माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 – कोयना ते टॉपरकोयना ते टॉपर – एका जखमी हिर्‍याची आत्मकथा

Contents

ही माझी स्टोरी – आत्मकथा भाग 1 आहे. कोयना ते टॉपर या प्रवासातून घडलेले आत्मचिंतन.

मी कोण आहे?

हा प्रश्न मी आयुष्यभर स्वतःला विचारत आलो आहे.

कधी मी वर्गात टॉपर होतो.
कधी रुग्ण.
कधी अपयशी विद्यार्थी.
कधी आक्रमक वक्ता.
कधी तत्त्वचिंतक.

कधी डॉक्टर.
कधी शिक्षक.
कधी व्याख्याते.
कधी पत्रकार.
कधी लेखक.

कधी प्रेमी, कधी मुलगा, कधी भाऊ, कधी मामा, कधी बाबा.

कधी दारुडा.
कधी गुंड.
कधी कार्यकर्ता.
कधी उमेदवार.
कधी विद्वान.
कधी वेडा.

प्रवाहासारखं वाकडं-तिकडं वाहत आलेलं जीवन.

माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 मधे
आणि तरीही प्रश्न कायम राहतो —

“मी कोण?”

तत्त्वज्ञानात याला आदिम प्रश्न म्हणतात.

मी हे लिहितो आहे, मला हे समजतं आहे —
याचा अर्थ मी आहे.

माझं नाव नितीन पवार आहे.
पण हे नाव मिळण्याआधीही मी होतोच.

जर माझं नाव अकबर हुसेन असतं, किंवा डेव्हिड ब्राऊन असतं,
तरीही ही जाणीव तशीच राहिली असती.

मग प्रश्न उरतो —

हा “मी” म्हणजे शरीर आहे का?
की शरीर पाहणारी जाणीव?

हे हात टाईप करत आहेत.
पण हे हात पाहणारे डोळे कोणाचे?

आणि डोळ्यांनाही पाहणारे कोण?

कदाचित “मी” म्हणजे फक्त एक consciousness असेल.
एक जाणिवेचा बिंदू.

किंवा कदाचित सर्व काही एकच आहे —
अद्वैत.

तत्वज्ञानात मी माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 मधे कसा पोचलो कळत नाही.


शरीर आणि नाव – तात्पुरती ओळख

एक गोष्ट मात्र निश्चित आहे.

शरीर आणि नाव हे तात्पुरते आहेत.

याचा अंतिम पुरावा म्हणजे —
मृत्यू.

मृत्यू हा शेवट आहे की रूपांतरण?

एका भौतिक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे?

कदाचित.

पण या प्रश्नांची सर्व उत्तरे अजून मानवाला मिळालेली नाहीत.


ही स्टोरी कुठून सुरू होते?

माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 मधील ही माझी स्टोरी — शरीराची 

नाव दिलेल्या अस्तित्वाची —
नितीन पवार.

प्रत्येकाची अशी एक स्टोरी असते.

तीही तात्पुरतीच.

पण त्या व्यक्तीसाठी तीच संपूर्ण विश्व असते.

म्हणूनच —

जेवढ्या खोपड्या, तेवढ्या स्टोर्‍या.

ही त्यातली एक.


कोयना – आठवणी जिथून सुरू होतात

माझ्या आठवणी जिथून स्पष्ट होतात,
तिथून ही स्टोरी सुरू होते.

मी एक मुलगा होतो.

त्या मुलाचा जन्म कोयना नगरात झाला नाही —
तो आळंदीत झाला.

देवाची आळंदी.

मुळ गाव — सविंदणे,
तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

पण माझ्या आठवणींचं पहिलं विश्व होतं —
कोयना.


कोयना – एक गाव नव्हतं, तर एक भावविश्व

कोयना म्हणजे फक्त भूगोल नाही.

तो माझ्या मनाचा पहिला नकाशा आहे.

डोंगरांच्या कुशीत वसलेली सरकारी वसाहत.

भूकंपप्रवण भाग असल्यामुळे घरे खास रचनेची.

भूकंप झाला तरी माणूस गाडला जाऊ नये —
अशी रचना.

कोयना भूकंपाच्या कहाण्या आम्ही ऐकलेल्या.

भुतांच्या अफवा…

पांढऱ्या साडीतली भुताटकीण…

रासाटीचे भूत…

म्हणून अनेक कर्मचारी कोयना टाळायचे.


आप्पा – धैर्य आणि स्वाभिमान

माझे वडील — आप्पा.

खरं नाव — आबा नामदेव पवार.

आरोग्य खात्यात क्लर्क.

सरकारी नोकरी.

जुनी मेट्रिक पास.

आप्पांनी भुतांच्या पैजा जिंकलेल्या.

रात्री एकटे रासाटी भागात थांबलेले.

हातात काठी.
खिशात बॅटरी.

