समाजातील कटू वास्तव मांडणारी ‘बालवधू वेश्या बनली’ ही मराठी लघुकथा – लेखक डॉ. नितीन पवार
Contents
- 1 बालवधू वेश्या बनल्याची कथा
- 1.1 (सत्य घटनेवर आधारित)
- 1.2 (लेखक – डॉ. नितीन पवार यांच्या इतर कथा/कविता वाचा>>>>>
- 1.3 अधिक माहितीसाठी लिंक्स:
- 1.4 भारतातील बालविवाहाचे वास्तव, आकडे आणि परिणाम
- 1.5 महिलांवरील गुन्हे, trafficking आणि exploitation संदर्भातील अधिकृत डेटा
- 1.6 लैंगिक आरोग्य, सामाजिक परिणाम आणि मानसिक पैलू
- 1.7 जबरदस्ती मजुरी, मानवी तस्करी यावर जागतिक माहिती
- 1.8 स्त्रियांच्या शोषणावर सखोल रिपोर्ट्स
- 1.9 भारतातील वेश्याव्यवसायाची सामाजिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी
- 1.10 “समाज बदलण्यासाठी कायदे आहेत — पण ते जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या संवेदनशीलतेवर आहे.”
- 1.11 कायदेशीर सूचना (Legal Disclaimer)
- 1.12 About The Author
बालवधू वेश्या बनल्याची कथा
(सत्य घटनेवर आधारित)
(लघुकथा — दलित साहित्य शैलीत)
19 th April 2026
क्रांती नगर.एक झोपडपट्टी होती.
हे या वस्तीचे नाव नेमके ठेवले कोणी? याचे उत्तर एक ‘conspiracy Theory’ठरेल.पण कथा,कविता,काव्ये,महाकाव्ये यांचा विषय कधी मध्यम वर्गीय जीवनशैली जगणे किंवा अदानी अम्बानी सारखे जिवन बनु शकत नाही.
कारण त्यात काही,’मसाला'(?) नसतो! वेदना नसतात.वन्चितता नसते. दुख: नसते.विशेष घटनांची नागमोडी वळणे नसतात.वाचणारा झोपुन जाईल ते वाचताच सुरुवातीला !
हा नामकरण कर्ता प्रतिभावान नक्की असावा.पण त्याची प्रतिभा उलटी असावी.कारण क्रांती नगर मधे शांती नसे नान्दत!आणि ‘शांती’ ही ‘क्रांती’ ची पुर्व अट असते.असे शोकडो पुस्तके वाचून देखील मला कुठे सापडले नाही. किंबहुना क्रांती आणि शांती एकत्र नान्दू शकत नाही. सन्सार करु शकत नाही.या ऐकमेकीन्च्या वैरीणीच जणू!
हे नाव मोठं.पण वास्तव कुजलेलं.क्रांती जीवन बदलणारी असते. बिगडवणारी नसते.इथे जीवन बिघडवणारे सर्व ‘कारक’ खचुन भरलेले होते.तरी माणसाचे शरीर व मन कुठेही राहीले तरी स्वतः साठी एक confort zone किंवा cell बनवतेच! ही एक देणगी दिलेली असावी मानवाला.म्हणून इथे सरावाने आनंदी राहणारे लोक होते. त्यांचे एक विश्व त्यांनी बनवले होते.
तर क्रांती शगर मधे गटारांचा वास.
दारूच्या गुत्त्यांवर गर्दी.
मटक्याच्या आकड्यांवर जीव टाकणारे पुरुष.लाल लाल कागदावर आकडेमोड खरणारे गणितज्ञ. काय ते आकडे, आकड्याची गणिते मान्डणारे तज्ञ.
जुगार,शिव्या,मारामाऱ्या.उघडी नागडी लेकरं.आणि एखाद दुसरा,’एखादे पाखरू’ सापडते का? म्हणून चक्कर मारत असे.
झोपड्या एकमेकींना चिकटलेल्या.सख्या बहिणी बिलगतात एकमेकींना दुखद घटना घडली तर तसे.
श्वास घ्यायलाही जागा नाही.खाम्ब, पत्रे आणि भिन्त म्हणून कापड,पत्रे,जाळ्या,लुगडी वापरलेली असत.’उचललेल्या गरजेच्या’वस्तू देखील वापरलेल्या असत. काही,’उचले’ही तेथे वास्तव करत.
