Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 विषयी सविस्तर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न या लेखात,’योजना’ या सत्यशोधक ब्लॉग च्या विभागात करत आहोत… दिनांक- 21 एप्रिल 2026: सत्यशोधक टिम ; Updated 17 जुन 2026 Contents1 प्रस्तावना-2 Ladki Bahin Yojana म्हणजे काय?3 Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 : उद्देश4 मिळणारा लाभ (Benefits)5 Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 पात्रता (Eligibility Criteria):6 आवश्यक कागदपत्रे (Documents Required)7 अर्ज कसा करावा? (Step-by-Step Process)8 महत्वाच्या तारखा (Important Dates)9 अर्ज करताना चुका टाळा10 ❓ FAQ – नेहमी वाचारले जाणारे प्रश्न10.1 Q1. लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?10.2 Q2. अर्ज कुठे करायचा?10.3 Q3. कोण पात्र आहेत?10.4 उपयुक्त/ Useful Links-11 निष्कर्ष—-12 अखेरचे शब्द–12.1 महाराष्ट्र सरकार च्या आणखीन योजना समजून घ्या पुढील लिंकवर करुन >>>>12.2 🙏 ‘सत्यशोधक न्यूज’ला सहकार्य करा12.3 About The Author12.3.1 Dr.Nitin Pawar12.4 ❤️ Support Satyashodhak Blog प्रस्तावना- Ladki Bahin Yojana Maharashtra महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी मदत म्हणून सुरू केलेली योजना आहे.लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना थेट आर्थिक सहाय्य देणारी महत्वाची व महात्वाकान्क्षी योजना आहे. 2026 मध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.लाखो महिलांना दरमहा ₹1500 या योजनेद्वारे दिले जात आहेत.ते लाभार्थी महिलेच्या खात्यात थेट जमा केले जातात. ही योजना महाराष्ट्रात चर्चेची व वादग्रस्त देखील ठरली आहे. Ladki Bahin Yojana म्हणजे काय? ही योजना राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 : उद्देश • राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. • महिलेच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे. मिळणारा लाभ (Benefits) • ₹1500 प्रति महिना लाभार्थी लाडक्या बहिणीला अर्थात महिलेला मिळतात. • लाडकी बहीण योजनेनुसार लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतात. (DBT) ही रक्कम महाराष्ट्र सरकार देते. • या योजनेद्वारे वार्षिक ₹18,000 पर्यंत मदत लाभार्थी महिलेच्या नावाने असलेल्या बेन्क खात्यात महाराष्ट्र सरकार कडून जमा केले जातात. Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 पात्रता (Eligibility Criteria): • या योजनेस पात्र ठरण्यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी लागते. • महिलेचे वय: 21 ते 60 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असते. • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी /वार्षिक असणे आवश्यक आहे. • लाभार्थी महिलेच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत तर ती महिला या योजनेला पात्र ठरते. आवश्यक कागदपत्रे (Documents Required) • Aadhaar Card/महिला लाभार्थी स्वतः आधार कार्ड धारक असणे आवश्यक आहे. • लाभार्थी महिलेचा Bank Account (Aadhaar linked) आधार कार्डला लिंक असणे आवश्यक असते. • लाभार्थी महिलेचा Income Certificate/उत्पन्नाचा दाखला अर्जाला जोडलेला असावा. तिचे उत्पन्न आखुन दिलेल्या मर्यादेत असावे. • लाभार्थी महिलेचा Residence Proof / रहिवाशी दाखला अर्जाला जोडलेला असणे आवश्यक आहे. • लाभार्थी महिलेचा अलाकडील Passport Size Photo अर्जाला जोडलेला असावा. अर्ज कसा करावा? (Step-by-Step Process) हे महत्वाचे काम आहे. हे स्वतः लाभार्थी महिला ऑनलाईन करु शकते. किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा इतर जाणकार करुन देऊ शकतो. यासाठी खालील एक एक स्टेप पुर्ण करत अर्ज करु शकतो. 👉Step 1: लाडकी बहीण योजनेच्या Official/अधिकृत Website ला भेट द्यावी. https://ladkibahin.maharashtra.gov.in (example) 👉Step 2: या साईटवर Registration करा. नन्तर योग्य मोबाईल नंबर टाकावा. OTP येईल. तो OTP verify करा. 