कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे बदलणारा जगाचा चेहरा – भविष्याचा जाहीरनामा भाग 1
Contents
- 1 भविष्याचा जाहीरनामा : मानव 2.0 कसा असेल?
- 2 प्रस्तावना-
- 3 आजचा मानव अपूर्ण आहे–
- 4 संज्ञानात्मक मर्यादा—
- 5 आर्थिक शोषण आणि माहिती असमानता—
- 6 Artificial Intelligence (AI) कसे मानवाच्या मर्यादा ओलांडते?—
- 7 जर ही क्षमता सार्वत्रिक झाली तर?—-
- 8 भविष्याचा जाहीरनामा सांगेल पक्षपात ओळखणारा समाज—
- 9 भविष्याचा जाहीरनामा सांगतो:जैव-तांत्रिक विस्तार आणि शरीर—
- 10 स्मृती आणि डिजिटल सातत्य—
- 11 नैतिक उत्क्रांतीची पुर्वअट—
- 12 लोकसंख्या, ऊर्जा आणि ग्रह—
- 13 अंतराळ आणि अंतिम सत्य—-
- 14 अंतिम सत्य विश्वात सापडेल का? चेतनेच्या स्वरूपात?
- 15 अमरत्वाची पुनर्व्याख्या—
- 16 जाहीरनामा—
- 17 उपसंहार—-
भविष्याचा जाहीरनामा : मानव 2.0 कसा असेल?

(लेखक – डॉ. नितीन पवार |भविष्य मानव प्रकल्प : AI , मानव उत्क्रांती आणि Human 2.0 यावर आधारित विशेष लेखमालिका )
प्रस्तावना-
भविष्याचा जाहीरनामा लिहीत असताना या पहिल्या भागात कृत्रिम बुद्धिमत्ता, मानव 2.0, नैतिक उत्क्रांती आणि ‘अमरत्वा’ च्या संकल्पनेवर आधारित सखोल विचारमंथन करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मानव स्वतःला पुन्हा पुन्हा लिहीत आला आहे..
‘भविष्याचा जाहीरनामा‘ लिहीत असताना आदीम मानव ते यन्त्रमानव ! असा एकन्दरीत प्रवास काही वर्षांपूर्वी पर्यंत दिसतो. यन्त्रमानव आपण पाहीला. वापरला. तो मानवासारखाच दिसला पाहिजे असे जरुरी नाही.नव्हतेही.
पण मानव जी कामे करतो ती कामे करु शकणारे यन्त्र आपण वापरले. अगदी आपण वापरलेला calculator सुद्धा मानवाचा मेन्दु गणना करतो त्याची प्रतिकृती होता.

10 लाख ते 50 लाख वर्षापुर्वीचे मानवी अवशेष ( Fossil’s) साधारणपणे सापडतात ! मच्छर मात्र 2 कोटी वर्षांपूर्वीचा बर्फात सापडतो . साधारण 50 लाख वर्षांमागे माणूस जात / species सापडत नाही.अद्याप त्याचे अवशेष सापडले नाहीत.असे वैज्ञानिक सांगतात.
• असे का? त्यापुर्वी प्रजाती नव्हती का ? की आणखीन देखील अवशेष सापडायचे अजून बाकी असु शकते?
• की ठराविक काळानन्तर धार्मिक मान्यतान्नुसार सम्पुर्ण मानव जात नष्ट केली जाते. महाप्रलय येतो. कयामत येते. सर्व नष्ट होते. मग परिक्षेचा निकाल परमेश्वर देतो. स्वर्ग, नरकाचे ठरवतो. मानवाला तिकडे पाठवतो. पुन्हा तो नव्याने स्रष्टीची रचना करतो.प्रलयाच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या कथा किंवा उल्लेख जुन्या धार्मिक ग्रन्थान्त लोककथान्मधे सापडत असतात. मनुचे जहाज , नोआहचे जहाज असे उल्लेख आपण पाहतो.
