज्ञान यांची नवी व्याख्या करुन त्यांनी सागितली. एक सोडला नाही. त्यामुळे माझ्या माहितीत भर पडत गेली. ज्ञानात असे मी म्हणणार नाही. का? पुढे येईल!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.कार्ल मार्क्स,तत्त्वज्ञान,समाजशास्त्र, विशेषतः भारतीय,मानसशास्त्र, मग स्टिफन हाकिन्ग, आईनस्टाइन चे ‘सापेक्ष’, म्हणजे पुन्हा व्यक्ती गणीक सत्य वेगळे.काळ अस्तित्वातच नाहीच. सर्व एकाच नजरेत जो पाहील त्याला काय दिसेल. काल, आज, उद्या एकाच वेळेस.
मला समजू लागलं.समस्या माझी वैयक्तिक नव्हती.मुळात ती नव्हतीच. मनाने निर्माण केलेली.अशी जेवढी मने तेवढी विश्वे. पण काल्पनिक. मग Absolute Truth काय?
ती रचनात्मक (structural) होती का? असतात का? की फक्त अहम चे reflection? की फक्त व्यवस्थेची होती.सर्वांची होती. म्हटलं तर कुणाचीच नव्हती.नसते.Only vurtual? आभासी?
जात, गुण आणि अपमान: माझी स्टोरी भाग 2 ला असलेला एक सामाजिक पैलु!
मेडिकल कॉलेजमध्ये मी एक गोष्ट पाहिली होती –
काही मुलांना वारंवार practical मध्ये कमी मार्क्स देणे व फेल करणे.मौखिक परीक्षा मध्ये जाणीवपूर्वक अपमान करणे.“तुम्हाला हे जमत नाही.”पण आरक्षणामुळे इथे येता तुम्ही!सविस्तर अर्थात पुढे.
पण तेच विद्यार्थी जे नंतर ८–१० वर्षे
निबरगट्टपणे उभे राहिले आणि MBBS झाले.
मी एक सहाध्यायी गमावला.माझा एक classmate होता. मेडिकल स्टुडंट.
त्याने आत्महत्या केली.पुण्यात.
कारण?
प्रत्येक वेळी २–३ मार्क्स कमी Practical ला. म्हणून फेल.असे दुसऱ्या class mate ने सांगितलले. शिरुरचाच होता तो. गोरापान, 88% चा ग्रुप काढलेला. SC candidate. मला वाईट वाटलं. पण मी एक उद्गार काडलेले मला आढवते.’जिवनाचा अर्थ समजला नाही रे त्याला!’
त्या काळात मला जाणवलं –
भारतीय समाजात जात अदृश्य नाही.
ती शांतपणे उपस्थित असते.ती तोंडात येणार नाही. पण मनात येणार. असणार. त्यावर आधारित पुर्वग्रह व प्रत्यक्ष वागणे. याचे नमुने मी पुढे सांगीन.
कोणी बोलत नाही.
पण वर्तन सांगतं.
माझ्यातील आक्रमक विचारवंत
गावात परतल्यावर
मी स्वतःला विचारलं –
“तू पुन्हा वर कसा येणार?”
उत्तर होतं – ज्ञानाने.
मी अभ्यास केला.
तासन्तास.
विषय खोलवर.
भारतीय संदर्भ.
जागतिक संदर्भ.
वैज्ञानिक दृष्टी.
अध्यात्मिक Angle, Psychological Angle.उगाचच.
नन्तर हळूहळू लक्षात आलं –
मी जेव्हा बोलतो,
समोरच्याची बोलती बंद होते.
एका वयस्कर गृहस्थाने एकदा सांगितलं –
“तुम्ही समोरच्याला hypnotize करता.”
मी हसु आले.पण समजलं. तेथपर्यन्त मी आलो.
ते hypnotism नव्हतं. तो अभ्यास होता.पण इतका समोरचा प्रभावित होवु शकतो. हे अहन्काराला सुखावणारे होते. पण त्याचा काही पगार मिळत नाही.लक्षात असु द्या.
ज्ञानाची धार घासुन घासून तिक्क्ष्ण होत होती.पण हे आत चालले होते. बाहेर मी साधारण मुलगा इतरांना दिसत होतो.हे निश्चित.जेव्हा कधी मी बोलत असे. बहुदा डॉक्टर, वकील, प्राध्यापक मित्रान्शी तेव्हा ते चमकुन बघत माझ्याकडे!
समाजाचा खरा चेहरा
मला एक गोष्ट स्पष्ट दिसली –
भारतीय माणूस जात पाहूनच वागतो.
तो बोलणार नाही,
पण मनात ती ओळख ठेवतो.
तो म्हणेल –
“आम्ही आहोत तुझ्यामागे.”
हजार-पाचशे रुपये प्रसन्गी देईल पण. पण आम्हाला मोठे मान. नम्रतेने वाग. गरीबासारखे रहा. जास्त डोकं मात्र चालवु नको. काही अडचण आली तर मी आहे ना!टेन्शन नको घेऊ.
सहानुभूती दाखवेल.