त्या सगळ्यात एक मुलगी होती — कविता.
हसरी.पण क्वचित. एरवी तशी ती लहान. त्यामुळे एक निरागच चेहरा, निरागस.डोळे अगदी अपवादात्मक ब्राऊन मार्बल सारखे.
हेच तिचे वैशिष्ट्य.सडपातळ शरीर यष्टी हाडकुळी आणि बारीक.रन्ग 15 दिवस किंवा 3 महिन्यानी एखदा आन्घोळ केल्यावर कसा असेल.तसा होता.ती गल्लीत मैत्रिणीसोबत खेळणारी होती.
तिच्या डोळ्यात अजून ‘तो'(?) अंधार उतरला नव्हता.भविष्यात काय वाढुन ठेवले आहे तिच्या वाट्याला? ते ठावुक नव्हते तिला.
दोन वर्षांनी ती पुन्हा दिसली.
पोटात मूल.म्हणजे लग्न उरकलं कुटुबीयानी.तिलाही त्याची गम्मत व मजा वाटलेली दिसत होती.तरी मैत्रीणीबरोबर ती पोट घेऊन सुद्धा खेळताना दिसली.
आता बालपण आणि मातृत्व —
एकाच शरीरात अडकलेलं.मिसळलेले.बाल वयातुन थेट प्रौढ वयात प्रवेश.हे भारतात पुर्वी पासून घडत आलेले एक महत्वाचे व युनिक फिचर आहे.भारतीय माणसाला तारुण्य कधी उपभोगायला या ‘बालविवाह’ पद्धतीमुळे मिळाले नाही.आजची पिढी ते बरेच अनुभवत आहे.लकी असावी?
बालपण ते थेट पौढपण. मधले तारुण्य या देशाला कधी मिळाले नाही.माझ्या आत्याचे लग्न झाले तेव्हा ती पाळण्यात होती.नवरदेवही दुसऱ्या पाळण्यात होता. हे मला वडिलांनी सांगितले होते. मी पाहिलेले नाही.
असे का? तर “आमच्यात असंच असतं,”
कोणीतरी सहज सांगून गेला.यांच्यातच काय? अनेकांत तसे आहे. हे अशास्रीय non scientific असलेले.धर्म non scientic सुद्धा दैवी बनवू शकतो.
लग्न झालं.
संसार सुरू झाला.
एकदा ती भिंत बांधत होती.
तो मुल कडेवर धरून उभा.पहिल्यांदा मी तो नवरा पाहिला होता. मला आनंद वाटला. जोडी छान होती. पण नजर लागणार होती कुणाची तरी पुढे!
पहिल्यांदा पाहताना वाटलं —
चित्र छान आहे.
पण ते फक्त थोडा काळ होतं.
दारू हळूहळू घशात शिरली.
नवरा तिच्यात नव्हता,होताही.फक्त हात पुढे करायला आणि ती 10/20 ची नोट त्याच्या हातात टेकवायला.
तो बाटलीत रमला होता.चक्कर मारून येणे, खाणे, झोपणे, उठणे, परत चक्कर मारत दारू पिऊन येणे, खाणे, झोपणे.
Elianeted झाला. असे रोज शेकडो होतात. ती आता त्याला,’प्यायला’ लागली होती. इथून मागे फिरणे फार कमी व्यसनी लोकांना जमते. जगण्यासाठी,’मकसद’असेल आणि त्याने दारु replace केली तरच ते शक्य असते. मोठे ‘मकसद’ अशा वातावरणात कसे ‘फिक्स’ होतील?
घर चालवायला ती बाहेर पडली.
ती फोनवर बोलताना दिसू लागली.
नवीन चेहरे.
नवीन ओळखी.
उशिरा घरी येणं.
अवेळी गायब होणं.
संशय मनात घर करू लागला नवर्याच्या.पण हलू शकत नव्हता जागेवरुन. Circle तोडणे कठीण बनले. मग नंतर कदाचित तो,’गृहीत’ धरु लागला. स्वाभिमान शरीर थकले तर थकतो का? हो!
एक दिवस सत्य समोर उभं राहिलं.
दोन तीन नातलगच मुली पुरवत असत.