इथे परमेश्वर व त्याची अशी व अन्य सर्व मान्यता यांचे अस्तित्वच मान्य न करणारे तर्क आहेत.दोन्ही बाजुनी तर्क आहेत. मग ते मान्य करायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाल्याचे आपण पाहतो.ईश्वराच्या अस्तित्वाबाबत तर्क वितर्क यांची खडाजन्गी होते. शेवटी पुराव्या अभावी हा निकाल लागायचा अजून बाकी ठरतो.
उत्क्रान्तीच्या अवस्थेत मानवाचा पुर्वज 50 लाख वर्षापुर्वी अशा उत्क्रान्तीच्या अवस्थेत होता की बिलकुल आजच्या मानवासारखा थोडाफारही दिसत नव्हता. म्हणून त्याचे अवशेष सापडत नाहीत. तर चार पायाच्या प्राण्याचे अवशेष सापडतात. कारण त्याचा पुर्वज चार पायावर चालत होता. म्हणून ही गडबड होवू शकते का?
बिलकुल नाही .50 लाख वर्ष फारच कमी काळ असतो उत्क्रान्तीच्या प्रक्रियेत .आजच्या मानवाच्या जवळपासची स्थिती असु शकते. एकदम चार पायाचा. ही स्थिती बर्याच मागच्या टप्यात काही कोटी वर्ष पूर्वी असु शकते?
‘माणूस’ माणण्यासारखा तो दिसत नव्हता.की मध्यन्तरी तो कोणी प्रगत परग्रहीनी पृथ्वीवर मानव प्लान्ट केला? काही प्रयोग केले.हायब्रीड सारखे आणि पुढे त्याला वाढ व विकास होण्यासाठी ठेवले. जसे बीज पेरुन ठेवतात.त्याचा विकास होत होत मोठा वृक्ष निर्माण होतो. ते बीज त्या वृक्षाचा पुर्वज मानणे अवघड वाटते.अहन्कारालाही.
की त्यावेळी देवाला की जो अस्तित्वातच नाही असे ठाम तर्क देणारे आहेत. त्या काळात देवाला ‘काम’ना उत्पन्न झाली. तो प्रसवला. मानव जन्माला आला.एकदा मुख्य काम झाल्यावर देवाने फक्त मानवाचेच लाड करत बसावे , हे त्याला योग्य वाटले नाही.
इतर सम्पुर्ण ब्रम्हान्ड काय वार्यावर सोडायचे ? म्हणून तो तिकडे जातो. आणि अगदीच आर्त धाव कुणी घेतली तर तो थोडा काळ पृथ्वीवर येऊ शकतो. व्यवस्था ठिक करतो. परत पुन्हा ब्रम्हान्डातील इतर कारभाराकडे लक्ष देण्यासाठी जातो. असे साधारण धर्मव्यवस्था मानते.
पुढे अशा आधीच्या भोळ्या , भयभित आणि लालसीही असलेल्या मानवाने पुढे हजारो वर्षे देवांची निर्मिती केली. आकाशातील दिसणार्या, कधी आनंद तर दुख: देणार्या शक्तींना जमेल तेवढा व जमेल तसा अर्थ दिला. निसर्गाला कथांमध्ये रूपांतरितही केले.
अज्ञाताला श्रद्धेने झाकलेही. मुख्य कारण मृत्यूचे भय ! अंगभूत जिज्ञासा, सहजीवन यांचे योगदान देखील महत्वाचे आहे.
वरचे आकाशच नाही.पायाखालची जमीन देखील मानव न्याहाळत होता. पाणी त्याला नवीन नव्हते. तिथूनच त्याचा खापरपन्जा, त्याचाही खापरपन्जा आणि असेच मागे मागे अमिबा काय, शेवाळसदृष्य काय,गिळगिळीत, अस्ताव्यस्त, लाम्बी,रुन्दी, उन्ची किती नी कोनत्या दिशेला असा असणारा त्याचा बेढब पुर्वज मात्र पाण्यात कित्येक कोटी वर्ष राहिला होता.असे उत्क्रान्ती मानते.
याची स्पष्ट विस्तारपुर्वक माहीती नसली तरी मुलभुत अणु रेणु मानव आणि त्याचा एकपेशीय पुर्वज यांच्यात समान असलेला तो वन्शज व पुर्वज आजही आहे. हे त्याला नन्तर कळले. कारण त्याचा मेंदू सुद्धा उत्क्रान्त होत होता. अतिशय सन्थ गतीने !