👉Step 3: दिसणारा Application Form भरा. त्यात • Personal details/वैयक्तिक माहिती, उदा. नाव, वय, पत्ता, जन्मतारीख इ. माहिती भरावी. • Bank details/बेन्क खाते डिटेल्स तेथे रकान्यात भरावीत. Step 4: Documents Upload करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ती अपलोड करण्याआधी त्याची साईज योग्य करुन घ्या. उदा. Image Compressor सारख्या app चा वापर करुन ही साईज 50 kb, 100 kb, 150 kb, 200 kb अशा आवश्यक त्या साईज मधे कागदपत्राच्या फोटोची साईज कमी जास्त करुन घ्यावी. अन्यथा ते कागदपत्र अपलोड होत नाही किंवा उशीर लावते. • सर्व कागदपत्रे अपलोड करा. Step 5: Final Submit अखेर सादर करण्यासाठी submit बटन वर क्लिक करावे. प्रत्युत्तर काय येते ते पहावे. Submit झाल्यावर त्याची पावती येते. ती शक्यतो प्रिंट करुन घ्यावी. अशा पद्धतीने लाभार्थी ने अर्ज submit करावा आणि receipt save करा. पावती घ्यावी. सरकारी फी असेल ती व तेवढीच फी भरावी. त्याची पावती घ्यावी. जास्त पैसे किंवा दलालाना पैसे देऊ नयेत. महत्वाच्या तारखा (Important Dates) • अर्ज सुरू: January 2026 • शेवटची तारीख: Not Announced/जाहीर होईल. अर्ज करताना चुका टाळा • चुकीचा कोनताही account number देऊ नका • Aadhaar link तपासा. योग्य तुमच्या मोबाईल नंबर ला जोडलेला आहे का? OTP त्याच नंबर वर आला का? • Duplicate अर्ज करू नका. ❓ FAQ – नेहमी वाचारले जाणारे प्रश्न Q1. लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात? उत्तर- ₹1500 प्रति महिना Q2. अर्ज कुठे करायचा? उत्तर- Official website वर online/CSS केन्द्रे. Q3. कोण पात्र आहेत? उत्तर- 21–60 वयोगटातील महिला उपयुक्त/ Useful Links- Maharashtra Govt Portal DBT Information Portal निष्कर्ष—- लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक मदतीची मोठी संधी आहे. इच्छुकानी योग्य माहिती घेऊन लवकर अर्ज करा. अखेरचे शब्द– सरकारने प्रत्येक व्यक्ती कडे, महिलेकडे android मोबाईल फोन असेल असे ग्रहीत धरलेले दिसते. Bank मधे खाते असणे असे व महिलेवा मराठी व काही इन्ग्रजीचे लिहीणे वाचणे जमते. असे ग्रहित धरलेले असावे. पण हे प्रत्येक लाभार्थी महिलेला जमते असे नाही. याचाच गैरफायदा घेऊन दलाल/मध्यस्त महिलांकडुन जास्त पैसे घेऊन अर्ज भरुन देऊ शकतात. यातुन गरीब कुटुंबातील महिलांची आर्थिक लुट होऊ शकते. प्रशासनातील वेगवेगळ्या टेबल वर बसलेले कर्मचारी सहकार्य किती देतात, हे ही महत्वाचे असते. मुख्य उपाय शिक्षणाचे प्रमाण वाढणे किंवा सार्वत्रिक शिक्षणावरील तरतुद वाढवणे आवश्यक आहे. इतर प्रगत देशातील शिक्षणावरील खर्च व भारत करत असलेला शिक्षणावरचा खर्च, एकुण लोकसंख्या यानुसार वाढवणे आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana Maharashtra 2026 इ. योजना मधून थेट पैसे देणे हा तात्पुरता उपाय असतो. पण तसे देण्याची गरजच भासु नये अशी परिस्थिती निर्माण करणे हे सरकारचे दायित्व आहे. महाराष्ट्र सरकार च्या आणखीन योजना समजून घ्या पुढील लिंकवर करुन >>>> Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) – Application Process 2025 (पूर्ण मार्गदर्शन) सरकारी शिष्यवृत्ती योजना 2026: विद्यार्थ्यांना ₹50,000 पर्यंत मदत | ऑनलाइन अर्ज कसा करावा? Maharashtra Scholarship 2026: Mahadbt scholarship apply | अर्ज कसा करावा? पात्रता, शेवटची तारीख, कागदपत्रे (Complete Guide) 🙏 ‘सत्यशोधक न्यूज’ला सहकार्य करा स्वतंत्र, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी तुमचे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे आहे. ☕ Support Now आपले छोटे सहकार्यही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे ❤️ About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Sukanya Samriddhi Yojana 2026: मुलींसाठी सुरक्षित गुंतवणूक, व्याजदर, खाते उघडण्याची प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Government Schemes : शासन योजना म्हणजे काय? | महाराष्ट्रातील योजना व फायदे (Complete Guide 2026)