साप, कुत्रे, चोर — यांच्यासाठी तयारी.

भुतांसाठी नाही.

कारण त्यांच्या मते —

भुतं नसतात.

त्या काळात पगार कमी होता.

पण स्वाभिमान अफाट होता.


निसर्गात वाढलेलं बालपण

कोयनेचा पाऊस सुगंधी होता.

धरणाचं पाणी —
कधी शांत, कधी भयावह.

डोंगरातून कोसळणारे धबधबे.

काजवे पकडणं.

पेरू, जांभूळ, काजू, फणस.

झाडांवर चढणं.

निसर्गाशी खेळणं.

सात-आठ वर्षे मी थेट निसर्गात वाढलो.

माझ्या स्वभावाची जडणघडण तिथेच झाली.माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 ही त्याची नैसर्गिक, उत्फुर्त अभिव्यक्ती!


“हा मुलगा हिरा आहे”

मी लहानपणापासून अभ्यासात पुढे.

नेहमी पहिला.

मी पहिला आलो की आप्पांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा.

हळूहळू एक समीकरण तयार झालं —

मी यशस्वी = वडील आनंदी

मी पहिला = मी मौल्यवान

आप्पा म्हणायचे —

“हा हिरा आहे. चौकोनी चिरा आहे.”

तो शब्द मनात बसला.

मी मुलगा राहिलो नाही.

मी हिरा झालो.


शरीर नाजूक, अपेक्षा प्रचंड

बुद्धी तेजस्वी.

पण शरीर नाजूक.

हडकुळा.

वारं आलं तरी उडून जाईल असा.

मी वारंवार आजारी पडायचो.

ताप. अशक्तपणा.

आप्पांना याची काळजी वाटायची.

कारण मी त्यांच्यासाठी विशेष होतो.


सततच्या बदल्या

दर तीन वर्षांनी बदली.

नवीन गाव.

नवीन शाळा.

नवीन मित्र.

आणि अचानक —
सगळं संपतं.

मोबाईल नव्हते.
सोशल मीडिया नव्हता.

मित्र म्हणजे प्रत्यक्ष चेहरे.

मी रडत नसे.

पण आत हळहळ साठत गेली.


कोयना – स्थैर्याचा शेवटचा टप्पा

कोयना हा सर्वात सुंदर टप्पा.

निसर्ग.

तरुण वडील.

मी अव्वल.

आज कोयना आठवतो तेव्हा आनंद नाही —
हळहळ येते.

कारण ते जग परत येणार नाही.


वडिलांचा निर्णय

आप्पांना छातीत धडधड सुरू झाली.

मोठ्या अपेक्षा.
कमी पगार.

त्यांनी Voluntary Retirement घेतली.

साल — 1987
वय — 52

हा निर्णय भीतीचा नव्हता.

तो प्रेमाचा निर्णय होता.


गावी परत

मी आठवीत असताना आम्ही सविंदणे गावी आलो.

मी पुन्हा पहिला.

दहावीत रेकॉर्ड मार्क्स.

पुन्हा अभिमान.

पुन्हा फुलोरा.


माझी स्टोरी आत्मकथा भाग 1 ही : MBBS चे स्वप्न पासून वेगळी करता येणे कठिण.

हळूहळू एक स्वप्न तयार होत होतं —

MBBS.

पण आज मागे वळून विचारतो —

मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं?

की वडिलांचा अभिमान जपायचा?


एक जखमी बीज

प्रत्येक स्थलांतर म्हणजे तुटणं.

प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं.

मी एक गोष्ट शिकलो —

जगात टिकायचं असेल तर अव्वल राहा.


निष्कर्ष – भाग 1

आज मी हे लिहितो आहे.

त्या मुलाकडे पाहतो आहे.

हडकुळा.

चपळ.

टॉपर.

वडिलांचा अभिमान.

वारंवार तुटणारा.

तो मुलगा अजूनही माझ्यात आहे.

पण आता मी मोठा झालो आहे.

आणि कदाचित —
पूर्वीपेक्षा अधिक लहानही.


पुढील भागात…

MBBS चे स्वप्न
TB
नाशिक
आणि आयुष्यातील पहिला मोठा झटका.

———-

1. Human 2.0 / विचार मालिका
मानव 2.0 आणि चेतनेचा शोध
https://www.satyashodhak.blog/bhavishyacha-jahirnama/⁠
2. कथा
‘गावातील रहस्यमय सावली’ ही हॉरर कथा
https://www.satyashodhak.blog/gawatil-rahasyamaya-sawali-horror-katha/⁠

3. प्रेमकथा

‘कॅफे कॉलेज कट्टा’ ही प्रेमकथा

https://www.satyashodhak.blog/ek-prem-katha-by-dr-nitin-pawar/⁠
4. कविता
मराठी कविता ‘वारी पंढरीची’
https://www.satyashodhak.blog/vari-pandharichi/⁠

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support