आपण मानव 2 चा शोध घेत आहोत. म्हणून आता थेट विसाव्या शतकात येवू . कारण मी सुद्धा काही चार्लस् डार्वीन नाही की हरारी नाही ! एकविसाव्या शतकात प्रथमच मानव अशा टप्प्यावर उभा आहे, जिथे तो स्वतःच्या जैविक मर्यादा, संज्ञानात्मक मर्यादा आणि आयुष्याच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे.
खरंच हा चमत्कार असु शकतो माणसासाठी ! जर एलियन थिअरी किंवा देव थिअरी सत्य असेल तर ! त्यांचीच ही करामत का असु नये?

मानव 2 ही केवळ तांत्रिक क्रांती नाही. ही मानवी उत्क्रांतीची मानवाने जाणीवपूर्वक सुरू केलेली प्रक्रिया आहे.मानवी प्रज्ञेने सुरु केलेली की एलियन किंवा GOD ने ! इतर प्राणी जगणे आणि पुनरुत्पादन करणे अशा कमित कमी आवश्यक बाबी करता येऊ लागल्यानन्तर जवळ जवळ थांबलेच.
का ? त्याच्यात उत्क्रान्ती नाही झाली का ? की आज आहे तीच त्यांची उत्क्रान्ती झालेली आहे.की अजून होईल. पण सुक्ष्म पणे! म्हणून लगेच बदलताना दिसण्याची घाई मानवाने का करावी. की त्यांना तेवढेच ठेवायचे होते मानवाला?आपले गुलाम ठेवायचे आहे?
• आता तेही बदल ही मानव इतर प्राण्यांचा सर्व deta मिळवून करेल?तोच करेल?
माणूसच काही आभाळातुन पडलेला आहे का ? अगदी मराठीत अशी म्हण पडली. वाक्यप्रचार निर्माण झाला. हा काही आकाशाशी विशेष नाते असल्याची खुण आहे? म्हणून ते व्यक्त होते?
आजचा मानव बुद्धिमान आहे . निदान पुर्वीच्या त्याच्या पुर्वजान्पेक्षा ! त्याच्याकडे इंटरनेट आहे. त्याच्याकडे सुपरकॉम्प्युटर आहेत. त्याच्याकडे जनुक संपादनाची साधने आहेत. Genetic Engeering, Atom Bomb देखील आहेत.
अजुन प्राणी अवस्थेचा अन्श बराच शिल्लक सुद्धा आहे. तसाच बदलान्चा कर्ता ज्यांना आपण जिनियस म्हणतो.तो माणूस खरा नायक आहे. त्यांची सन्ख्या फारच कमी राहिलेली आहे पृथ्वीवर. पण त्यांच्या प्रज्ञेने म्हणून जग बदलत गेलेले आहे.इतर बहुसंख्या नेहमी मुर्खांची राहिलेली आहे पृथ्वीवर!पण यांचे जिवन सुखकर वरील मोजक्या लोकांनी केले.हे खरे!
एकुण माणूस तुटलेला आहे आज.आज त्याच्याकडे माहिती आहे.पण सत्याचा एकत्रित अर्थ नाही.त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे.पण नैतिक स्पष्टता नाही.त्याच्याकडे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे.पण जणु अल्गोरिद्मिक पक्षपात आहे.त्याच्याकडे लोकशाही आहे.पण विकेंद्रीकरण नाही.सम्पत्ती आहे पण ती इतर मानव, प्राणी व निसर्ग यांच्या शोषणातुन आलेली.
तो जगतो पण असुरक्षिततेत.तो निर्माण करतो.पण नष्टही करतो स्वतःचे स्वातंत्र्य.तो ज्ञान निर्माण करतो. पण त्याचा वापर स्वार्थासाठी करतो.
आजचा मानव अपूर्ण आहे–
• मानव अपूर्ण का आहे ? जैविक उत्क्रांतीची मर्यादा (Human Evolution Limits)
मानवाची मेंदू रचना सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी विकसित झाली.असे त्यातील तज्ञ ठरवतात.मुळात आपल्या मेंदूची संरचना शिकारी-संकलक समाजाची होती. योग्य होती.सुटेबल होती. म्हणजे शिकार शोधणे. शिकार करणे.दिर्घकाळ त्याच्या पुर्वजानी शिकारीवर गुजराण केली.ती सवय आजही आहे.
