Shirur Gramin Crime : शेतजमिनीच्या वादातून तिघांसह पाच जणांनी एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलShirur Land Dispute Case | शेतजमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण

Shirur Gramin Crime बातमी हाती येत आहे. शेतजमिनीच्या वादातून तिघांसह पाच जणांकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. शिरूर पोलिस स्टेशन मधे 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचा….

शिरूर, दि. 11 जुलै 2026

शेतजमिनीच्या मशागतीवरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी व मुलाला दगड, बांबूची काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur Gramin Crime: लोणीकंद येथील घटना !

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर दत्तात्रय मोरे,वय- 65, राहणार-लोणीकंद, तालुका- हवेली, जिल्हा-पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

Shirur Gramin Crime: आरोपी पिंपळसुटीचे!

त्यानुसार अक्षय मच्छिंद्र भोसले, शुभम उर्फ ऋषी मच्छिंद्र भोसले, पुतळाबाई प्रल्हाद भोसले, कमल मच्छिंद्र भोसले आणि नागेश कैलास ढवळे, सर्व राहणार,पिंपळसुटी, तालुका-शिरूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. 9 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पिंपळसुटी येथील गट क्रमांक 41/2 मध्ये घडली.

फिर्यादी सुधाकर मोरे हे पत्नी सुनिता व मुलगा संग्राम यांच्यासह जेसीबीद्वारे शेताची मशागत करत असताना आरोपी तेथे आले.

Shirur Gramin Crime मधे “येथे काम करू नका” असे सांगत त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीला दगडाने, मुलगा संग्राम याला बांबूच्या काठीने तसेच तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Shirur Gramin Crime या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 632/2026 भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.

आणखीन बातम्या वाचा—-

शिरुर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल | Shirur Crime 769/2025

Shirur Crime: गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे शिक्षक मारहाण प्रकरण; आदर्श शाळेवर अन्यायाचा काळा डाग?

Shirur Crime: हातभट्टीवर पोलिसांचा धडाका, अनेक आरोपी फरार

About The Author