रक्ताचं नातं —
दलालीत बदललेलं.प्रत्येक नातं काही compramise करायला परवानगी देते? हो प्रथा, परम्परा असेल तर! त्या देवदेवतशी जोडलेल्या असतील तर”असेतु हिमाचल बर्याच जाती castes कडे परम्परेने ते ‘काम’ सोपवलेले आहे.ते जन्मानेच ठरते.
कोल्हापूर जिल्ह्यात मी असताना 3री,चौथीत होतो. कानावर पडत असे.” रेणुका देवाला सोडलेली आहे!” रेणुका ही वडिलांच्या एका शिपायाची तरुण मुलगी होती. तिला छोटी लहान गोन्डस मुलगी झाली.ती देखणी तरुणी होती.
सन्जय माझा समवयस्क मित्र.बाजूला कोपऱ्यात जायचो. Discuss करायचो.’बिन लग्नाची कशी झाली बाळन्त?’एकदा माझ्या वडिलांनी मला माहिती सांगितली.हे असं असं असते. तेव्हा समजले.पुढे उत्तम राव काम्बळे यांची पुस्तके व व्याख्याने वाचली, ऐकली तेव्हा अधिकच सामाजिक स्वरुप clear झाले.
औद्योगिक भागात रात्र वेगळी असते.
लॉजच्या बाहेर सावल्या उभ्या असतात.असा भास होतो. औदयोगिक परिसरातील चौकात.
दलालांचे मोबाईल वाजत असतात.
“एक काम” —
‘काम’ हा कोडवर्ड.
मुली —
‘संख्या’ बनलेल्या.
पोलीस स्टेशन जवळच.पण…
तसा राऊंड येतो.
पण नेमकी जागा चुकते.
अज्ञानाने?
की संगनमताने?त्यांनाच माहित!
उत्तर कुणाकडेच नाही.असे नाही. पण भिती.पुरावे पाहिजेत मिडियाला! Sting ऑपेरेशन जीवावर बेतु शकते.पण मी केली आहेत.
आज कविता बदलली आहे.
:नजरे’त सराईतपणा.सेकंदात नजर ‘मारु’ शकते. सेकंदात शब्द बदलू शकते.कही पे निगाहे,कही पे निशाणा अचुक साधु शकते.अभिनित पण खर्या वाटाव्या अशा ‘अदा’करू शकते.’तिथली’ भाषा बोलू शकते.रावडी भाषा. कमरेखालचे शब्द!अगदी सगळं शिकुण घेतले तिने!
जुन्या एखाद्याला स्वतःलाच शरम वाटावी.पण तिला नाही. बेदरकारपणे निघून जाणारी पावले.
इशारे समजतात तिला.
आणि ती इशारे देतेही.
ती आता “मॅडम” आहे.
नवरा कोमेजलेला. हरलेला, returnable नसलेला. सन्वेदनशिल माणूस हळहळतो. जेव्हा तो म्हणतो- “आता मी मरणार आहे थोड्या दिवसांनी!” तिचे उत्तर- ” मी त्याच दिवसाची वाट बघत आहे? ”
ती वाट पाहतेय —
त्याच्या मृत्यूची.
खलनायक एक नाहीत.
दारू आहे.
नातलग आहेत.
समाज आहे.
प्रशासन आहे. गरीबी आहे, मोबाईल ही आहे
सर्वात मोठं —
दारिद्र्य?
तेही नसावे! लैंगिक प्रेरणा आणि जीवन हे सिगमन्ड फ्राईड कडुन समजून घ्या. आर्थर मेकियावेली कडून समजून घ्या.जगताना उपयोगी पडेल.
ते कुणाला चुकले नाही.
वय वाढतं.
ग्राहक कमी होतात.
नवीन मुली येतात.
जुनी शरीरं निस्तेज होतात —
सिनियर रस्त्यावर पडलेल्या दिसतात.नातलग लाम्बुन पाहतात. पहाटे उतरल्यावर ती झोपडीत जाते. हे चित्र देखील इथलच!
नंतर कोणी विचारत नाही.
ना समाज.
ना कुटुंब.
ज्यांनी ढकललं आत —
तेच लाम्ब दूर उभे राहतात.
तरुणाला विचारलं —
“हे सगळं तुम्हाला कसे चालते ?”
उत्तर आलं —
“आमच्यात असंच असतं.”पहिल्या पासून आहे.