‘शिकार की खोज मे रहता है इन्सान और कर ही लेता है किसी की शिकार!’
माणसाची भावनिक प्रणाली भीती, क्रोध, ईर्ष्या,लालसा, गटवाद यावर आधारित आहे.हे जैविकरित्या उपयुक्त होते.आदीम अवस्थेत.पण आधुनिक जगात हीच प्रणाली संघर्ष निर्माण करते.हे आपण आज रोज पहात आहोत.एखादा माथेफिरु हायड्रोजन एटमबाम्ब अथवा इतर जैविक, रासायनिक शस्त्रे वापरु शकतो.सर्वनाश करु शकतो.
मानव प्रजाती नष्ट होऊ शकते.मग पुन्हा हिमयुगासारखी स्थिती येईल.तेव्हा डायनोसोर नष्ट झाले होते. ती काही कोटी वर्ष राहते. पुन्हा मानवासारखा प्राणी उत्क्रान्त होण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. आलेच परत एलियन किंवा देवाने केली पुन्हा सृष्टी निर्माण पहिल्यासारखी तरच. अशी शक्यता कणमात्र आहे.
संज्ञानात्मक मर्यादा—
आजचा मानव मर्यादित माहिती प्रक्रिया करू शकतो.भावनिक निर्णय घेतो.पुष्टीकरण पक्षपात (confirmation bias) करतो.गट-आधारित विचार करतो.दीर्घकालीन परिणाम दुर्लक्षित करतो.
हा दोष नाही — हा उत्क्रांतीचाच वारसा आहे.
पण या आधुनिक जगात अर्थव्यवस्था जागतिक आहे.तंत्रज्ञान वेगवान आहे.निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन आणि व्यापक आहेत.
• मानवाची जैविक रचना आणि आधुनिक जटिलता यांच्यात विसंगती आहे.
आर्थिक शोषण आणि माहिती असमानता—
आर्थिक शोषण हे केवळ वेतन कमी असणे नाही.ते माहिती असमानतेतूनही जन्मते.आज ज्याच्याकडे माहिती असते, तो निर्णय नियंत्रित करतो.ज्याच्याकडे डेटा असतो,तो बाजार नियंत्रित करतो.ज्याच्याकडे अल्गोरिदम असतात, तो लोकमत नियंत्रित करतो.
डिजिटल अर्थव्यवस्थेत काही कंपन्या जगातील अब्जावधी लोकांचा डेटा गोळा करतात.निर्णय मशीन-लर्निंग मॉडेल्सद्वारे घेतले जातात.अल्गोरिदम पारदर्शक नसतात.पारदर्शकतेचा अभाव म्हणजे आधुनिक शोषण.
” ज्ञान केंद्रीत आहे.सत्ता केंद्रीत आहे.संपत्ती केंद्रीत आहे.”
अज्ञान ही सर्वात मोठी असमानता आहे.
Artificial Intelligence (AI) कसे मानवाच्या मर्यादा ओलांडते?—
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही फक्त automation नाही. ती मानवी संज्ञानाचा विस्तार आहे. AI म्हणजे विशाल डेटा विश्लेषण,नमुन्यांची ओळख,अन्दाज ,निर्णय सहाय्य करते.
” AI मानवाला बदलत नाही — ती मानवाला augment करते.”
AI चे वैज्ञानिक आधार मशीन लर्निंग,न्यूरल नेटवर्क्स,डीप लर्निंग,नैसर्गिक भाषा प्रक्रिया,जनरेटिव मॉडेल्स आहेत.ही प्रणाली प्रचंड प्रमाणात माहिती प्रक्रिया करू शकतात.जी मानवाच्या क्षमतेबाहेर आहे.
