Contents0.0.0.1. Married Woman Harassment Case शिरुर नुसार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीसह तिघांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी वाचा….1. Married Woman Harassment Case : जीवे मारण्याची धमकी2. Married Woman Harassment Case : वेळोवेळी छळ ?2.1. आणखीन बातम्या वाचा—2.2. About The Author2.2.1. Dr.Nitin PawarMarried Woman Harassment Case शिरुर नुसार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीसह तिघांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी वाचा….शिरूर ,10 जुलै 2026 Married Woman Harassment Case : जीवे मारण्याची धमकीविवाहानंतर शिवीगाळ, मारहाण, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासू आणि दीर अशा तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विद्या महेश चव्हाण (वय ३६, व्यवसाय गृहिणी, माहेर तांदळी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.Married Woman Harassment Case : वेळोवेळी छळ ?पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह १८ सप्टेंबर २०२० रोजी झाला होता. विवाहानंतर सुमारे एक महिन्यापासून जानेवारी २०२५ पर्यंत तांदळी (ता. शिरूर, जि. पुणे), बदलापूर पश्चिम येथील कैलासनगर (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) तसेच माळशिरस (जि. सोलापूर) येथे वास्तव्यास असताना तिचा वेळोवेळी छळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तिचे पती महेश श्रीकांत चव्हाण, सासू रंजना श्रीकांत चव्हाण आणि दीर दिगंबर श्रीकांत चव्हाण यांनी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कथित छळामुळे वैवाहिक जीवन असह्य झाल्याचेही फिर्यादी महिलेने म्हटले आहे.Married Woman Harassment Case मधील तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुरनं. ६३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) नुसार पती महेश श्रीकांत चव्हाण, सासू रंजना श्रीकांत चव्हाण आणि दीर दिगंबर श्रीकांत चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.टीप : वरील बातमी पोलिसांकडून प्राप्त माहिती आणि फिर्यादीत नमूद आरोपांवर आधारित आहे. संबंधित आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानता येणार नाही.आणखीन बातम्या वाचा—Shirur Crime Amdabad Tranformer Theft : आमदाबाद मधे चोरीची घटना !Shirur Gramin Crime : राक्षेवाडीत गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापाShirur Crime : सिद्धार्थ नगर मधे तांबे तारांसह 2 जण ताब्यात; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखलAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनNimone Woman Molestation Case: निमोणे येथे महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा Shirur Gramin Crime : शेतजमिनीच्या वादातून तिघांसह पाच जणांकडून कुटुंबाला मारहाण; शिरूर पोलिसांत गुन्हा