ही परंपरा आहे.
शोषणाची.
अंधाराची.
कविता दोषी नव्हती.
ती परिस्थितीची गुलाम होती.
कोणतीही मुलगी
स्वतःहून वेश्या होत नाही.असं करिअर करावे, असे लेटेस्ट सेक्स वर्कर्सला सुद्धा वाटत नाही. ज्या college girl असतात. थोडे दिवस पैसे गोळा करु. नंतर हे ठिकाण सोडायचेच आहे.
काही राज्यातील तर काही परराज्यातील! पुण्यात स्पर्धा वाढली की नगर हायवेला आस्रय घेणार्या?
स्वप्नं होती —
शाळेची, खेळाची.
आता फक्त ‘व्यवहार’ आहेत.आज किती ‘काम’? एकुण गुणिले 500.बाकी मालक, मेनेजर, गुन्डाना!
प्रश्न अजून उभाच आहे —
हा अंधार कधी संपणार? हा इथेच नाही. गावे बाधीत झाली. शहरांना लागण झाली. राज्ये infected झाली. ‘अशोक खरात’ पासून ‘एप्सिन’ पर्यंत जगात pendamic झाला ?
बाबासाहेबांचा स्वाभिमानी समाज कधी येणार?
गान्धिजीच्या नजरेतील शेवटच्या डोळ्यातील अस्रु कधी हसणार ?
क्रांती नगर अजूनही तिथेच आहे.
आणि कविता…
आता एक नाही ! अनेक ! अजूनही जिवंत आहेत.रान्गेत उभ्या आहेत. आधीच्या outdated झाल्या की replace करायला!
———-
(लेखक – डॉ. नितीन पवार यांच्या इतर कथा/कविता वाचा>>>>>
Atmakathan ; मीच ती बोलतेय; – रांजणगाव हत्याकांडातील दलित महिला !
शिरुर नगरपालिका निवडणूक : एक लोकशाहीचा उत्सव – कविता
अधिक माहितीसाठी लिंक्स:
UNICEF – Child Marriage Data
https://www.unicef.org/india/what-we-do/child-protection/child-marriage
भारतातील बालविवाहाचे वास्तव, आकडे आणि परिणाम
National Crime Records Bureau – Crime Against Women Reports
महिलांवरील गुन्हे, trafficking आणि exploitation संदर्भातील अधिकृत डेटा
World Health Organization – Sexual and Reproductive Health
https://www.who.int/health-topics/sexual-health
लैंगिक आरोग्य, सामाजिक परिणाम आणि मानसिक पैलू
International Labour Organization – Forced Labour & Trafficking
https://www.ilo.org/global/topics/forced-labour/lang–en/index.htm
जबरदस्ती मजुरी, मानवी तस्करी यावर जागतिक माहिती
Human Rights Watch – Women Exploitation Reports
https://www.hrw.org/topic/womens-rights
स्त्रियांच्या शोषणावर सखोल रिपोर्ट्स
Wikipedia – Background Overview https://en.wikipedia.org/wiki/Prostitution_in_India
भारतातील वेश्याव्यवसायाची सामाजिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी
PRS Legislative Research – Laws on Trafficking & Child Marriage
“समाज बदलण्यासाठी कायदे आहेत — पण ते जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या संवेदनशीलतेवर आहे.”
कायदेशीर सूचना (Legal Disclaimer)
ही कथा सामाजिक वास्तवावर आधारित आहे आणि समाजातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. या कथेमध्ये वर्णन केलेल्या घटना,पात्रे किंवा प्रसंग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा ठिकाणाशी जुळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
लेखाचा उद्देश जागरूकता निर्माण करणे, शोषणाविरुद्ध आवाज उठवणे आणि कायदेशीर व सामाजिक बदलाची गरज अधोरेखित करणे हा आहे. कोणत्याही प्रकारे अनैतिक किंवा बेकायदेशीर कृतीचे समर्थन केलेले नाही.
(लेखनात वापरलेली प्रतिमा प्रतिकात्मक काहे.)
———
” कोणत्याही मुलीला किंवा महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे हा गंभीर गुन्हा आहे.बालविवाह किंवा trafficking दिसल्यास त्वरित तक्रार करा.
* हेल्पलाईन: 1098 (Childline India)