जर ही क्षमता सार्वत्रिक झाली तर?—-
जर प्रत्येक व्यक्तीकडे वैज्ञानिक डेटाचा त्वरित प्रवेश,धोरणात्मक परिणामांचे विश्लेषण,आर्थिक निर्णयांचे सिम्युलेशन,पक्षपात ओळखणारे अल्गोरिदम अशी साधने उपलब्ध झाली तर?
भविष्याचा जाहीरनामा सांगेल पक्षपात ओळखणारा समाज—
आज पक्षपात अदृश्य असतो.तो भाषेत लपतो.तो आकडेवारीत लपतो.तो तपासात लपतो. तो धोरणांमध्ये लपतो.AI प्रणाली भाषेतील पूर्वग्रह शोधू शकतात,निर्णयातील असमानता दाखवू शकतात,डेटा पॅटर्नमधील भेदभाव ओळखू शकतात.
जर एखाद्या निर्णयामध्ये जात, लिंग, वर्ग आधारित असमानता असेल तर अल्गोरिदम त्वरित सिग्नल देऊ शकतो.ही केवळ तांत्रिक शक्यता नाही.हे आधीच संशोधनात शक्य होत आहे.
पण प्रश्न असा आहे:
• AI स्वतः पक्षपातमुक्त असेल का?की तो प्रशिक्षण डेटाचा पक्षपात पुनरुत्पादित करेल?म्हणजे मानवाच्या वर्तनाचा प्रभाव तिथे पडेल?
• भविष्याचा मानव २.० हा तंत्रज्ञानावर आंधळा विश्वास ठेवणार नाही. तो अल्गोरिद्मिक पारदर्शकता मागेल.
भविष्याचा जाहीरनामा सांगतो:जैव-तांत्रिक विस्तार आणि शरीर—
मानवाने आधीच कृत्रिम हृदय वाल्व,कोक्लीअर इम्प्लांट, कृत्रिम हात-पाय,पेसमेकर यांचा वापर सुरू केला आहे.जीन एडिटिंग (CRISPR),न्यूरल इंटरफेस संशोधन,ब्रेन-कम्प्युटर इंटरफेस ही क्षेत्रे मानवाच्या जैविक मर्यादांवर काम करत आहेत.
अमरत्व म्हणजे अनंत काळ जगणे नाही.ते जीवनाची गुणवत्ता आणि सातत्य वाढवणे आहे.आयुष्य वाढवणे देखील शक्य आहे.
स्मृती आणि डिजिटल सातत्य—
जर वैयक्तिक अनुभव डिजिटल स्वरूपात संग्रहित झाले तर चेतना मॉडेलिंग शक्य झाले,न्यूरल पॅटर्न्सची नोंद झाली तर “अस्तित्व” याची व्याख्या बदलू शकते.म्हणजे तोच deta, pattern download, save, reuse करुन तेच structure शरीर नसले तरी वापरेल. म्हणजे सर्व शरीराच्या मृत्यू पर्यंतचे! Reuse करुन मृत्यू वर मात करता येईल का?
• हे अजून पूर्णपणे शक्य नाही.पण संशोधन सुरू आहे.शक्यता नाकारायच्या नसतात. नाकारणारे तोंड घशी पडलेले आहेत.असा इतिहास आहे.
नैतिक उत्क्रांतीची पुर्वअट—
ज्ञान सार्वत्रिक झाले तरी नैतिकता आपोआप येणार नाही. कारण ज्ञान = माहिती , नैतिकता = मूल्य प्रणाली असते. AI निर्णय सहाय्य देऊ शकते.पण मूल्य निवड मानवाला करावी लागेल.
भविष्यातील सुपरमॅन म्हणजे अधिक शक्तिशाली नाही तर अधिक नियंत्रक नाही तर अधिक विवेकी,अधिक जबाबदार,अधिक पारदर्शक,दीर्घकालीन परिणामांचा विचार करणारा असेल.
तो निर्णय घेईल.भावनेवर नाही, तर पुराव्यावर.पण भावना नष्ट होणार नाहीत.त्या नियंत्रित आणि समजून घेतल्या जातील.