पण एक अदृश्य मर्यादा ठेवेल –
“आमच्या वर येऊ नका.”
हे समजल्यावर
मी समाजाचं मत घेणं सोडलं.
मी ठरवलं –मीच विचार मांडेन.लोकांनी स्वीकारला तर ठीक.नाही स्वीकारला तरी ठीक.लोक पुर्वग्रहाचे चष्मे घालून पाहणारच. शेवटी एक मत हमखास देणार- पण आता तुमचे बरेच लोक सुधारले आहेत. बरं का?
पण, ‘तुमचे’!
माझी स्टोरी भाग 2 मधे अखेर व्यवस्थेचे काय करायचं याचा मी हा घेतलेला निर्णय होता.
लोकशिक्षकाची बीजं
मी शिक्षणशास्त्राचा पदवीधर झालो पुढे.
पण आता मला शिक्षक होण्याची नव्याने जाणीव झाली.म्हणजे सरकारी नाही. लोकशिक्षक. बिनपगारी.
लोक मागत नाहीत विचार किंवा आधार
पण समाजाला त्यांची गरज असते.
मी ठरवलं –
मी लोकशिक्षक बनेन.किंवा फक्त लिहीन. माझ्याकडे त्राण नाही उरला. तेवढा.
मी जे वाचतो,
जे समजतो,
ते मांडेन.लिहून.
माझ्यात करुणा आहे.
ती वडिलांकडून आलेली.
मी “नाही” म्हणू शकत नाही सहजा सहजी कुणाला. देतोच. त्याचे कसे होईल? असे वाटते.
कधी कधी लोक त्याचा गैरफायदा घेतात.
पण माझं देणं थांबत नाही.
ज्ञान म्हणजे प्रतिष्ठा
मी पाहिलं –
ब्राह्मण श्रीमंत नसेल,
पण त्याला सन्मान असतो.
का?
कारण तो बोलतो.
मांडतो.समजावून सांगतो. अपशब्द वापरत नाही. नाही पटलं तर हात जोडून माफी मागेल.
तो अजून तरी लोकप्रिय आहे. बहुसंख्या त्याच्या मागे आहे.
ज्ञान प्रतिष्ठा देतं.
ही माझी शिकवण होत होती.ब्राह्मण्य म्हणून जे सांगितलं जाते. ते सर्वामधे कमी जास्त असतेच.
मी मोठा झालोय?
एक दिवस आरशात पाहिलं.
मी स्वतःला विचारलं –
आज आप्पा असते आणि विचारले असते मला,
“तू मोठा झालास का?”रे बाळासाहेब!
तर मी काय सांगेन?
MBBS नाही.
सरकारी पद नाही.
मोठी संपत्ती नाही.
पण सांगेन. एक subconscious मनही असते.Space Time dimension मी समजतो.Quantum Physics चा मला अन्दाज आहे. बीग बेन्ग होतो.पण एकच असा स्फोट झाला असा समजणे काही जरुरी नाही. मल्टीव्हर्स अस्तित्वात असु शकतो. Parallel Universe असु शकते. उर्जा सुद्धा dark energy असु शकते. तुम्ही काही काळ चैतन अवस्थेत होता. आता नाही. मी पण नसेन. कोणीच नसतो अमर!
सविस्तर पुढे!
मार्क्स चे ही एक अर्थशास्त्र आहे. MBBS पेक्षा मोठ्या पदव्या खुप आहेत. भारताला समजून घेण्यासाठी आम्बेडवाद नावाची मिमान्सा आहे. हिदुत्व थोडी व्यापक बनवलेली सन्कल्पना आहे.
सविस्तर पुढे!
माझ्या वर्तुळाचा विस्तार होतो आहे.
आतून शांतता येते आहे.
आक्रमकतेतूनही स्पष्टता येते आहे.
असं काहीबाही उत्तर मी आप्पाना देईल. पण हे सांगायला विसरणार नाही. मी माणूस झालो आहे. जे तुम्हाला आवडायचे!
पुढच्या प्रवासाची चाहूल
गावात परत येणं हा शेवट नव्हता.
तो एक वळण होता.
मी आता मेडिकल विद्यार्थी नव्हतो.
मी शोधक झालो होतो.
माझ्या आयुष्यातील
“यश” ची व्याख्या बदलली होती.
पुढे काय होणार होतं?
मी कोणता मार्ग निवडणार होतो?
समाजाशी माझा संघर्ष कसा वाढणार होता?
हा प्रवास आता सुरू झाला होता.माझी स्टोरी भाग 2 इथे सम्पवला पाहिजे. पुढे आणखीन आठवणे व चिंतन करणे, योग्य ठरेल! मग लिहीले पाहिजे. पण खरं, बरं नाही. सान्त्वन नाही.
भाग ३ मध्ये –
गावातील वास्तव, आर्थिक संघर्ष, स्वतःची ओळख पुन्हा उभी करण्याची धडपड आणि वैचारिक लढाई.
माझी स्टोरी भाग 1 वाचा येथे →
https://www.satyashodhak.blog/majhi-story-atmakatha-bhag-1/