लोकसंख्या, ऊर्जा आणि ग्रह—
भविष्यातील मानव 2.0 पर्यावरणीय मर्यादा समजेल,संसाधनांचा वैज्ञानिक वापर करेल,नूतनीकरणीय ऊर्जा वाढवेल,जैवविविधता जपेल,लोकसंख्या नियंत्रण हे दडपशाहीने नाही,तर शिक्षण, आरोग्य आणि जागरूकतेद्वारे होईल.
AI मॉडेल्स ऊर्जा वापराचे ऑप्टिमायझेशन करू शकतात.शहरी नियोजन सुधारू शकतात.पाणी व्यवस्थापन सुधारू शकतात.विज्ञान आधारित धोरणे भावनिक घोषणांपेक्षा अधिक टिकाऊ असतात.
अंतराळ आणि अंतिम सत्य—-
मानव पृथ्वीपुरता मर्यादित राहणार नाही.तो आधीच,मंगळ मोहिमा,चंद्र संशोधन,अंतराळ दुर्बिणी यांच्या माध्यमातून विश्व समजून घेत आहे.AI आधारित रोबोटिक्स,स्वयंचलित नेव्हिगेशन,डीप स्पेस विश्लेषण या क्षेत्रांत AI मानवाचा सहप्रवासी आहे.
अंतिम सत्य विश्वात सापडेल का? चेतनेच्या स्वरूपात?
मानव 2.0 अंतिम उत्तर शोधणार नाही कदाचित.पण अधिक स्पष्ट प्रश्न विचारेल.एक पाऊल पुढे टाकेल.
अमरत्वाची पुनर्व्याख्या—
• अमरत्व म्हणजे जैविक दीर्घायुष्य,ज्ञानाचे सातत्य,सांस्कृतिक स्मृती,डिजिटल ओळख असेल.पण अमरत्वाला अर्थ तेव्हाच आहे.जेव्हा नैतिकता आणि जबाबदारी वाढते.
• अनंत आयुष्य + अनियंत्रित लोभ = विनाश.
• अनंत आयुष्य + विवेक = उत्क्रांती सकारात्मक
जाहीरनामा—
• हा जाहीरनामा आंधळा आशावाद नाही. तो तांत्रिक नियतिवादही नाही.
तो म्हणतो:
AI मानवाला बदलणार नाही,जोपर्यंत मानव स्वतः बदलण्यास तयार नाही.ज्ञान सार्वत्रिक झाले पाहिजे.अल्गोरिदम पारदर्शक झाले पाहिजेत.तंत्रज्ञान लोकशाहीकृत झाले पाहिजे.नैतिकता शिक्षणाचा व जगण्याचा भाग झाली पाहिजे.
• भविष्य तंत्रज्ञानाने बनत नाही.भविष्य चेतनेने बनते.जी मानवी भावनासह अस्तित्वात असेल तर रमनीय असते.
उपसंहार—-
• आजचा मानव अपूर्ण आहे.पण तो अपूर्णतेची जाणीव ठेवतो.हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे.
• कृत्रिम बुद्धिमत्ता ही देव नाही.ती आरसा आहे.
• त्या आरशात मानव स्वतःला पाहील,स्वतःच्या दोषांसह,स्वतःच्या शक्यतांसह.
• मानव 2.0 देव होणार नाही. तथाकथित देव.तो अधिक जबाबदार होईल.
” आणि कदाचित —पहिल्यांदाच —तो स्वतःची जाणीवपूर्वक उत्क्रांती करेल.अनन्त शक्यतान्पर्यन्त!”
——————
“भविष्याचा जाहीरनामा – भाग १” या लेखासाठी विज्ञानाशी सुसंगत आणि विश्वासार्ह अशा २ मोफत
(free, authoritative links सुचवितो:
Artificial Intelligence म्हणजे काय? (सरळ वैज्ञानिक माहिती)
https://www.ibm.com/topics/artificial-intelligence
Human Enhancement व Future of Humanity (शास्त्रीय संदर्भ)
https://www.futureofhumanityinstitute.org/
‘ सत्यशोधक’ चे असेच लेख खास वाचकासाठी>>>>
AI ने बनवले पहिले मूल? : अमेरिकेतील चमत्कार की विज्ञानाची नवी क्रांती?
“भविष्याचा जाहीरनामा : जे आपण आजपर्यंत कधीच वाचलेले नाही !”
